What Does Sapiosexual Mean?: “हुशार आणि विनोद समजून आनंद घेणाऱ्या स्त्रीपेक्षा आकर्षक काहीच नाही,” असं प्रसिद्ध विनोदी कलाकार गॅड एल्मालेह यांनी अलीकडेच पॅरिस मॅच या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ते चार्लोट कॅसिरागी यांच्याशी असलेल्या त्यांच्या भूतकाळातील नात्याविषयी बोलत होते. या संवादादरम्यान त्यांनी स्वतःची ओळख ‘सॅपिओसेक्शुअल’ अशी करून दिली. गॅड एल्मालेह हे एक प्रसिद्ध फ्रेंच-मोरोक्कन विनोदी कलाकार, अभिनेता, आणि लेखक आहेत. त्यांच्या विनोदशैलीला जागतिक स्तरावर प्रशंसा मिळाली असून त्यांना फ्रान्समधील ‘हास्याचा राजकुमार’ (The Prince of Comedy) असं म्हटलं जातं. गॅड एल्मालेह यांच्याखेरीज याच वर्षी जुलै महिन्यात लव्ह आयलंड या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या स्पर्धक कोन्नोर इवुडी (Konnor Ewudzi) यांनी शोमधून बाहेर पडल्यावर स्वतःला ‘सॅपिओसेक्शुअल’ म्हणून घोषित केलं. त्यांनी सांगितलं की, शारीरिक आकर्षणापेक्षा त्यांना बुद्धिमत्ता महत्त्वाची वाटते! या निमित्ताने आपण सॅपिओसेक्शुअल या संकल्पनेचा उगम, महत्त्व, सामाजिक परिणाम आणि याबाबतचे वाद यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

विचारांची सखोलता महत्त्वाची

सॅपिओसेक्शुअल ही एक अशी संकल्पना आहे ज्यात व्यक्तीला असणाऱ्या लैंगिक आकर्षणाचा वेगळा दृष्टिकोन दृष्टिपथास पडतो. सॅपिओसेक्शुअल व्यक्ती या मुख्यतः इतरांच्या बुद्धिमत्तेकडे आकर्षित होतात. त्यांच्यासाठी आपल्या जोडीदारातील शारीरिक आकर्षण किंवा भावनिक गुंतवणुकीपेक्षा त्याच्याबरोबरचा मानसिक- बौद्धिक संवाद आणि विचारांची सखोलता महत्त्वाची असते.

Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
blonde roasts Coffee Health Benefits
Varun Dhawan: ब्लॅक कॉफी व्यतिरिक्त ‘हा’ पर्याय आतड्यासाठी ठरेल योग्य; वरुण धवनने सुचवला उपाय; पण, तज्ज्ञांचे मत काय?
Loksatta kutuhal How minerals got their names
कुतूहल: खनिजांना नावे कशी मिळाली?
Youth Addiction, Young Generation, Nagpur Police ,
तरुणांनो प्रेम करा, पण…
Animals have exceptional memory
विलक्षण स्मरणशक्ती असते ‘या’ प्राण्यांकडे! माणसालाही देऊ शकतात आव्हान
Loksatta tatva vivek Popularization of Western philosophy
तत्व विवेक: पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचं लोकाभिमुखीकरण

अधिक वाचा: Viral Black Cat-Golden Retriever: ‘ब्लॅक कॅट’ गर्लफ्रेंड म्हणजे काय? हा व्यक्तिमत्त्वाचा प्रकार नातेसंबंधांवर कसा परिणाम करू शकतो?

सॅपिओसेक्शुअल म्हणजे काय? Sapiosexual Attraction

सॅपिओसेक्शुअल व्यक्ती बुद्धिमत्तेला आकर्षणाचा मुख्य आधार मानतात. यामध्ये शारीरिक सौंदर्य किंवा भावनिक ओढ कमी प्रमाणात महत्त्वाची ठरते. तर सॅपिओसेक्शुअल व्यक्तींना गप्पा, वाद-विवाद किंवा बौद्धिक चर्चा जास्त रोमांचक वाटतात. सॅपिओसेक्शुअल हा शब्द सॅपिओ (लॅटिन: सॅपेरे म्हणजे समजूतदार असणे) आणि सेक्शुअल यांचा एकत्रित करून तयार झाला आहे. सॅपिओसेक्शुअलिटी ही लैंगिक ओळख नसून तो आकर्षणाचा एक प्रकार आहे.

सॅपिओसेक्शुअल लोक आकर्षण कसे अनुभवतात? Why Intelligence is Attractive to Sapiosexuals?

सॅपिओसेक्शुअल लोकांसाठी जोडीदारातील विचार करण्याची पद्धत, समस्या सोडवण्याची क्षमता आणि बौद्धिक चर्चा ही आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू असते. ते बुद्धिमत्तेला प्राधान्य देतात. इतरांच्या विरुद्ध सॅपिओसेक्शुअल व्यक्ती बाह्यरूपापेक्षा व्यक्तीच्या विचारसरणीला अधिक महत्त्व देतात. सॅपिओसेक्शुअल व्यक्तींना ज्ञानाची ओढ असते. सॅपिओसेक्शुअल व्यक्तींना ज्ञान संपादन करणाऱ्या जोडीदाराचा शोध असतो. त्यांना वरवरच्या गप्पांमध्ये रस नसतो, गंभीर विषयांवर चर्चा करणं त्यांच्या आकर्षणाचं मुख्य कारण असतं.

Sapiosexual
सॅपिओसेक्शुअल म्हणजे काय? (फोटो: विकिपीडिया)

बुद्धिमत्तेचं आकर्षण का वाटतं?

