Abdul Karim Tunda ६ डिसेंबर १९९३ रोजी लखनऊ, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कथित आरोपी अब्दुल करीम ‘तुंडा’ याची गुरुवारी राजस्थानमधील टाडा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच या प्रकरणातील इतर आरोपी इरफान (७०) आणि हमीदुद्दीन (४४) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आली. गेल्या काही वर्षांपासून हे तिघेही अजमेर येथील तुरुंगात कैद होते. यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये हरियाणाच्या रोहतक जिल्हा सत्र न्यायालयानेही १९९७ सालच्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती.

काही वर्षांपूर्वी बॉम्ब बनवताना झालेल्या दुर्घटनेत अपंग झाल्यानंतर त्याला ‘तुंडा’ असे नाव देण्यात आले होते. भारतातील जवळपास ४० बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. दरम्यान, हा अब्दुल करीम तुंडा कोण आहे? त्याच्यावर नेमके कोणते आरोप करण्यात आले होते? आणि त्याला अटक करण्यात आल्यानंतर नेमकं काय घडलं? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
delhi chief minister arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढीस?

कोण आहे अब्दुल करीम तुंडा?

अब्दुल करीम तुंडा याचा जन्म १९४३ साली दिल्लीतील दर्यागंज येथील गरीब कुटुंबात झाला. त्याच्या जन्मानंतर काही वर्षात त्याचे कुटुंब दिल्लीतून उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे स्थायिक झाले. शालेय शिक्षणानंतर तुंडाने भंगार व्यापारी म्हणून काम केले. तसेच त्याने काही दिवस कपड्याचादेखील व्यापार केला.

१९८० मध्ये झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनानंतर तुंडा याच्या आयुष्यात बराच बदल झाला. या आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील काही गावात दंगली उसळल्या होत्या. त्यामुळे त्याचा हिंदूंकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. मीडिया रिपोर्टनुसार, या दंगलीत तुंडाच्या नातेवाईकांना जिंवत जाळण्यात आले होते. तसेच अनेक दुकाने आणि मशिदीदेखील तोडण्यात आल्या होत्या. या दंगली उसळल्या तेव्हा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा दावा तुंडाकडून करण्यात आला होता.

या सगळ्या घटनांनंतर तुंडाच्या मनात बदल्याची भावना निर्माण झाली. काही दिवसांतच तो अहल-ए-हदीस या संघटनेशी जोडला गेला. त्यानंतर काही दिवसांनी तो अहमदाबादमध्ये पोहोचला. तिथे त्याने धर्माचा प्रचार करण्यास सुरूवात केली. मीडिया रिपोर्टनुसार, यादरम्यान तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आला. आयएसआयने त्याला पाकव्याप्त काश्मिरमध्ये बोलवून बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात त्याचा डावा हात कायमचा जायबंदी झाला. त्यामुळे त्याचे नाव तुंडा (अपंग) असे पडले.

डिसेंबर १९९२ साली अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडल्यानंतर देशात दंगली उसळून आल्या होत्या. या दंगलीत हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. या घटनेच्या एक वर्षानंतर म्हणजे ६ डिसेंबर १९९३ रोजी उत्तर प्रदेशात झालेल्या बॉम्बस्फोटात तुंडाचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान हल्ल्याची योजनाही तुंडाने तयार केली होती, असे सांगण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानकडे ज्या २० दहशतवाद्यांची मागणी केली होती. त्यात तुंडाचेही नाव होते.

भारत-नेपाळ सीमेवर अटक

दरम्यान १६ ऑगस्ट २०१३ रोजी त्याला दिल्लीतील स्पेशल सेलने भारत-नेपाळ सीमेवर अटक केली. तसेच त्याच्यावर २० गुन्हे दाखल करण्यात आले. यासह दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपपत्रेदेखील दाखल करण्यात आली. यामध्ये १९९७ साली सदर बाजार आणि करोलबाग येथील बॉम्बस्फोट प्रकरणाचाही समावेश होता. मात्र, तीन वर्षानंतर पुराव्याच्या अभावी सत्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. यातील एका प्रकरणी तर दिल्ली स्पेशल सेलने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती.

हेही वाचा : पाकिस्तानमुळे भारतातील बासमती तांदळाच्या निर्यातीत घट? ‘हा’ नवा वाद काय?

२०१७ साली हरियाणातील सोनीपत येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात स्थानिक न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ आणि १२० ब अंतर्गत त्याला दोषी ठरवले. तसेच न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात तुंडाने पंजाब व हरिणाया उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली.