नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नेटो) या लष्करी संघटनेचा आजवरचा सर्वांत मोठा युद्धसराव जानेवारीपासून सुरू आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच थेट रशियाचा धोका समोर ठेवून ‘नेटो’ने अशा प्रकारची आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. या युद्धसरावाची वेळ, ठिकाण आणि आकार एवढा प्रचंड आहे, की त्यामुळे पुन्हा एकदा रशिया आणि युरोपमध्ये आगोदरच असलेला तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युद्धसरावाचे स्वरूप कसे आहे?

‘स्टेडफास्ट डिफेंडर २०२४’ हा ‘नेटो’चा शीतयुद्ध संपल्यानंतरचा आजवरचा सर्वांत मोठा युद्धसराव आहे. ‘नेटो’च्या सर्व ३२ सदस्य देशांचे तब्बल ९० हजार सैनिक सहभागी होत आहेत. ‘नेटो’ सदस्य देशांवरील हल्ल्याची संभाव्य ठिकाणे डोळ्यासमोर ठेवून युद्धसरावाचे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. रशियाचा सर्वाधिक धोका ‘नॉर्डिक’ देशांना (नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क, स्वीडन, आईसलँड) असल्याचे मानले जात असून सरावामध्ये या भागाचाही समावेश करण्यात आला आहे. ‘स्टेडफास्ट’च्या या टप्प्यात नॉर्वेमधील फिनमार्क या भागातील बर्फाळ प्रदेशातील सराव नुकताच सुरू झाला. विशेष म्हणजे हे ठिकाण रशियाच्या सीमेपासून अवघ्या १२० किलोमीटर अंतरावर आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत विविध टप्प्यांमध्ये हा युद्धाभ्यास केला जाणार आहे.

How Israel is fighting war on four fronts
इराण, हेझबोला, हमास, हुथी… चार आघाड्यांवर लढण्याची इस्रायलची क्षमता किती? या संघर्षाचा अंत कधी?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
war Iran Israel
विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?
freedom party Austria
ऑस्ट्रियामध्ये राजकीय भूकंप… ‘नाझी’वादाची पार्श्वभूमी असलेला अतिउजवा पक्ष सत्तेच्या वाटेवर… युरोपचा राजकीय रंगमंच बदलणार?
loksatta analysis why terrorism not ending
विश्लेषण : दहशतवाद संपुष्टात का येत नाही?
Russia interpreted the change as a warning to the West
बदलातून पाश्चिमात्य देशांना इशारा; रशियाचे स्पष्टीकरण
Hezbollahs influence hasan nasarullah
“लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?
America Britain weapons supply ukraine
विश्लेषण: अमेरिका, ब्रिटनकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांची संजीवनी… रशियाविरुद्धचे युद्ध निर्णायक टप्प्यावर?

हेही वाचा : विश्लेषण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील प्रतिनिधी सभेचे महत्त्व काय? यंदा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी काय दिशादर्शन?

‘स्टेडफास्ट’चे उद्दिष्ट काय आहे?

‘नेटो’च्या संकेतस्थळावर या युद्धाभ्यासाचे उद्दिष्ट अतिशय स्पष्ट शब्दांत स्पष्ट करण्यात आले आहे. ‘नेटोच्या प्रभावक्षेत्रातील इंचन् इंच जमिनीचे रक्षण करण्याची क्षमता आणि संघटनेतील मित्रराष्ट्रांची एकमेकांचे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करण्याची वचनबद्धता दर्शविण्यासाठी’ हा युद्धाभ्यास होत असल्याचे यात म्हटले आहे. ‘ओकॅसस’ नावाच्या काल्पनिक शत्रूने घुसखोरी केली आहे, असे गृहित धरून सराव केला जात आहे. मात्र याचे उद्दिष्ट केवळ संरक्षणाचे नसून दळणवळणाची सिद्धता अभ्यासणे हेदेखील आहे. ‘नेटो’मधील एखाद्या देशावर असा हल्ला झाला, तर शस्त्रास्त्रे व सैनिकांची कुमक तातडीने त्या भागात कशी पाठविता येईल, हा ‘स्टेडफास्ट’चा महत्त्वाचा उद्देश आहे. युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर तेथे युद्धसाहित्य पाठविण्यास विलंब झाल्यामुळे रशियाचे सैन्य बरेच पुढे येऊ शकले होते. अर्थात, युक्रेन हा ‘नेटो’चा सदस्य नसल्यामुळे त्या देशाला मदत पाठविण्यात तांत्रिक अडचणी होत्या. ‘नेटो’च्या घटनेनुसार एका देशावरील हल्ला हा सर्वांवर मानला जावा व त्याचा एकत्र प्रतिकार करावा हे अपेक्षित आहे. त्यामुळे घुसखोरी झालेल्या भागात युक्रेनप्रमाणे अडचणी येण्याची शक्यता नसली, तरीही शक्य तितक्या लवकर मदत पोहोचावी या उद्देशाने ‘स्टेडफास्ट’ची आखणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला का? बीडचे मैदान कितपत आव्हानात्मक? 

