भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन इतिहास रचला. हा इतिहास रचणारे ते पहिले बिगरकाँग्रेसी नेते व जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे दुसरे नेते ठरले आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला यंदा बहुमताचा आकडा पार करता आला नाही. परंतु, भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) बहुमतासाठी लागणार्‍या २७२ जागांचा निम्मा टप्पा ओलांडला आहे. पंतप्रधान म्हणून मोदींना मिळणारे वेतन किती? त्यांना कोणकोणत्या सोई-सुविधा मिळतात? कोणत्या जागतिक नेत्याला सर्वाधिक वेतन मिळते? याविषयी जाणून घेऊ या.

पंतप्रधानांचा पगार किती?

भारताच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेत पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी देशातील अत्यंत महत्त्वाचे पद भूषवितात. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान निर्णय घेतात. पंतप्रधान पदाच्या जबाबदारीविषयी अनेकांना माहीत आहे; परंतु त्यांना या पदासाठी किती वेतन मिळते, याची कल्पना अनेकांना नाही. पंतप्रधानांना दरमहा १.६६ लाख रुपये पगार मिळतो; जो वर्षाला अंदाजे २० लाख रुपये असतो. या रकमेत मूळ वेतन ५० हजार रुपये, खर्च भत्ता तीन हजार रुपये, संसदीय भत्ता ४५ हजार रुपये व दैनिक भत्ता दोन हजार रुपये आहे. विशेष म्हणजे मोदींनी त्यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले तेव्हा त्यांनी बाँड, डिबेंचर, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये कोणतीही गुंतवणूक न करता, त्यांची वैयक्तिक मालमत्ता ३.०२ कोटी रुपयांची असल्याचे जाहीर केले होते.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
nitin gadkari on constitution
संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Top leaders including Prime Minister Home Minister and Priyanka Gandhi are touring Vidarbha
गृहमंत्री शहा यांचा दौऱ्यात नक्सली एलिमेंट नजरेत,शहा चहा घेत नाही म्हणून मग,,,
Nitin Gadkari, Chinchwad Constituency, Shankar Jagtap,
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एलिव्हेटेड रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?

हेही वाचा : सत्तास्थापनेसाठी चंद्राबाबूंनी केली राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी? विशेष दर्जा मिळणे म्हणजे काय?

त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या उत्पन्नाचे दोन स्रोत आहेत. एक म्हणजे पंतप्रधान कार्यालयातील पगार आणि दुसरे म्हणजे व्याज उत्पन्न.पंतप्रधानांच्या तुलनेत, देशाच्या राष्ट्रपतींचा पगार जास्त आहे. देशाच्या राष्ट्रपतींचा दरमहा पगार पाच लाख रुपये आहे. २०१८ मध्ये राष्ट्रपतींचा पगार १.५ लाख रुपये होता. भारताच्या उपराष्ट्रपतींचे वेतनदेखील चार लाख रुपये आहे. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार खासदारांचे मूळ वेतन एक लाख रुपये आहे. खासदारांना शेवटची पगारवाढ २०१८ मध्ये मिळाली होती. खासदारांना वेतनाशिवाय दैनंदिन भत्ताही मिळतो; जो दर पाच वर्षांनी वाढतो.

पंतप्रधानांना कोणत्या सुविधा मिळतात?

पगाराव्यतिरिक्त पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना अनेक सरकारी सुविधाही मिळतात. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अधिकृत सरकारी निवासस्थान. अधिकृत सरकारी निवासस्थानासह त्याचे भाडे आणि घरखर्चही मिळतो. तसेच त्यांना भत्तेही मिळतात. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षा आणि अधिकृत भेटींसाठी एअर इंडिया वन आणि अन्य विमानांचीही सुविधा मिळते. पंतप्रधान केवळ मर्सिडीझ-बेंझ एस ६५० आणि रेंज रोव्हर यांसारख्या बुलेटप्रूफ गाड्यांमधून प्रवास करतात. या गाड्या एके-४७ रायफलचा हल्लाही रोखू शकतात. पंतप्रधानांच्या निवृत्तीनंतर त्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी मोफत निवास, वीज, पाणी आणि अगदी एसपीजी सुरक्षा प्रदान केली जाते.

कोणत्या जागतिक नेत्यांना सर्वाधिक पगार?

मिळालेल्या महितीनुसार सिंगापूरचे पंतप्रधान जागतिक नेत्यांमध्ये सर्वाधिक पगार घेतात. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांना वर्षाला तब्बल २.२ दशलक्ष डॉलर्स (१८.३७ कोटी रुपये) मिळतात. हाँगकाँगचे जॉन ली का-चिउ सर्वाधिक पगार मिळविणाऱ्या जागतिक नेत्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ‘साऊथ चायना मॉर्निंग’ पोस्टच्या मते, ते वर्षाला अंदाजे ६,७२,००० डॉलर्स (५.६१ कोटी रुपये) कमावतात.

स्वित्झर्लंडचे नेते या यादीत पुढे आहेत आणि त्यांना वर्षाला ४,९५,००० डॉलर्स (४.१३ कोटी रुपये) पगार दिला जातो. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे वार्षिक ४,००,००० डॉलर्स (रु. ३.३४ कोटी) एवढा मोठा पगार घेतात. त्याशिवाय त्यांना व्हाईट हाऊस आणि एअर फोर्स वन यांसारख्या अत्यंत आलिशान सुविधादेखील दिल्या जातात. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक येतो. पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांना प्रतिवर्ष सुमारे ५,५०,००० डॉलर्स इतके वेतन मिळते.

हेही वाचा : इंडिया आघडीने संसदेत विरोधी बाकावर बसणे का निवडले? विरोधकांचं पुढचं पाऊल काय असेल?

तसेच, ऋषी सुनक यांच्या वैयक्तिक संपत्तीनुसार ते ब्रिटनचे सर्वांत श्रीमंत पंतप्रधान आहेत. त्यांचे वार्षिक वेतन २,१२,००० डॉलर्स (१.७७ कोटी रुपये) आहेत. लंडनमधील १० डाऊनिंग स्ट्रीट येथील पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि बकिंगहॅमशायरमधील चेकर्स येथील ग्रामीण भागातील निवासस्थान वापरण्याचाही त्यांना अधिकार आहे. चीनचे पंतप्रधान म्हणून शी जिनपिंग यांचे वेतन किती, हा आकडा अद्याप स्पष्ट नाही. परंतु, २०१५ मध्ये त्यांनी स्वतःला आणि उच्च अधिकाऱ्यांना ६२ टक्के वेतनवाढ दिल्याची बातमी आली होती.