१४ एप्रिलच्या पहाटे इराणकडून झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र वर्षावाचे प्रत्युत्तर इस्रायलने १९ एप्रिलच्या पहाटे दिले. इसफाहान या इराणमधील लष्करी हवाईतळाच्या परिसरात इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे वृत्त आहे. पण ही क्षेपणास्त्रे नसून इस्रायली ड्रोन होते आणि ते आम्ही पाडले असे इराणच्या अधिकृत्त संस्थेने म्हटले आहे. सीरिया आणि इराकमध्येही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्यांचे वृत्त आहे. इस्रायल आणि इराण या देशांमध्ये लुटुपुटूची लढाई सुरू आहे, की यातून काही गंभीर घडू शकेल याविषयी आताच कुणी सांगू शकत नाही. या दोन्ही युद्धखोर देशांमध्ये खरोखरच युद्धाचा भडका उडाला तर त्यातून युक्रेन-रशिया युद्धापेक्षाही मोठे आणि दीर्घकालीन नुकसान संभवते.

ताजी घटना कोणती?

इराणकडून झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र वर्षावाचे प्रत्युत्तर देणार अशी गर्जना इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी त्याच दिवशी दिली होती. इस्रायलने संयम बाळगावा आणि प्रत्युत्तर देण्याच्या फंदात पडू नये असा सल्ला अमेरिकेसह बहुतेक मित्रदेशांनी दिला होता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तर, इराणवर हल्ला करण्यात आम्ही इस्रायलची कोणतीही मदत करणार नाही असे जाहीर केले आहे. तरीदेखील १९ तारखेस पहाटेच इस्रायलकडून इराणवर क्षेपणास्त्रे हल्ले झाल्याचे वृत्त आले. या वृत्तास इस्रायलकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण इसफाहान या इराणच्या शहरात तेथील लष्करी हवाईतळावर क्षेपणास्त्रे हल्ले झाल्याचे एका अमेरिकी वृत्तवाहिनीने जाहीर केले. काही तासांनी इराणी अधिकृत वृत्तसंस्थेने प्रथम वाच्यता करताना, इस्रायली ड्रोन आमच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने नष्ट केले असे जाहीर केले. इराणने काही दिवसांपूर्वी इस्रायली भूमीवर केलेल्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांचे हे प्रत्युत्तर होते का, ते सुरुवातीस स्पष्ट झालेले नाही.

Russia Ukraine War
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार? व्लादिमीर पुतिन ‘ही’ भूमिका घेण्याच्या तयारीत
How Europe struggles to fund the Ukraine War
युक्रेन युद्धाच्या निधी पुरवठ्यासाठी युरोपचा संघर्ष? जर्मनीसह इतर देशांची भूमिका काय?
Russia China friendship, India, in new Cold War, usa, Foreign Relations, india Russia realtions, india china relations, india America relation, trade,
रशिया-चीन मैत्री घट्ट होणे भारतासाठी किती चिंताजनक? नवीन शीतयुद्ध विभागणीत भारताचे स्थान काय?
assain american hate
अमेरिकेत आशियाई वंशाच्या नागरिकांविरुद्ध द्वेष वाढत आहे का? सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
Exactly how many nuclear weapons does Pakistan have How much threat to India from them
विश्लेषण : पाकिस्तानकडे नेमकी किती अण्वस्त्रे आहेत? त्यांच्यापासून भारताला किती धोका?
Israel tank brigade seizes Palestinian control of the Rafah border between Egypt and Gaza forcing it to close
अमेरिकेकडून मदत थांबूनही इस्रायली रणगाडे राफामध्ये… युद्धविरामाची शक्यता मावळली? आणखी किती नरसंहार?
israel hamas ceasefire deal
Israel-Hamas War: हमासला शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य, इस्रायल-गाझा युद्ध थांबणार?
russia s use gps jamming technology against baltic sea countries
विश्लेषण: ‘जीपीएस जॅमिंग’ म्हणजे काय? रशियाकडून या तंत्रज्ञानाचा बाल्टिक देशांविरोधात वापर?

हेही वाचा… Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?

