आता चक्क सिगारेटवरही सावधानतेचा इशारा… कॅनडात सिगारेटविषयी नवे नियम काय आहेत?

आसिफ बागवान

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

सिगारेट ओढू नका, त्याचे व्यसन अपायकारक आहे, त्यातून कर्करोगाचा धोका संभवतो, असे कितीही धोक्याचे इशारे दिले तरी सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. त्यातून कर्करोग, हृदयरोग बळावलेल्यांची आणि त्याचे बळी ठरलेल्यांची संख्याही दरवर्षी वाढत आहे. धूम्रपान सेवनाची सर्वाधिक शिकार सध्याची तरुण पिढी ठरत आहे. त्यांना परावृत्त करण्यासाठी विविध उपाययोजना आणि नियमही राबवले जातात. त्यातलाच एक प्रयत्न कॅनडा या देशाने केला आहे. तो प्रयत्न काय आणि त्यांचे काय परिणाम अपेक्षित आहेत, याचा हा आढावा.

कॅनडामध्ये लागू झालेले नवीन नियम काय आहेत?

कॅनडा सरकारने देशात विक्री होणाऱ्या प्रत्येक सिगारेटवर ‘सावधानतेचा इशारा’ झळकवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तंबाखू सेवन अल्पवयीनांसाठी हानीकारक आहे’, ‘सिगारेटमुळे रक्ताचा किंवा हाडांचा कर्करोग होतो’, ‘प्रत्येक झुरक्यात विष’ अशी वाक्ये सिगारेटच्या पाकिटांखेरीज सिगारेटवरही छापावी लागणार आहेत. इंग्रजी आणि फ्रेंच या दोन भाषांत हा वैधानिक इशारा छापावा लागणार आहे. आतापर्यंत सिगारेटच्या पाकिटांवर वैधानिक इशारे छापण्यात येत होते. मात्र, सिगारेटच्या कांडीवर असे इशारे प्रसिद्ध करणारे कॅनडा हा जगातला पहिला देश ठरला आहे.

असे नियम बनवण्याची वेळ का?

कॅनडामध्ये सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि अकाली मृत्यू यांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. या जाळ्यात तरुणवर्ग अधिक प्रमाणात ओढला जात असून त्याला परावृत्त करण्यासाठी कॅनडा सरकारने सिगारेटच्या कांडीवर वैधानिक इशारा छापण्यासह आणखी काही उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली असली तरी, त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी एक ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. सिगारेट उत्पादक, वितरक, विक्रेते यांना पुरेसा वेळ देण्यासाठी अमलबजावणी तीन महिने लांबणीवर टाकण्यात आली आहे.

याचा काय परिणाम होण्याची अपेक्षा?

सिगारेटच्या पाकिटांवर वैधानिक इशारे दिले जातात. मात्र, त्याकडे सिगारेट सेवन करणाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होते. अनेक विक्रेते सुट्या सिगारेटची विक्री करतात. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांपर्यंत सिगारेटचे धोके सांगणारा वैधानिक इशारा पोहोचत नाही. आता मात्र, सिगारेटच्या कांडीवरच हा इशारा छापण्यात येणार असल्याने व्यसन करणाऱ्यांना त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

हे नियम खरेच उपयुक्त ठरतील?

सिगारेट व्यसनाचे वाईट परिणाम जगजाहीर आहेत. अल्पवयातच सिगारेट सेवनाचे व्यसन जडत असल्यामुळे कमी वयात कर्करोग, हृदयरोग यासारख्या आजारांना तरुण पिढी बळी पडत आहे. या पिढीला सिगारेटपासून परावृत्त करण्यासाठी जे काही करता येईल, ते करण्याचे सरकारांचे प्रयत्न असतात. सिगारेटच्या पाकिटांवर त्याबद्दलच्या धोक्यांचा सचित्र इशारा दिलेला असता. मात्र, तरीही सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कॅनडामध्ये सिगारेटवर हे इशारे छापल्याने सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीसमोर ते प्रत्येक झुरका घेताना झळकतील. परंतु, ही केवळ औपचारिकता ठरेल. सिगारेटचे व्यसन रोखण्यासाठी यापेक्षाही कठोर उपाय राबवण्याची जगभरातील सर्वच देशांना गरज आहे.