सॅपिओसेक्शुअल लोकांसाठी बुद्धिमत्तेचं आकर्षण अनेक कारणांनी विशेष महत्त्वाचं ठरतं. बौद्धिक समानता सॅपिओसेक्शुअल लोकांच्या नात्यात एक वेगळा बंध निर्माण करते. या व्यक्तींच्या मते विचारांची समानता ही नात्याला स्थिरता देते. बुद्धिमान जोडीदार तुमच्या विचारांनाही चालना देतो आणि नातं उत्साहपूर्ण ठेवतो अशी त्यांची भावना असते. बुद्धिमत्ता ही एक अशी गोष्ट आहे जी सॅपिओसेक्शुअल लोकांकडून आदर मिळवण्यास कारणीभूत ठरते. ती त्यांच्यासाठी आकर्षणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

सामाजिक दृष्टिकोन आणि गैरसमज

सॅपिओसेक्शुअलिटीला समाजात संमिश्र प्रतिसाद मिळतो. याबाबत अनेक गैरसमजही आहेत. काही लोकांच्या मते सॅपिओसेक्शुअलिटी बुद्धिमत्तेला खूप महत्त्व देते तर इतर गुण जसे की, दयाळुपणा किंवा भावनिक समज यांकडे दुर्लक्ष करते. सॅपिओसेक्शुअलिटी काही वेळेस एका विशिष्ट प्रकारचा श्रेष्ठत्वभाव दर्शवते, जणू काही फक्त बुद्धिमान लोकच प्रेमासाठी योग्य आहेत अशा भावना सक्रिय होतात. सॅपिओसेक्शुअल व्यक्तींना अनेकदा घमेंडखोर किंवा इतरांच्या विचारांना कमी लेखणारं समजलं जातं.

आधुनिक संस्कृतीत सॅपिओसेक्शुअलिटी

सॅपिओसेक्शुअलिटी हा विषय आजच्या काळात खूप चर्चेत आहे, विशेषतः डेटिंग अॅप्स आणि सोशल मीडियावर. अनेक डेटिंग अॅप्समध्ये सॅपिओसेक्शुअलिटीचा पर्याय दिला जातो. यामुळे वेगवेगळ्या आकर्षण प्रकारांना स्वीकारलं जात आहे हे द्योतक आहे. चित्रपट, मालिका आणि कादंबऱ्यांमध्ये अशा पात्रांची कथा रंगवली जाते ज्यांना बुद्धिमत्ता महत्त्वाची वाटते. सोशल मीडियावर सॅपिओसेक्शुअलिटीविषयी बरीच माहिती, विनोद, आणि चर्चा पाहायला मिळतात. मात्र, या चर्चांमुळे वादविवादही होत असतात.

सॅपिओसेक्शुअल लोकांसाठीची आव्हाने The Challenges of Being Sapiosexual

सॅपिओसेक्शुअल व्यक्तींना त्यांच्या आकर्षणामुळे काही अडचणी येऊ शकतात. सॅपिओसेक्शुअल व्यक्तींना योग्य बौद्धिक जोडीदार शोधण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. फक्त बुद्धिमत्तेवर आधारलेलं आकर्षण नातं टिकवण्यासाठी पुरेसं नसतं इतर गुणसुद्धा महत्त्वाचे असतात हे त्यांना समजून घेणं गरजेचं असत. सॅपिओसेक्शुअलिटीला कधीही खरे आकर्षण म्हणून मान्यता मिळत नाही, त्यामुळे सॅपिओसेक्शुअल व्यक्तींना स्पष्टीकरण देण्याची वेळ येते.

सॅपिओसेक्शुअल नाती कशी असतात?

सॅपिओसेक्शुअल जोडप्यांमध्ये तासन् तास चालणाऱ्या बौद्धिक चर्चांमधून त्यांना आनंद मिळतो. अशा नात्यांमध्ये दोन्ही व्यक्ती एकमेकांना शिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. सॅपिओसेक्शुअल नात्यांमध्ये वादविवाद सकारात्मक पद्धतीने सोडवले जातात.

सॅपिओसेक्शुअलिटीविषयी वाद

सॅपिओसेक्शुअलिटी खरोखरच एक वेगळं आकर्षण आहे की, फक्त एक नवीन लेबल यावर वाद सुरूच आहेत. प्रत्येकजण काही प्रमाणात बुद्धिमत्तेला महत्त्व देतो, त्यामुळे सॅपिओसेक्शुअलिटी काही वेगळी नाही, असं टीकाकार म्हणतात.

सॅपिओसेक्शुअलिटीचा व्यापक परिणाम Sapiosexuality: A New Perspective on Relationships

सॅपिओसेक्शुअलिटी ही संकल्पना नातं आणि आकर्षणाबद्दलच्या पारंपरिक दृष्टिकोनाला आव्हान देते. यातून काही महत्त्वाचे बदल दिसून येतात. आकर्षण केवळ शारीरिक नसून बौद्धिकदेखील असू शकतं, हे अधोरेखित होतं.

अधिक वाचा: ‘तो येईल आणि मला वाचवेल’ हे सांगणारा ‘Cinderella Complex’ म्हणजे नक्की काय?

सॅपिओसेक्शुअलिटी हा एक रोमांचक विषय आहे, जो बुद्धिमत्तेवर आधारित आकर्षण अनुभवण्याचा नवा दृष्टिकोन देतो. त्यात आव्हानं असली तरी सॅपिओसेक्शुअलिटी नात्यांबद्दलच्या चर्चेला एक वेगळी दिशा देते. सॅपिओसेक्शुअलिटी समजून घेतल्याने आकर्षण आणि नात्यांबद्दलच्या आपल्या विचारांमध्ये आणखी सखोलता येऊ शकते असे काही तज्ज्ञ मानतात.

Story img Loader