करदात्यांना इनकम टॅक्स रिटर्नसाठी अर्ज करायचा म्हटलं की त्यासाठीच्या अनेक अर्जांमधून योग्य अर्ज निवडणं आणि त्यानंतर त्यातील किचकट माहिती भरणं हे आव्हानच असतं. मात्र, आता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) करदात्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी ‘वन नेशन, वन आयटीआर फॉर्म’चा प्रस्ताव दिला आहे. तसेच या प्रस्तावावर प्रतिक्रिया मागवल्या आहेत. १५ डिसेंबरपर्यंत नागरिकांना या प्रस्तावावर आपली मतं नोंदवता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘वन नेशन, वन आयटीआर फॉर्म’चा प्रस्ताव नेमका प्रस्ताव काय आहे, यामुळे करदात्यांना नेमका काय फायदा होणार याचा हा आढावा…

सद्यस्थितीत वेगवेगळ्या करदात्यांना वेगवेगळे अर्ज करावे लागतात. त्यासाठी सर्वात आधी अनेक आयटीआर अर्जांमधून योग्य अर्ज निवडावा लागतो आणि त्यानंतर त्यातील किचकट माहिती भरावी लागते. सध्या वेगवेगळ्या वर्गवारीसाठी असे एकूण सात आयटीआर अर्ज आहेत. मात्र, आता ही व्यवस्था बदलून एकच आयटीआर अर्जाचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे हे असंख्या अर्ज बाद होऊन ही प्रक्रिया सुटसुटीत होणार आहे. याला अर्ज क्रमांक ७ मात्र अपवाद असणार आहे, अशीही माहिती सीबीडीटीने दिलीय.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

वर्तमान स्थितीत कोणते सात अर्ज?

१. अर्ज एक – या अर्जाचं नाव ‘सहज’ असं आहे. हा अर्ज लहान आणि मध्यम करदात्यांसाठी आहे. पगार, संपत्ती किंवा इतर मार्गाने ज्या व्यक्तींचं उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत होतं त्यांच्यासाठी हा अर्ज आहे.

२. अर्ज दोन – हा अर्ज रेसिडेन्शिअल प्रॉपर्टीतून (residential property) होणाऱ्या उत्पन्नासाठी आहे.

३. अर्ज तीन – ज्यांचं उत्पन्न व्यवसायातील नफ्याच्या स्वरुपात आहे त्यांच्यासाठी हा अर्ज आहे.

४. अर्ज चार – या अर्जाचं नाव ‘सुगम’ असं आहे. हा अर्जही अर्ज क्रमांक १ (सहज) प्रमाणेच सोपा आहे. हा अर्ज ५० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या हिंदू कुटुंबातील व्यक्तींकडून भरला जातो.

५. अर्ज पाच – हा अर्ज लिमिटेड लायबिलिटीज पार्टनरशिप (LLPs) आणि व्यवसायासांठी आहे.

६. अर्ज सहा – हाही अर्ज लिमिटेड लायबिलिटीज पार्टनरशिप (LLPs) आणि व्यवसायासांठी आहे.

७. अर्ज सात – हा अर्ज विश्वस्त संस्था आणि स्वयंसेवी संस्था (NGOs) भरतात.

असं असलं तरी सध्या करदात्यांमध्ये सर्वाधिक वापर असलेला अर्ज १ (सहज) आणि अर्ज ४ (सुगम) हे रद्द होणार नाहीत. या अर्जाचा वापर करणाऱ्यांना जुने अर्ज किंवा नव्या अर्जाचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ते अर्ज १ आणि ४ किंवा नव्या अर्जाचा वापर करू शकतात.

नवा आयटीआर अर्ज आणण्याचं कारण काय?

आयटीआर अर्जाबाबत आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा अभ्यास करून हा नवा प्रस्ताव आणण्यात आला आहे. याचा उद्देश करदात्यांना अर्ज भरणं सोपं करणं आणि अर्ज भरण्यातील त्यांचा वेळ वाचवणं हा आहे.

हेही वाचा : Income Tax Return : मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी ITR भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? जाणून घ्या

हा नवा अर्ज कसा आहे?

माध्यमांमधील वृत्तांनुसार, आयटीआर रिटर्नचा नवा अर्ज सद्यस्थितीतील सात पैकी सहा अर्ज एकत्रित करून तयार करण्यात आला आहे. या नव्या अर्जात करदात्यांना केवळ ३० प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली की तुमचा अर्ज पूर्ण होईल. असं असलं तरी या प्रश्नांची उत्तरं देताना करदात्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण याच उत्तरांवर त्यांचा अर्ज तयार होणार आहे.