युद्धसरावाबाबत रशियाची प्रतिक्रिया काय?

युद्धाभ्यासाची घोषणा करताना ‘नेटो’ने रशियाचे नाव कुठेही घेतले नसले, तरी त्याची उद्दिष्टे, त्यात समाविष्ट करण्यात आलेले घटक याचा विचार करता रशियाचा धोका डोळ्यासमोर ठेवूनच हा सराव होत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळेच याबाबत रशियाने अपेक्षप्रमाणे निषेधाचा सूर लावला आहे. रशियाचे परराष्ट्र उपमंत्री अलेक्झांडर ग्रुश्को यांनी सरकारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ‘हा युद्धसराव म्हणजे जगाला पुन्हा शीतयुद्धाच्या काळात घेऊन जाणे आहे,’ अशा शब्दांत ‘नेटो’वर तोफ डागली. पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियाविरोधात छेडलेल्या ‘मिश्रयुद्धा’चा (हायब्रीड वॉर) हा आणखी एक घटक असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थात, रशियाची ही प्रतिक्रिया अपेक्षितच असली तरी त्यावर पुतिन लगेच काही पाऊल उचलण्याची शक्यता नाही. पण कधी ना कधी ही वेळ येणारच असे युरोप मानून चालला आहे.

हेही वाचा : विश्लेषण : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांचे सर्वांत मोठे देणगीदार कोण?

रशियापासून खरोखर धोका किती?

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धामुळे रशियाचे सैन्य थकले आहे. ‘वॅग्नर गटा’चा फसलेल्या बंडानंतर हे खासगी लष्कर आता व्लादिमिर पुतिन यांच्या दिमतीला नाही. त्यामुळे रशिया एखाद्या ‘नेटो’ सदस्य देशावर लगेचच हल्ला करेल, अशी शक्यता नाही. मात्र युक्रेननंतर ‘नेटो’ सदस्य असलेल्या नॉर्डिक किंवा बाल्टिक (एस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया) देशांकडे पुतिन यांची वक्रदृष्टी आज ना उद्या वळणार, याची युरोपातील युद्ध धोरणकर्त्यांना खात्री आहे. युक्रेनमध्ये युद्ध रेंगाळल्यामुळे उलट युरोपला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाल्याचे त्यांचे मत असून या वेळेचे ‘सदुपयोग’ करण्याचा आग्रह नॉर्डिक देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी धरला आहे. ‘स्टेडफास्ट डिफेंडर’ हा या तयारीमधील अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. कारण ‘नेटो’ने प्रथमच थेट रशियाचा धोका गृहित धरून धोरणे आखायला सुरुवात केली आहे. फिनलंड आणि त्यापाठोपाठ स्वीडनला ‘नेटो’चे सदस्यत्व मिळण्यामागेदेखील हाच रशियाचा संभाव्य धोका आहे. दोन्ही महायुद्धांच्या काळात सुरुवातील सर्वाधिक झळ ही युरोपातील या छोट्या राष्ट्रांनाच बसली आहे. या इतिहासावरून धडा घेत हे देश संरक्षणाच्या तयारीत गुंतले असतील, तर त्यात नवल नाही.

amol.paranjpe@expressindia.com