अनीश पाटील

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) देशभर ऑपरेशन गोल्डन डॉन ही विशेष मोहीम राबवून सुदान देशाच्या सात नागरिकांसह एकूण ११ जणांना अटक केली होती. या कारवाईत आतापर्यंत ५३ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. म्यानमार, नेपाळ, बांगलादेश हा सोन्याच्या तस्करीचा नवा मार्ग तस्कर वापरत आहेत. त्याची पाळेमुळे खणण्यासाठी डीआरआयने राबवलेली ऑपरेशन गोल्डन डॉन ही विशेष मोहीम नेमकी काय होती, ते पाहूया.

Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

ऑपरेशन गोल्डन डॉन डीआरआयने कसे राबवले?

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी १९ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पाटणा रेल्वे स्थानकावरून सुदानच्या तीन नागरिकांना ताब्यात घेतले. हे मुंबईला जाणार होते. त्यांतील दोघांकडून ४० पाकिटांमध्ये ३७ किलो १२६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्यांनी त्यासाठी विशेष जॅकेट तयार करून त्यातील चोरकप्प्यांमध्ये सोने लपवले होते. तिसरा नागरिक तस्करांशी समन्वय ठेवणे व वाहतुकीची व्यवस्था करणे अशी कामे करत होता. याच विशेष मोहिमेअंतर्गत दोन सुदानी महिलांना पुण्यात पकडण्यात आले. त्या हैदराबाद येथून मुंबईत बसमार्गे जात होत्या. त्यांच्याकडून ५ किलो ६१५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. तिसऱ्या कारवाईत पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या दोन सुदानी नागरिकांना लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अडवण्यात आले. त्यांच्याकडील ४० पाकिटांमध्ये ३८ किलो ७६० ग्रॅम सोने सापडले. आरोपींनी कमरेला बांधलेल्या कोटात सोने लपवले होते. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयने कुर्ला व झवेरी बाजार येथे चार ठिकाणी छापे टाकले. त्यात सुमारे २० किलो २०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या कारवाईत ७४ लाख परदेशी चलन व ६३ लाख भारतीय चलनही जप्त करण्यात आले.

कुलाबा येथील सैफ सय्यद खान आणि शमशेर सुदानी हे दोघे भाऊ तस्करांकडून सोने खरेदी करून झवेरी बाजार येथील सोन्याचे व्यापारी मनीष प्रकाश जैन यांना विकत असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. आरोपींना तस्करीचे सोने वितळवून देण्याऱ्या २४ वर्षीय तरुणालाही अटक करण्यात आले. याप्रकरणी आतापर्यंत ५३ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले असून ११ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्यात सात सुदान देशातील नागरिकांचा समावेश आहे.

विश्लेषण: बेलारूसमध्ये ‘डावपेचात्मक अण्वस्त्रे’ ठेवण्याची रशियाची योजना काय? यामुळे युरोपमध्ये अणुयुद्धाचा धोका किती?

भारतात सोन्याची तस्करी कुठून होते?

भारतात होणाऱ्या तस्करीचे केंद्र दुबई आहे. वर्षानुवर्षे भारतात दुबईतूनच सोन्याची तस्करी होत आहे. पण आता त्याच्या मार्गांमध्ये बदल होत आहेत. सोन्याच्या तस्करीच्या या आंतरराष्ट्रीय टोळीत भारतासह अनेक देशांतील टोळ्यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियातून सोने दुबईला पाठवले जाते. ते छुप्या पद्धतीने विविध देशांतून भारतात पाठवले जाते. दिल्ली, मुंबई आणि कोलकता येथील अनेक टोळ्या दुबईच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग आहेत. त्या टोळ्या या धंद्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा कमवत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजही देशात येणारे सोने आखाती देशातूनच येते. मात्र, त्याचे जुने मार्ग बदलून ते म्यानमार, नेपाळ व बांगलादेशमार्गे भारतात आणले जाते.

म्यानमार, नेपाळ व बांगलादेशमार्गे सोन्याच्या तस्करीत वाढ किती?

