पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारकेत समुद्र तळाशी आलेल्या अनुभवाचा उल्लेख ‘दैवी’ असा केला. इतकेच नाही तर द्वारकेच्या विकासासाठी सुमारे ४,१५० कोटी रुपयांचे प्रकल्पही जाहीर केले. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान मोदी आपल्या स्वगृही म्हणजेच गुजरातमध्ये होते. याच दरम्यान त्यांनी द्वारकेला भेट देत चक्क समुद्राचा खोल तळही गाठला आणि श्रीकृष्णपूजन केले.

द्वारका आणि भगवान श्रीकृष्ण यांचा संबंध सर्वश्रुत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीत राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर आता सगळ्यांचेच लक्ष द्वारकेकडे लागले आहे. द्वारकेला दिलेल्या याच भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींकडून ४,१५० रुपये कोटींच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढही रोवण्यात आली. या प्रकल्पांच्या केंद्रस्थानी सुदर्शन सेतू आहे, हा सेतू भारतातील सर्वात लांब केबल स्टड पूल असून मुख्य भू-भाग आणि बेट द्वारकेला जोडणारा आहे. हा पूल २.२३ किमी लांबीचा असून या पुलाच्या बांधकामासाठी ९८० कोटी रुपये खर्च आला आहे. सुदर्शन सेतूला सिग्नेचर पूल म्हणूनही ओळखले जाते. हा गुजरात मधील पहिला ‘सी लिंक सेतू’ आहे. यामुळे द्वारका आणि बेट द्वारका यांमधील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. बेट द्वारका आणि देवभूमी द्वारकेत असलेल्या ओखा बंदर यांच्यात ३ किमीचे अंतर आहे. ओखा हे बंदर द्वारका देवभूमीत आहे. त्यामुळे आजवर भाविकांना ३५ ते ४५ मिनिटांच्या बोटीच्या प्रवासावर अवलंबून रहावे लागत होते.

Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
navy deployed 11 submarines in indian ocean
विश्लेषण : एकाच वेळी ११ पाणबुड्या हिंद महासागरात तैनात… भारतीय नौदलाचे चीनवर लक्ष?
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार

अधिक वाचा: विदर्भ कन्या रुक्मिणीचे हरण कृष्णाने का केले?

सुदर्शन सेतू

या पुलाची रचना नयनरम्य आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला भगवद्गीतेतील श्लोक आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सुशोभित केलेले पादचारी पथ आहे. पादचारी पथावर सोलर पॅनल्स आहेत. द्वारका बेटावर श्रीकृष्णाचे मंदिर आहे. या शिवाय इतर हिंदू देवदेवतांची मंदिरेही आहेत. भाविकांसाठी हे स्थळ अत्यंत महत्त्वाचे आहे. अद्यापपर्यंत या भागात पर्यटनासाठी आवश्यक त्या सुविधा मिळालेल्या नव्हत्या. या सुविधांच्या उपलब्धतेमुळे या स्थळाचे महत्त्व वाढीस लागणार आहे. या पुलामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे जाणकार सांगतात.

