पाकिस्तानमध्ये येत्या ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. कारण याच निवडणुकीनंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान कोण असणार हे ठरवले जाईल. दरम्यान, या निवडणुकीत किती मतदार आहेत? पाकिस्तानने या निवडणुकीचे कसे नियोजन केलेले आहे? तसेच महागाई, आर्थिक, राजकीय अस्थिरता असताना सध्या पाकिस्तानमध्ये नेमकी स्थिती काय आहे? हे जाणून घेऊया…

१२८ दशलक्ष मतदार

पाकिस्तान हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जगातील पाचवा देश आहे. या देशाची एकूण लोकसंख्या २४१ दशलक्ष आहे. यातील साधारण १२८ दशलक्ष हे नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये ६९ दशलक्ष पुरुष मतदार, तर ५९ दशलक्ष महिला मतदार आहेत. मतदारांचे प्रमाण लक्षणीय असले तरी येथे प्रत्यक्ष मतदानाचे प्रमाण कमी आहे. २०१८ सालच्या राष्ट्रीय निवडणुकीत येथे ५२ टक्के मतदान झाले होते, तर १९७१ साली येथे सर्वाधिक ६१ टक्के मतदान झाले होते.

vodafone idea loss of rs 7675 crore in the march quarter
व्होडा-आयडियाला मार्च तिमाहीत ७,६७५ कोटींचा तोटा
Lok Sabha Election 2024 Phase 4 Voting Updates
मतटक्का जैसेथे! संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदान, देशाच्या तुलनेत राज्याची टक्केवारी कमीच, देशाची सरासरी ६२ टक्के
When understanding population figures
लोकसंख्येचे आकडे समजून घेताना…
The opposition criticized the BJP on the basis of the statistics released in the election
लोकसंख्येच्या अहवालावरून वादंग; ऐन निवडणुकीत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल
Hindu population shrunk
‘हिंदूंची लोकसंख्या घटली’, पंतप्रधानांच्या समितीचा अहवाल; तर मुस्लीमांची लोकसंख्या…
63 percent polling in the third phase
तिसऱ्या टप्प्यात ६३ टक्के मतदान; गेल्या वेळच्या तुलनेत देशभरात पाच टक्के घट
Who is Sadiq Khan
लंडनमधील पाकिस्तानी वंशाचे महापौर सादिक खान कोण आहेत?
Gujarat No Muslim candidate by Congress BJP BSP Muslim in Lok Sabha polls
पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये मुस्लीम फक्त मतदानासाठी; उमेदवारी कुणालाच नाही, का झालं असं?

४४ टक्के मतदारांचे वय ३५ पेक्षा कमी

पाकिस्तान हा तरुणांचा देश आहे. या देशात विशीतील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. दुसरीकडे पाकिस्तामधील बरेच लोक असे आहेत, ज्यांचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी आहे. मतदारांमध्ये साधारण ४४ टक्के मतदरांचे वय हे ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. म्हणजेच या निवडणुकीत तरुणांच्या मताला फार महत्त्व असणार आहे.

२६६ जागांसाठी निवडणूक

पाकिस्तानमध्ये एकूण २६६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मतदार २६६ जागांसाठी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला थेट मतदान करू शकतील. पाकिस्तानमध्ये द्विसदनी संसदीय प्रणाली आहे. या निवडणुकीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी नंतर कनिष्ठ सभागृहाचे सदस्य होतील. भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते, तो उमेदवार विजयी म्हणून घोषित केला जातो.

६० जागा महिला, तर १० जागा गैरमुस्लिमांसाठी राखीव

पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहातील २६६ जागांपैकी ६० जागा या महिलांसाठी राखीव असतात, तर १० जागा या गैरमुस्लिमांसाठी राखीव ठेवल्या जातात. राष्ट्रीय निवडणुकीतील कामगिरीनुसार या जागा वेगवेगळ्या पक्षांना देण्यात येतात.

पंजाब प्रांतातून १७३ जागांसाठी निवडणूक

पाकिस्तानमध्ये पंजाब, सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा असे एकूण चार प्रांत आहेत, तर इस्लामाबाद हा राजधानी प्रदेश आहे. या सर्वच प्रांतांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण कमी-अधिक आहे. याच कारणामुळे प्रत्येक प्रांतातील जागांचीही संख्या वेगवेगळी आहे. पंजाब प्रांतात एकूण १७३ जागा आहेत. यातील ३२ जागा या महिलांसाठी राखीव असतात. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रांत पाकिस्तानमध्ये फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर सिंध प्रांतात ७५ जागा असून यातील १४ जागा या राखीव आहेत. बलुचिस्तानमध्ये १६ सामान्य, तर चार राखीव जागा आहेत. इस्लामाबादमध्ये तीन जागा आहेत. खैबर पख्तूनख्वा या प्रांतात ४५ सामान्य जागा, तर १० जागा राखीव आहेत.

या निवडणुकीत एकूण ५१२१ उमेदवार

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानुसार एकूण ५१२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणजेच प्रत्येक मतदारसंघात सरासरी १९ उमेदवार उभे आहेत. यातील ४८०६ म्हणजेच साधारण ९४ टक्के उमेदवार हे पुरुष आहेत, तर फक्त ३१२ उमेदवार या महिला आहेत. या निवडणुकीत दोन त्रितीयपंथीदेखील उभे राहिले आहेत.

एकूण १६७ नोंदणीकृत पक्ष

या निवडणुकीत उभे राहिलेले एकूण ५१२१ उमेदवार हे १६७ पक्षांपैकी कोणत्या तरी पक्षांचे सदस्य आहेत किंवा ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. नवाझ शरीफ यांची पाकिस्तान मुस्लीम लिग (नावझ), बिलावर भुत्तो आणि असिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी), इम्रान खान यांचा पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार या निवडणुकीत उतरवले आहेत.

एकूण ९० हजार ५८२ मतदान केंद्र

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण ९० हजार ५८२ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. या मतदान केंद्रांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. यातील १७ हजार ५०० मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत, तर ३२ हजार ५०८ मतदान केंद्र हे संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले आहे. उर्वरित ४२ हजार ५०० मतदान केंद्र हे सामान्य श्रेणीतील असल्याचे पाकिस्तान निवडणूक आयोगाने सांगितलेले आहे. पाकिस्तानमध्ये भारताप्रमाणे इव्हीएम मशीनचा वापर होत नाही. तेथे बॅलेट बॉक्सच्या माध्यमातून निवडणूक घेतली जाते.

३० टक्के महागाई, चलनाचे अवमूल्यन

पाकिस्तानमध्ये ही निवडणूक होत असली तरी सध्या या देशापुढे अनेक आव्हानं आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या बिकट परिस्थितीत आहे. मतदारांपुढे हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आकडेवारीत सांगायचे झाल्यास पाकिस्तानमधील चलनवाढ ही ३० टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे, तर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य हे जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.

पीटीआयच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक

पाकिस्तानची प्रत्येक निवडणूक जगभरात चर्चेचा विषय ठरते. सध्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे तुरुंगात आहेत. ते पाकिस्तानमधील सर्वांत प्रसिद्ध नेत्यांपैकी एक आहेत. तसेच पीटीआयवर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, त्यामुळे या पक्षाचे उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, असा आरोपही पीटीआयकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार? कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.