डीआरआयने १ ते ४ डिसेंबर २०२२ या कालावधीत पाटण्यात तीन वेळा कारवाई करून सोने जप्त केले होते. त्यावेळी सुमारे साडेआठ किलो, चार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे पकडलेले तस्कर हे महाराष्ट्रातील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुवाहाटी आणि इंफाळ येथून दोन वेळा तस्करी केलेले सोने मिळाले होते. ते सोने म्यानमारमधील मोरेह सीमेवरून भारतात आणण्यात आले होते. तेव्हापासूनचे डीआरआय या नव्या मार्गावरून होणाऱ्या सोन्याच्या तस्करीचा माग घेत होती. डीआरआयने २०२१-२२ मध्ये तस्करीच्या माध्यमातून भारतात आलेले जितके सोने जप्त केले, त्यापैकी ३७ टक्के सोने म्यानमारमधून भारतात आले होते. देशात जप्त करण्यात आलेल्या बेकायदेशीर सोन्यांपैकी २० टक्के सोने आखाती देशांतून आले. तर ७ टक्के सोने बांगलादेशमार्गे भारतात पोहोचले. त्याचप्रमाणे ३६ टक्के सोने इतर देशांतून तस्करीच्या माध्यमातून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सोने तस्करांना नवा मार्ग सुरक्षित का वाटतो?

म्यानमारहून भारतात सोन्याची तस्करी करणे तुलनेने सोपे आहे. भारतातून म्यानमारच्या हद्दीत पाच किलोमीटर आत जाण्यावर कोणतेही बंधन नाही. फक्त ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ते दाखवून कोणीही म्यानमारमध्ये जाऊ शकतो. तेथून विविध वस्तूंची खरेदी करून लोक आरामात परत येतात. सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या टोळ्या त्याचा फायदा घेतात. एकतर म्यानमारमध्ये बसलेले तस्कर भारतात सोने पुरवतात किंवा येथील टोळ्या म्यानमारमधून सोने आणतात. विमानतळ व बंदरांच्या तुलनेत म्यानमार सीमेवर कमी तपासणी होते. तस्कर त्याचा वापर करत आहेत. तसेच नेपाळ व बांगलादेशमधूनही तुलनेने सोन्याची तस्करी करणे सोपे आहे.

विश्लेषण : २०२०-३० हे दशक जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सर्वात वाईट काळ? अर्थतज्ज्ञ का व्यक्त करतायत भीती?

भारतातील कोणत्या टोळ्या सोने तस्करीत सक्रिय आहेत?

सोन्याच्या तस्करीत पैसा गुंतवणाऱ्या मोठ्या टोळ्यांचा संबंध दिल्ली, मुंबई आणि कोलकता येथे असल्याचे सांगण्यात येते. म्यानमारहून सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबईतील व्यावसायिकांनाही यापूर्वी अटक करण्यात आले आहे. दुबईस्थित तस्करांशी त्यांचा संपर्क आहे. व्यापाऱ्यांकडून गरज असेल तेव्हा सोन्याची मागणी केली जाते. हवाला रॅकेटच्या माध्यमातून हा पैसा दुबईतील तस्करांपर्यंत पोहोचतो. सोन्याच्या तस्करीत काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सोने आयातीचा पर्याय असताना तस्करी का केली जाते?

सोन्याला भारतात मोठी मागणी आहे. सोने आयात करण्याचेही पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी सरकारने दिलेल्या परवान्याची आवश्यकता असते. आयातीवर सीमाशुल्क कर आणि इतर शुल्कासह सुमारे २५ टक्के शुल्क भरावे लागते. तसेच सोने आयात करण्यासाठी काळ्या पैशांचा वापर केल्यास अटक होऊ शकते. तस्करीमार्गे सोने भारतात आणले, तर तस्करांना एका किलोमागे लाखोंचा फायदा होतो. तसेच काळ्या पैशांचा वापरही तस्करीत करून काळा पैसा पांढरा करता येऊ शकतो. त्यामुळे आयातीचा पर्याय उपलब्ध असतानाही सोन्याची तस्करी केली जाते.