कझाकिस्तानमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये १६४ जणांचा बळी गेल्याचे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सरकारी वाहिन्यांनी याबाबत वृत्त दिले आहे. हे मृत्यू नागरिकांचे आहेत की सुरक्षा रक्षकांचे आहेत हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. १६ पोलिसांचा रविवारी मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. सर्वाधिक १०३ बळी हे अलमेटी या देशातील सर्वात मोठय़ा शहरामधील आहेत.तिथे निदर्शकांनी सरकारी इमारती ताब्यात घेऊन आग लावली होती. परिस्थिती पूर्वपदावर आल्याचे राष्ट्राध्यक्ष केसम जोमर्ट तोक्येव्ह यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मागील आठवडाभरामध्ये देशात पाच हजार ८०० जणांना अटक करण्यात आल्याची माहितीही समोर आलीय.

घरगुती गॅसची मोठी दरवाढ झाल्यानंतर २ जानेवारीपासून देशाच्या पश्चिम भागात आंदोलन सुरू झाल्याचं सांगितलं जातं आहे. नंतर ते देशभर पसरले. सोव्हियत युनियनमधून १९९१ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कझाकिस्तानमध्ये एकच पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे आता नागरिक आपल्या समस्यांसाठी आणि खास करुन इंधनदरवाढीसाठी रस्त्यावर उतरल्याचं आणि त्यातूनच हा रक्तरंजित संघर्ष झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कझाकिस्तानमध्ये हा संघर्ष नक्की का सुरु झालाय याचं विश्लेषण अभिजीत ताम्हणे यांनी केलंय.

Malaysia Military Helicopters Crash
मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ समोर
hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?

कझाकिस्तान हा एरवी कुणाच्या खिजगणतीतही नसलेला देश ५ जानेवारीपासून अचानक एएफपी, एपी, रॉयटर्सआदी वृत्तसंस्था आणि अल जझीरा, बीबीसी, सीएनएन यांचे लक्ष वेधू लागला. तेथील हिंसक निदर्शने आणि ‘नागरिक विरुद्ध सरकार यांचे युद्ध’ असे त्याचे दिसत गेलेले स्वरूप, याकडे जगाने पुरेशा गांभीर्याने पाहिले. त्या सर्व बातम्यांचा अद्ययावत् आढावा घेऊनही भारतीय मनाला जे प्रश्न पडतात, त्यांच्या उत्तरांचा शोध घेणारा हा लेख…

कझाकिस्तानात एवढी हिंसक निदर्शने भडकलीच कशी?
कझाकिस्तानात इंधनकिमती – विशेषत: द्रवीभूत नैसर्गिक वायूच्या (एलपीजी) भडकल्या, हे कारण जगभरच्या वृत्तसंस्थांनी दिले असले तरी गरिबी हे खरे कारण मानता येईल (तेथील ‘टेंगे’ हे चलन रुपयाच्या तुलनेत, १७ पैसे किमतीचे आहे. ५० टेंगे म्हणजे आपले ८.५३ रुपये. पण एलपीजी ५० वा ६० टेंगे प्रतिलिटर हा दरही तेथे परवडत नाही) कझाकिस्तानात ८० टक्के मोटारी ‘एलपीजी किट’वर चालवल्या जातात आणि या इंधनवायूवरील अनुदान सरकारने पूर्णत: बंद केले, म्हणून नववर्षापासून किमती दुप्पट झाल्या आणि २ जानेवारीच्या रात्री पहिली दंगलसदृश निदर्शने झनावझेन या छोट्या शहरात झाली.

कझाकिस्तानची राजधानी नूरसुल्तान व महत्त्वाचे शहर अलमाटी यांच्यापासून हे झनावझेन शहर (अनुक्रमे) दोन-तीन हजार कि.मी.वर आहे. तेथे पेट्रोल पंपांवरील ग्राहकही निदर्शनांत उतरले होते, पण पुढल्या तीन दिवसांत ही निदर्शने पसरली. अलमाटी शहरातील निदर्शक पालिका मुख्यालयात घुसले, या इमारतीला आगही लावण्यात आली. तर नूरसुल्तान येथेही प्रचंड जमाव रस्त्यावर उतरला आणि सरकारी इमारतींचा ताबा घेण्याचा प्रयत्न येथील निदर्शकांनीही केला. राजधानीत असे घडत असल्याने कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी पूर्ण शक्ती पणाला लावली.

नक्की वाचा >> चीन: …म्हणून संपूर्ण शहराची होणार करोना चाचणी; लोकसंख्या आहे १ कोटी ४० लाख

कझाक सरकारने कोणते उपाय केले?
राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी पंतप्रधान अस्कर मामीन यांचे सरकार बरखास्त करून उपपंतप्रधान अलीहान स्माइयलोव्ह यांना प्रभारी म्हणून नेमले. ही नेमणूक करताना, ‘आणीबाणीच्या सर्व तरतुदी यापुढे लागू’ अशी घोषणा करून लष्करासह सर्व सुरक्षा यंत्रणांना ही निदर्शने चिरडण्यासाठी मुक्तद्वार देण्याचा मार्ग खुला केला. मात्र सहा जानेवारी उजाडेस्तोवर सुरक्षादलांचे १८ जण जमावाच्या हिंसाचारात बळी गेलेले होते.

