एनसीईआरटीच्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमविषयक उच्चस्तरीय समितीने ‘इंडिया’ च्या जागी ‘भारत’ हे नाव वापरण्याची सूचना २०२२ साली केली होती. “आम्ही आशा करतो की पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल, परंतु हे सर्व NCERT वर अवलंबून आहे,” असे समितीच्या अध्यक्षांनी त्यावेळेस नमूद केले होते.

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (NCERT) च्या २०२२ सालच्या सामाजशास्त्र विषयक अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या उच्चस्तरीय समितीने सुचवले आहे की, इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व समाजशास्त्र पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असे संबोधले जावे. “आम्हाला आशा आहे की, पुढील शैक्षणिक वर्षापासून हे लागू केले जाईल, परंतु हे सर्व NCERT वर अवलंबून आहे,” असे समितीचे अध्यक्ष प्रा. सी. आय. इसाक यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

अधिक वाचा: पांडव-कौरव नाही तर ‘हे’ होते महाभारताच्या युद्धाला कारणीभूत?

नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राच्या नावाबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, जेव्हा राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या मेजवानीच्या अधिकृत निमंत्रणात नेहमीच्या ‘इंडियाचे राष्ट्रपती’ या ऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असा उल्लेख करण्यात आला. तेव्हापासून, ‘इंडिया’ वरून ‘भारत’ असे ‘नाम-परिवर्तन’ झाल्याची चर्चा सुरू झाली.

‘भारत’ किंवा ‘भारतवर्षा’ची मुळे पुराण साहित्यात आणि महाभारतात सापडतात. पुराणांमध्ये भारताचे वर्णन “दक्षिणेत समुद्र आणि उत्तरेकडील बर्फाचे निवासस्थान” यांच्यामधील भूमी असे केले आहे. भरत हे आख्यायिकेप्रमाणे प्राचीन राजाचे नाव आहे, ‘जो भरतांच्या ऋग्वेदिक जमातीचा पूर्वज होता आणि विस्ताराने, उपखंडातील सर्व लोकांचा पूर्वज होता.
जवाहरलाल नेहरू यांनी “भारताच्या मूलभूत एकात्मतेचा” उल्लेख केला होता (जानेवारी १९२७), जे आदिम काळापासून टिकून आहे, भारताची एकता ही समान श्रद्धा आणि संस्कृतीमुळे टिकून आहे. पंडित नेहरूंनी नमूद केल्याप्रमाणे इंडिया म्हणजे भारत ही हिंदूंची पवित्र भूमी होती. (Selected Works Vol. 2)

अधिक वाचा: मृत्यूनंतर खरंच जीवन आहे का? काय सांगतेय नवीन संशोधन?

‘इंडिया’ आणि ‘हिंदुस्थान’चे काय?

हिंदुस्थान हे नाव मूलतः सिंधू या शब्दापासून आले आहे , पर्शियन भाषेत सिंधूचे हिंदू झाले. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्यांना हिंदू म्हणून संबोधण्यात आले. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात अकेमिनाईड साम्राज्याने सिंधू नदीचे खोरे हस्तगत केले होते, तेंव्हापासून सिंधूचे हिंदू झाले असावे असे मानले जाते. अकेमिनाईड्स यांनी खालच्या सिंधू खोऱ्यासाठी हिंदू शब्द वापरला, साधारणत: इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून हिंदूंच्या पुढे स्थान लावण्यात येवू लागले. अकेमिनाईड्स साम्राज्याकडून ‘हिंद’चे ज्ञान घेतलेल्या ग्रीक लोकांनी ‘इंडस’ असे नाव केले. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात मॅसेडोनियन राजा अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले तोपर्यंत ‘इंडिया’ हा सिंधूच्या पलीकडील प्रदेश म्हणून ओळखला जाऊ लागला होता.

मुघलांच्या सुरुवातीच्या काळात (१६ वे शतक), संपूर्ण इंडो-गँजेटिक खोऱ्याचे (गंगेचे खोरे) वर्णन करण्यासाठी ‘हिंदुस्तान’ हे नाव वापरले जात असे. हिंदुस्थान ही संज्ञा संपूर्ण दक्षिण आशियातील मुघल सम्राटाचा प्रदेश दर्शवण्यासाठी वापरात होता. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून, ब्रिटिश नकाशांमध्ये ‘इंडिया’हे नाव अधिकाधिक वापरण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे ‘हिंदुस्थान’ने संपूर्ण दक्षिण आशियाशी आपला संबंध गमावला. “इंडिया शब्दाचा अवलंब करणे सूचित करते की वसाहतवादी नामकरणाने दृष्टीकोनातील बदलांचे संकेत कसे दिले आणि उपखंडाला एकच, सीमावर्ती आणि ब्रिटिश राजकीय प्रदेश म्हणून समजून घेण्यास मदत केली,” असे इतिहासकार इयान जे बॅरो यांनी त्यांच्या ‘फ्रॉम हिंदूस्थान टू इंडिया: नेमिंग चेंज इन चेंजिंग नेम्स’ (२००३) या लेखात लिहिले आहे.

संविधान सभेने काय निर्णय घेतला?

“इंडिया, म्हणजेच भारत, राज्यांचे संघराज्य असेल.” अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकची पहिली ओळ आहे. पण हा वादविवाद न होता स्वीकारला गेला. काहींनी ‘भारत’ हे देशाचे प्राथमिक नाव अधोरेखित करण्याचा आग्रह धरला. आयरिश राज्यघटनेचे उदाहरण देऊन, हरी विष्णू कामथ यांनी असा युक्तिवाद केला की ‘इंडिया’ हा केवळ ‘भारत’चा इंग्रजी अनुवाद आहे. “आयरिश फ्री स्टेटच्या संविधानात असे लिहिले आहे: “राज्याचे नाव आयर आहे किंवा इंग्रजी भाषेत आयर्लंड आहे,” कामथ म्हणाले.

अधिक वाचा: ‘भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल, इंग्रजांची झाली होती उपासमार’!

इतर, जसे की हरगोविंद पंत यांनी, “भारतवर्ष हवे होते आणि दुसरे काही नाही. आपल्या देशाला हे नाव परकीयांनी दिले होते, ज्यांनी या भूमीची संपत्ती ऐकून मोहात पडून आपल्या देशाची संपत्ती मिळवण्यासाठी आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले होते, हे आपल्याला माहीत असले पाहिजे. तरीही आपण ‘इंडिया’ या शब्दाला चिकटून राहिलो तर परकीय राज्यकर्त्यांनी आपल्यावर लादलेल्या या अपमानास्पद शब्दाची आपल्याला लाज वाटत नाही, हेच दिसून येईल,” असा युक्तिवाद केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण शेवटी समितीने ‘इंडिया, म्हणजेच भारत’ स्वीकारला. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब. आंबेडकर यांनी सभ्यताविषयक वादविवाद आणि भारताच्या गतवैभवाचे आवाहन नाकारले. “आता बरेच काम करायचे आहे…” डॉ आंबेडकरांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी सांगितले होते.