इसफाहानच का?

इसफाहान हे इराणचे ऐतिहासिक महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक सुंदर वास्तू असून, इराणमधील प्रमुख पर्यटनकेंद्र म्हणून ते ओळखले जाते. परंतु याबरोबरच या शहरात इराणचे काही लष्करी तळही आहेत. इराणचे क्षेपणास्त्रविकास संशोधन प्रकल्प याच शहरात वसलेले आहेत. मर्यादित स्वरूपात अणुसंशोधनही या शहरातच चालते. येथून जवळच इराणचे युरेनियम समृद्धीकरण प्रकल्पही आहेत. त्यामुळे जगाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी आणि इराणला हादरा देण्यासाठी इस्रायलने या शहराला लक्ष्य केले असावे, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही या शहरावर इस्रायलकडून ड्रोन हल्ला झाला होता.

इराणची बचाव यंत्रणा किती सक्षम?

रशिया आणि चीनच्या मदतीने इराण गेली काही वर्षे क्षेपणास्त्र आणि ड्रोनविरोधी बचाव यंत्रणा मजबुतीकरणावर भर देत आहे. खुद्द इसफाहान शहरातही इराणकडे रशियन बनावटीची एस-३०० ही क्षेपणास्त्र व हवाई बचाव प्रणाली सज्ज असल्याचे वृत्त आहे. बवर-३७३ ही इराणने स्वबळावर विकसित केलेली क्षेपणास्त्र विकसित प्रणाली आहे. ४०० किलोमीटर दूरपर्यंत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, ड्रोन आदि लक्ष्यनिर्धारणाची या यंत्रणेची क्षमता आहे. ही यंत्रणा एस-३०० पेक्षा अधिक सक्षम असल्याचा इराणी लष्कराचा दावा आहे. याशिवाय रशियन तोर ही बजाव प्रणाली इराणकडे आहे. तसेच मध्यम व लघू पल्ल्याचे काही क्षेपणास्त्रेही इराण बाळगून आहे. या देशाचे हवाईदल मात्र इस्रायलच्या तुलनेत फारच कुचकामी आहे. तरीही गेल्या काही वर्षांमध्ये स्वबळावर क्षेपणास्त्रे व बचाव प्रणाली विकसित केल्यामुळे इराण धोकादायक बनला आहे.

हेही वाचा… मतदानावेळी बोटाला लावली जाणारी निळी शाई आली कुठून? बोटावरून का जात नाही?

सध्याचे हल्ले निव्वळ प्रतीकात्मक?

इराणने इस्रायलवर केलेले ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले किंवा इस्रायलने त्यास नुकतेच दिलेले प्रत्युत्तर हे दोन्ही प्रचंड नुकसानकारी ठरलेले नाही. त्यामुळे दोन्हींचा उद्देश निव्वळ प्रतीकात्मक आणि प्रतिस्पर्ध्याच्या मनात धडकी भरवण्यापुरता मर्यादित आहे का, यावर चर्चा सुरू आहे. इस्रायली भूमीवर इराणने प्रथमच प्रत्यक्ष हल्ला केला. इस्रायलने मात्र यापूर्वी इराणच्या भूमीवर छुपे हल्ले लष्करी आणि सायबर माध्यमातून केलेले आहेत. इस्रायलवर थेट क्षेपणास्त्र हल्ले करणे इराणला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. परंतु इराणने इस्रायलच्या भोवताली बंडखोरांचे गट पेरून ठेवले आहेत. गाझामध्ये हमास, लेबनॉन, तसेच सीरियामध्ये हेझबोला हे गेल्या काही वर्षांमध्ये आणि येमेनमध्ये हुथी बंडखोर हे अलीकडे इस्रायली आस्थापनांवर हल्ले करत राहतात. इराण याच प्रकारे युद्ध खेळून इस्रायलला नुकसान पोहोचवू शकतात. या टापूत अमेरिकी अनेक वर्षे सक्रिय आहे आणि अरब देशांचेही इराणशी सख्य नाही. त्यामुळे इराणला फारसे मित्र नाहीत. अरबांचे आणि इस्रायलचे फार सख्य नसले, तरी अलीकडे विशेषतः सौदी अरेबिया, इजिप्त, यूएई, कतार, जॉर्डन या अरब देशांनी इस्रायलशी मर्यादित प्रमाणात जुळवून घेतले आहे. या परिस्थितीत इस्रायलला इराणवर थेट हल्ले करणे अधिक सोपे आहे. पण इराण इस्रायलच्या कुरापती काढू शकतो. शिवाय या विशाल तेल उत्पादक टापूमध्ये इराण समर्थित बंडखोरांनी उच्छाद मांडल्यास त्याचा तेल निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

