एखादा गुन्हेगाराला जाब विचारल्यावर तो गुन्हेगार “कुणी थांबवलं नाही महणून मी गुन्हे करत गेलो” असं म्हणाला तर त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन नक्कीच खराब आहे हे आपल्या लक्षात येतं. याच वृत्तीची माणसं पुढे जाऊन सिरियल किलर होतात. अशाच एका सिरीयल किलरची कथा आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. The Good Nurse हा चित्रपट नुकताचा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या नावावरून असं वाटतं की ही एका प्रामाणिक आणि चांगल्या व्यक्तीची कथा आहे, पण चित्रपटात एकीकडे सीरियल किलर आहे आणि दुसरीकडे त्याला पकडणारी धाडसी नर्स आहे. या सिरियल किलरला पकडण्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. या सिरियल किलरचे नाव म्हणजे चार्ल्स कुलेन.

वेस्ट ऑरेंज, न्यू जर्सी येथे २२ फेब्रुवारी १९६० रोजी जन्मलेल्या कुलेनचे ग्रेबरचे बालपण एवढे खास नव्हते. त्याचे कुटुंब आयरिश कॅथलिक होते. त्याच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि कुलेन हायस्कूलमध्ये असताना त्याच्या आईचे निधन झाले. नंतर मोठा झाल्यावर कुलेन यूएस नेव्हीमध्ये भरती झाला, जिथे तो अधूनमधून त्रासदायक आणि विचित्र पद्धतीने वागत असे. तसेच त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्नदेखील केला होता. त्यानंतर कुलेनला १९८४ मध्ये वैद्यकीयदृष्ट्या डिस्चार्ज देऊन पुन्हा घरी पाठवण्यात आलं.

आणखी वाचा : हिमेश रेशमियाच्या नव्या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांनी लावला कपाळाला हात; म्हणाले…

त्याच वर्षी कुलेनने न्यू जर्सीच्या मॉन्टक्लेअर येथील नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणासाठी पैसे मिळवण्यासाठी त्याने रेस्टॉरंटमध्येही काम केले. नंतर तो अॅड्रिन बाउमला भेटला, जीच्याशी त्याने ग्रॅजुएट झाल्यावर १९८७ मध्ये लग्न केले. नंतर कुलेनने वारंवार नोकऱ्या बदलल्या, ११ वर्षांच्या कालावधीत ९ नोकऱ्या त्याने बदलल्या. नर्स म्हणून त्याची पहिली नोकरी लिव्हिंगस्टन, न्यू येथील सेंट बर्नबास मेडिकल सेंटरमध्ये होती. पुढे, कुलेनने फिलिप्सबर्ग, न्यू जर्सी येथील वॉरेन हॉस्पिटलमध्ये नोकरी धरली, आणि न्यू जर्सी मधील मॉरिसटाउन मेमोरियल आणि एलेनटाउन, पेनसिल्व्हेनियामधील लिबर्टी नर्सिंग आणि पुनर्वसन केंद्र या ठिकाणीही तो काम करायचा. न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार त्याने हृदय आणि अतिदक्षता विभागात काम केले, जिथे काम करणाऱ्या नर्स बहुतेक गंभीर आजारी असलेल्या रूग्णांनी वेढलेले असतात, त्यापैकी बरेच बेशुद्ध होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुलेनने पहिला खून जॉन डब्ल्यू येंगो सीनियर यांचा केला. ते न्यू जर्सी शहरातील न्यायाधीश होते. १९८८ मध्ये ७२ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. तपासात समोर आलं की जॉन डब्ल्यू यांना ‘स्टीव्हन्स-जॉन्सन सिंड्रोम’ म्हणजेच एक दुर्मिळ ऍलर्जीचा त्रास होता. याचाच फायदा घेऊन कुलेनने त्याचे हृदय बंद करणारे औषध इंजेक्शन देऊन त्यांचा खून केला. अटकेनंतर कुलेनने हे स्वतः मान्य केलं. त्यानंतर त्याने1993 मध्ये, हेलन डीन या ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या महिलेलाही इंजेक्शन देऊन मारले. कुलेनला ही चटकच लागली आणि त्याने तब्बल २९ रुग्णांची अशीच निर्घृण हत्या केली. अखेर २००३ मध्ये त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आणि रुग्णांना निर्दयीपणे यमसदनी धाडणाऱ्या या नर्सचं प्रकरण कायमचं बंद झालं.