‘समाजकंटक’, ‘सशस्त्र गुन्हेगार’ तसेच ‘परकीय प्रशिक्षण घेतलेले अतिरेकी’ असाच निदर्शकांचा उल्लेख करणे कझाक सरकारी यंत्रणांनी चालवले आहे. एकूण १६४ जणांचा बळी या संघर्षामध्ये आतापर्यंत गेलाय. याखेरीज, किमान पाच हजार ८०० निदर्शकांना सुरक्षादलांनी अटकेत ठेवले आहे. हिंसक संघर्ष होत असणाऱ्या या दोन महत्त्वाच्या शहरांच्या आसपासच तब्बल ७० नवे तपासणी-नाके सुरक्षादलांनी आतापर्यंत उभारलेले असून प्रत्येकाची कसून तपासणी, संशयितांची धरपकड असे उपाय सुरू आहेत.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘या’ देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; यादीतील शेवटचे दोन देश पाहून आश्चर्य वाटेल

रशियाची युद्धविमाने बोलावण्यापर्यंत वेळ आली?
होय. रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांनी ‘कझाक राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीला मान देऊन’ रशियन हवाईदलाची विमाने कझाकिस्तानात- त्यातही, भूतपूर्व सोव्हिएत रशियासाठी महत्त्वाचे असलेल्या अलमाटी (तेव्हाचे नाव अल्मा अ‍ॅटा) शहरातील तळावर उतरवण्याचा सपाटा सहा जानेवारीच्या रात्रीपासून लावला आहे. मात्र त्याच वेळी कझाक राष्ट्राध्यक्ष तोकायेव हे, ‘परिस्थिती आता झपाट्याने नियंत्रण येत आहे’ असा दावा करीत होते. थोडक्यात, एक शक्यता अशी की ती रशियन युद्धविमाने वापरण्याची वेळ येणार नाही.

रशियाला कझाकिस्तानावरही वरचष्मा हवा की काय?
युक्रेन, बेलारूस यांच्यावर रशियाचा डोळा असल्याचे सर्वज्ञात आहे, बेलारूसचे तर राष्ट्राध्यक्षच रशियाच्या मर्जीतील आहेत. सन १९८९ मध्ये कझाकिस्तान स्वतंत्र झाले, तेव्हापासून २०१९ पर्यंत नूरसुल्तान नज्रबयेव हेच राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी ७८ व्या वर्षी पद सोडले, ते २०१८ पासून कुठे ना कुठे निदर्शने होऊ लागली होती म्हणूनच. त्यानंतर पदावर आलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांच्यावर उघडपणे रशियाधार्जिणेपणाचा आरोप अद्याप तरी झालेला नाही. मात्र, नज्रबयेव यांच्याच कारकीर्दीत, २० वर्षांपूर्वीच, रशियाच्या सैन्याने कझाकिस्तानचे संरक्षण करण्याचा करार झालेला आहे. त्या करारानंतर कधीही खुद्द कझाकिस्तानच्या नागरिकांविरुद्धच या कथित ‘संयुक्त सैन्या’चा वापर होण्याची वेळ आली नव्हती, ती आता आली.

नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण: Omicron वेगाने का पसरतोय?, लक्षणं दिसण्याचा कालावधी किती? रुग्ण किती दिवसांनी होतात बरे?

कझाकिस्तानवर असा सैलसर राजकीय दबाव रशियाला हवाच असण्याचे कारण अर्थातच, युरेनियमचे साठे! ते कझाकिस्तानात भरपूर आहेत. इतके की, कझाक निदर्शनांचे वृत्त येताच जगभर युरेनियमचे दर आणखी वाढले. या युरेनियम उत्खननावर पूर्वापार वरचष्मा रशियाचाच आहे.

इंधन दरवाढ, गरिबी… म्हणून इतक्या थराला?
आर्थिक प्रश्नांमुळे नागरिक हिंसक होऊ शकतात, हे आफ्रिकी देशांतही यापूर्वी दिसलेले आहे. पण कझाकिस्तानचे अपयश हे आर्थिक तसेच राजकीयही म्हणावे लागेल, कारण इंधनदरांवरील अनुदाने पूर्णत: बंद करण्यासारखा मोठा निर्णय घेतेवेळी जनतेला विश्वासात न घेतल्यामुळेच देशाच्या पूर्व टोकापासून पश्चिम टोकापर्यंत निदर्शने पसरली. लोकांकडे संशयाने पाहणारे सरकार लोकांविरुद्ध जसा अतिरेकी बलप्रयोग किंवा अतिरेकी आरोप करते, तसेच तोकायेव राजवटीने केले. इंटरनेटबंदी वगैरे उपायही परवापासूनच कझाकिस्तानभर लागू झालेले आहेत.

(टीप > मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)