इराण-इस्रायल इतके हाडवैर का?

खरे तर इस्रायलचे सर्वाधिक वेळा युद्ध अरब देशांशी झाले. परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये अरब देशांऐवजी इराणलाच इस्रायल क्रमांक एकचा शत्रू मानतो. इराणचीही यापेक्षा वेगळी भावना नाही.१९५० सालापासून दोन्ही देशांमध्ये मित्रत्वाचे संबंध होते. मात्र इराणचे अखेरचे सम्राट शहा मोहम्मद रझा पेहलवी यांची सत्ता इस्लामी क्रांतीने १९७९ साली उलथविली गेली आणि इस्रायल-इराणचे संबंध बिघडले. इराणच्या नव्या राज्यकर्त्यांनी इस्रायलला शत्रुराष्ट्र घोषित केले. त्यानंतर इस्रायलविरुद्ध गनिमी युद्ध खेळण्यासाठी इराणने आखातामधील विविध देशांतील दहशतवादी संघटनांना बळ दिले. पॅलेस्टाइनमधील हमास व लेबनॉनमधील हेझबोला ही त्याची दोन प्रमुख अंगे बनली. याखेरीज सीरिया आणि इराकमधील अतिरेकी संघटनांनाही इराणची मदत होते. दुसरीकडे इराणचा अणुकार्यक्रम थांबविणे किंवा शक्य तितका लांबविणे हे इस्रायलचे धोरण असल्यामुळे दोन्ही देशांतील तणावात भर पडली आहे. हेझबोला आणि हमासला इराणकडून रॉकेटपुरवठा होतो आणि त्यामुळे आपला प्रदेश असुरक्षित होतो, अशी इस्रायलची तक्रार आहे. इस्रायलने इराणच्या अनेक अणुशास्त्रज्ञांना आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना छुपे वा थेट हल्ले करून ठार केले आहे. हा इस्रायलचा थेट हस्तक्षेप असल्याचे इराणचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही देश परस्परांविरुद्ध अस्तित्वाची लढाई लढण्याच्याच तयारीत असतात.

हेही वाचा… मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?

अमेरिकेची धोरणात्मक चूक

पहिल्या दशकात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी महत्प्रयासाने इराणशी चर्चा करून त्या देशाला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले. इराणवरील निर्बंध दूर करण्याच्या बदल्यात त्या देशाला अण्वस्त्रविकास कार्यक्रम टप्प्याटप्प्याने आवरता घेण्याबाबत राजी केले. यासाठी युरोपिय समुदाय आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील इतर स्थायी सदस्यदेशांनाही बरोबर घेतले. पण २०१६मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घडीच विस्कटून टाकली. करार रद्द केला आणि इराणला पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यासाठी इराणचा आणखी एक शत्रू सौदी अरेबियाला हाताशी घेतले. इराण करार नेतान्याहू यांना कधीच मान्य नव्हता. त्यांनीही ट्रम्प आल्यावर इराणशी शत्रुत्वाचा कंड शमवून घेतला. ट्रम्प, नेतान्याहू आणि सौदी अरेबिया यांच्या त्रिकुटाने इराण कराराचे मातेरे केले. आज हाच इराण युद्धखोर बनला आहे. त्याच्या विरोधातील इस्रायलही शिरजोर झाला आहे. आणि या मित्रदेशाला आवरण्याची किंवा संभाव्य युद्धाचा भडका थोपवण्याची क्षमता अमेरिकेमध्ये राहिलेली नाही.