देशाची राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकरचा तिच्या प्रियकराने खून केला आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकत मृतदेहाची विल्हेवाट लावली. तब्बल सहा महिन्यांनंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक असंच प्रकरणही चर्चेत आहे. या प्रकरणात अनुपमा गुलाटी या महिलेच्या पतीने तिची हत्या करून तब्बल ७२ तुकडे केले होते. या निमित्ताने अनुपमा गुलाटी हत्या प्रकरण काय होतं? त्या प्रकरणात नेमकं काय घडलं? श्रद्धा वालकर आणि अनुपमा गुलाटी प्रकरणात काय साम्य आहे? या सर्व गोष्टींचा हा आढावा.

उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये २०१० मध्ये ३७ वर्षीय राजेश गुलाटी नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नी अनुपमा गुलाटीचा उशीने तोंड दाबून खून केला. त्यानंतर इलेक्ट्रिक कटरने मृतदेहाचे ७२ तुकडे केले आणि वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे भरले. रोज एक एक पिशवी देहरादूनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये टाकत त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

how did Ujjwal Nikam enter politics
प्रमोद महाजन हत्या ते २६/११ चा खटला, उज्ज्वल निकम राजकारणात कसे आले?
loksabha election 2024 Priority is given to local issues in the campaign in Marathwada
मराठवाड्यातील प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य
Rameshwaram Cafe Bomb Blast Case
रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सूत्रधारासह एकाला अटक; एनआयएची मोठी कारवाई
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?

नेमकं प्रकरण काय?

मूळच्या दिल्लीच्या अनुपमा आणि देहरादूनच्या राजेशचं प्रेम होतं. त्यांनी दोघांनी १९९९ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर हे जोडपं अमेरिकेत स्थलांतरीत झालं. तेथे सहा वर्षे राहिल्यानंतर दोघांनीही परत भारतात येऊन देहरादूनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. देहरादूनच्या प्रकाशनगरमध्ये राहत असतानाच त्या दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. या तणावाचं निमित्त ठरलं राजेशच्या पत्नीच्या मनात असलेला संशय. राजेश गुलाटीचे कोलकातामधील एका महिलेशी विवाहबाह्य संबंध आहेत, असा अनुपमाला संशय होता. यावरूनच दोघांमध्ये सातत्याने भांडण होत होतं.

हेही वाचा : “माझ्या करिअरमध्ये मी इतकी थंड डोक्याने…”, माजी पोलीस महासंचालकांनी सांगितली श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांसमोरील आव्हानं

“पत्नी बेशुद्ध असताना उशीने तोंड दाबून खून”

१७ ऑक्टोबर २०१० रोजी याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. भांडणात राजेश गुलाटीने पत्नी अनुपमाच्या थोबाडीत मारली. यानंतर अनुपमाचं डोकं भिंतीवर आदळून ती बेशुद्ध झाली. शुद्धीत आल्यावर अनुपमा पोलिसांकडे तक्रार करेल हा विचार करून राजेशने उशीने तिचं नाक-तोंड दाबून तिचा खून केला. हा थरार इथंच संपला नाही.

“पत्नीच्या मृतदेहाचे ७२ तुकडे केले अन्…”

राजेशने पत्नी अनुपमाची हत्या केल्यानंतर एक इलेक्ट्रिक कटर आणि मोठा फ्रीज विकत घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशने पत्नीच्या मृतदेहाचे ७२ तुकडे करून ते वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये टाकून त्या पिशव्या फ्रीजमध्ये ठेवल्या. तसेच कोणालाही संशय येऊ नये म्हणून एक एक पिशवीची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली.

“पोलिसांना घरात कुलुप लावलेलं मोठं फ्रीज आढळलं”

राजेशने अनुपमाच्या हत्येची गोष्ट जवळपास दोन महिने लपवली. मात्र, अनेक दिवसांपासून संपर्क होत नसल्याने एक दिवस अनुपमाचा भाऊ थेट देहरादूनला पोहचला. त्याने बहिणीची चौकशी केली असता राजेशला अनुपमा कुठे आहे यासंदर्भातील समाधानकारक उत्तर देता आलं नाही. तसेच राजेशने अनुपमाच्या भावाला घरातही येऊ दिलं नाही. यानंतर अनुपमाच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि पोलिसांनी राजेशच्या घरावर छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांना घरात कुलुप लावलेलं एक मोठं फ्रीज आढळला.

हेही वाचा : मृतदेहाचे ३५ तुकडे केलेल्या Shradha Murder Case संदर्भात CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…”

“मी हे सर्व मुलांसाठी केलं”

विशेष म्हणजे ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार इतका निर्घृण खून केल्यानंतरही राजेशला याचा पश्चाताप नव्हता. बायकोपासून सुटका झाली यामुळे त्याला समाधान होतं. तसेच हे सर्व आपण मुलांसाठी केलं, असाही युक्तिवाद राजेशने केला. या प्रकरणात सप्टेंबर २०१७ मध्ये राजेशला पत्नीच्या खूनाच्या गुन्ह्यात दोषी मानून जन्मठेप झाली. जुलै २०२२ मध्ये तुरुंगात त्याची तब्येत खराब झाल्याने शस्त्रक्रियेसाठी ४५ दिवसांची सुट्टी देण्यात आली. सप्टेंबरमध्ये त्याच्या सुट्टीत २१ दिवसांची वाढ करण्यात आली. या प्रकरणात आता पुढील सुनावणी फेब्रुवारी २०२३ मध्ये होणार आहे.

श्रद्धा वालकर आणि अनुपमा गुलाटी खून प्रकरणात काय साम्य?

दिल्लीतील श्रद्धा वालकरचा खून आणि देहरादूनमधील अनुपमा गुलाटाची खून या दोन्ही प्रकरणांच्या बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे. राजेशने पत्नीच्या खूनानंतर शरीराचे तुकडे करण्यासाठी इलेक्ट्रिक कटरचा वापर केला. त्याचप्रमाणे आफताबनेही चाकू आणि करवतच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केले. दोघांनीही मृतदेहाचे तुकडे साठवण्यासाठी फ्रीज खरेदी केले. तसेच दोघांनीही मोठा काळ टप्प्याटप्प्याने मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली.

हेही वाचा : Photos : श्रद्धा हत्येप्रकरणी आफताबने कबुलीजबाब फिरवला तर? माजी DGP म्हणाल्या, “मी नेहमी सांगायचे…”

राजेशने कुटुंबाला आणि मित्रांना संशय येऊ नये म्हणून अनुपमाच्या इमेल आयडीवरून स्वतः मेल पाठवले. दुसरीकडे आफताबने श्रद्धाच्या सोशल मीडिया अकाऊंटचा वापर करून मित्रांशी चॅटिंग केली, पोस्ट केल्या आणि श्रद्धाची खोटी उपस्थिती दाखवली. आफताबने ‘डेक्सटर’ या अमेरिकन क्राईम शोमधून प्रेरणा घेतल्याचं म्हटलं, तर राजेशने हॉलिवूड चित्रपट पाहून पत्नीचा खून केल्याचं सांगितलं.