मासेमारी, मुस्लीम समाज आणि बेट द्वारका

ओखा बंदरापासून द्वारका बेटापर्यंतच्या समुद्रात मासेमारी आणि नौकावहन हे दोन व्यवसाय चालतात त्यात मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणावर आहे. बेटावर त्यांची लोकसंख्या १५,००० च्या आसपास आहे. २०२२ साली डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक प्रशासनाने ‘राष्ट्रीय सुरक्षा’ आणि ‘सरकारी जमिनीवर अतिक्रमण’ केल्याचे कारण देत किनारपट्टीवरील १०० हून अधिक घरे आणि दुकाने पाडली, त्यावेळी या भागात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. हे बेट आंतरराष्ट्रीय सागरी सीमा तसेच पाकिस्तानशी सामायिक असलेल्या मासेमारीच्या क्षेत्रात येत असल्याने हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. सध्या या भागातील प्रवाशांची ने-आण बोटीने होत असल्याने या भागात मासेमारी व्यवसायात घट झाली असून दिवसेंदिवस ती वाढतेच आहे. बेटाच्या परिसरात डॉल्फिन्सचे दर्शन घडते. समुद्रकिनाऱ्याला कॅम्पिंग साइट म्हणून पसंत केले जाते, त्यासाठी पायाभूत सुविधा आता चांगल्या पद्धतीने विकसित होणार आहेत. याशिवाय पर्यटकांना मोसमी स्कूबा डायव्हिंग करून द्वारका शहराचे समुद्राखालील अवशेष, प्रवाळं आणि जलचर देखील पाहता येणार आहे.
द्वारकेचे दिव्य दर्शन घेण्यासाठी गेल्या महिन्यात प्रोफेशल स्कुबा ड्रॉयव्हर्स बरोबर पंतप्रधान मोदी यांनी समुद्राचा तळ गाठला. त्यांनी डायव्हिंग हेल्मेट आणि पारंपारिक पोशाख परिधान केला होता, इतकेच नाही तर समुद्र तळाशी जाताना त्यांच्या हातात मोरपिसांचा गुच्छ होता. या मोरपिसांचे समुद्राच्या तळाशी जाऊन त्यांनी पूजन केले. ‘समुद्रात बुडलेल्या द्वारका शहरात जाऊन प्रार्थना करणे हा एक अतिशय दिव्य अनुभव होता. मी अध्यात्मिक भव्यता आणि त्या काळातील भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडले गेलो आहे, असे पंतप्रधानांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले.

अधिक वाचा: Mathura History: मथुरेतील कृष्ण जन्मस्थान: इतिहास नेमके काय सांगतो?

पौराणिक इतिहास

बेट द्वारकेच्या छोट्या बेटाचा उल्लेख पुराणांमध्ये ‘शंखोधर’ असा केला जातो, हेच कृष्णाचे घर मानले जाते. स्कंदपुराण आणि महाभारतात या बेटाचा ठळकपणे उल्लेख आला आहे. इथेच कृष्णाने सुदाम्याचे पोहे खाल्ले होते. गुजरात सरकारच्या नोंदीनुसार, शहरातील द्वारकाधीश मंदिर हे कृष्णाला समर्पित आहे. हे मंदिर नक्की कधी बांधले गेले, याबद्दल अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहे. या मंदिराचा विध्वंस महमूद बेगडा याने केला होता, त्यानंतर १६ व्या शतकात मंदिर पुन्हा बांधले गेले. आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मुख्य शक्तीपीठांपैकी हे एक आहे. अरबी समुद्रातील आणि किनारपट्टीवरील अशा दोन्ही द्वारकांचा पुरातत्त्वीय शोध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.
१९६३ साली झालेल्या पुरातत्वीय सर्वेक्षणात अनेक कलाकृती उघडकीस आल्या. नव्या पुराव्यांच्या आधारे द्वारका हे प्राचीन बंदर असल्याचे सिद्ध झाले आहे. किनारपट्टीची धूप हे प्राचीन बंदराच्या नामशेष होण्याचं कारण असावे,” असे अभ्यासक मानतात.

धार्मिक पर्यटन

तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील श्री अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर एका महिन्यातच मोदींनी सागर तळाशी बुडी घेत बेट द्वारकेचे दर्शन घेतले. त्यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानेपूर्वी देशव्यापी मंदिर भेटींचा एक भाग म्हणून रामेश्वर तटावर असलेल्या ‘अग्नी तीर्थम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र तीर्थात स्नान देखील केले होते. महाभारतात जसे द्वारकेचे महत्त्व आहे तसाच रामेश्वरम मंदिराचाही उल्लेख आहे. एकूणच भारताला धार्मिक पर्यटनाचा जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने अनेक पुनर्विकास आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत राममंदिराच्या उद्घाटनानंतर या प्रवासाची नांदी झाली, तर द्वारकेच्या भेटीनंतर या संकल्पनेने वेग पकडल्याचे दिसते आहे.