गेली अनेक वर्षे टिपू सुलतान याची तलवार हा वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. भारतातून परदेशात नेण्यात आलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तूंमध्ये या तलवारीचा समावेश होतो. भारतीय इतिहातील एक महत्त्वाचे पर्व म्हणून टिपू सुलतानाच्या काळाकडे पाहिले जाते. भारतात तो ‘नायक की खलनायक’ या वरून वाद असला तरी त्याचा इतिहास दुर्लक्षित करून चालणार नाही. टिपू सुलतान याच्या तलवारीचा लंडनमध्ये नुकताच लिलाव झाला. चक्क १४ दशलक्ष पौंडांना ही लिलावविक्री पार पडली. जाणकारांनुसार तलवारीची अपेक्षित किंमत दीड ते दोनलाख पौंड होती. परंतु प्रत्यक्षात एक कोटी ४० लाख ८० हजार ९०० पौंड एवढ्या मोठ्या किमतीला तलवारीची लिलावविक्री झाली. या लिलावाने लंडन मधील बोनहॅम्स येथील भारतीय कला वस्तूंच्या लिलावाचे सर्व विक्रम मोडीत काढले. त्यानिमित्ताने त्याच्या इतिहास व वादग्रस्ततेवर टाकलेला हा प्रकाशझोत

सुखेला तलवार

लिलाव झालेली टिपू सुलतान याची तलवार १८ व्या शतकातील आहे. ही तलवार त्याच्या खाजगी दालनातून हस्तगत करण्यात आली होती. या तलवारीचा उल्लेख ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये ‘सुखेला’ असा करण्यात आला आहे. या तलवारीचे वर्णन उत्तम सोन्याची मूठ असलेली स्टीलची तलवार असे करण्यात येते. ही तलवार ईस्ट इंडिया कंपनी कडून मेजर जनरल डेव्हिड बेयर्ड यांना टिपू सुलतान याच्या विरुद्ध झालेल्या लढाईत पराक्रम गाजविल्याबद्दल सन्मानार्थ देण्यात आली होती. विशेष म्हणजे याच युद्धात टिपू सुलतान मारला गेला.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

बेडचेम्बर सोअर्ड

इतिहासकारांच्या मते, १७९९ साली सेरिंगपटम (श्रीरंगपट्टणम) येथील टिपू सुलतान याचा शाही किल्ला पडल्यानंतर (टिपू युद्धात हरल्यानंतर) त्याच्या राजवाड्यातून काढून टाकण्यात आलेल्या अनेक शस्त्रांमध्ये टिपूचा जवळचा संबंध असलेल्या शस्त्रांमध्ये या तलवारीचा समावेश होता. फ्रान्सिस बुकानन यांनी ऑन-द-स्पॉट या आपल्या तत्कालीन नोंदीत नमूद केल्याप्रमाणे टिपू ही तलवार नेहमी सोबत बाळगत असे. किंबहुना शयन कक्षेतही ती अशा ठिकाणी ठेवण्यात येई जेथून झोपेत असतानाही सहज त्याच्या हाती लागेल. म्हणूच ही तलवार ‘bedchamber Sword’ म्हणून प्रसिद्ध आहे. सोळाव्या शतकात भारतात आणलेल्या जर्मन ब्लेडच्या मॉडेलचे अनुसरण करून मुघल तलवारकारांनी ही तलवार तयार केली होती. या तलवारीच्या सोन्याच्या मुठीवर ईश्वराला आळवणी करणाऱ्या आयतांची कॅलिग्राफी करण्यात आली आहे.

कोण होता टिपू सुलतान?

टिपू सुलतान याचा जन्म १० नोव्हेंबर १७५० साली देवनाहल्ली म्हणजेच आजच्या बंगलुरूमध्ये झाला. हैदर अली हे त्याच्या पित्याचे नाव असून ते तत्कालीन म्हैसूर येथील हिंदू साम्राज्य वाडीयार यांच्या सैन्यात अधिकारी पदावर होते. हैदर अली यांनी १७६१ साली म्हैसूरची सत्ता हस्तगत केली, तर टिपू सुलतान हा त्यांचा वारस म्हणून १७८२ साली गादीवर विराजमान झाला. भारतीय इतिहासात मोजक्या शिकलेल्या मुस्लिम सुलतानांमध्ये टिपूची गणना होते. वेगवेगळ्या भाषा, धार्मिक तत्त्वज्ञान, कुराणावरची पकड, इस्लामिक न्यायशास्त्र, विज्ञान या सारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्त्व होते. त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी इंग्रजांविरुद्ध युद्ध करून आपले युद्धकौशल्य सिद्ध केले. १७६७ साली झालेल्या इंग्रजांविरुद्धच्या युद्धात टिपूला पहिल्यांदाच युरोपियन संस्कृती व राहणीमानाची जवळून ओळख झाली. याचाच परिणाम त्याच्या राज्यकालावर झाल्याचे इतिहासकार मानतात. म्हणूनच टिपूने आपल्या राज्यात आधुनिक व सुधारणावादी अनेक धोरणांचा अवलंब केला होता. असे असले तरी टिपू सुलतान भारतीय इतिहासातील अनेक वादग्रस्त शासकांपैकी एक आहे. या इस्लामी शासकाचा इतिहास दोन विचारसरणीत विभागल्याचे आपण स्पष्ट पाहू शकतो. इतिहासकारांचा एक गट टिपू सुलतान याला ‘नायक’ मानतो तर दुसरा ‘खलनायक’.

आणखी वाचा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या राजदंडावर नंदीसोबत लक्ष्मी कशासाठी?

टिपूचा राज्यअभिषेक

हैदर अली आपल्या राज्यविस्ताराच्या मोहिमांमध्ये गुंतलेला असतानाच अचानक झालेल्या त्याच्या निधनामुळे टिपूला कमी वयात १७८२ साली राज्यकारभाराची धुरा हातात घेणे भाग पडले होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार हैदर अली यांनी जिंकलेल्या भागांच्या सीमा एकत्रित ठेवणे गरजेचे होते. टिपू गादीवर येण्यापूर्वी आधीच्या २० वर्षांमध्ये म्हैसूर राज्याचा विस्तार हैदर अली यांनी राज्याच्या सीमेवरील असलेले प्रांत काबीज करून घेण्यास सुरुवात केली होती. टिपूला मलबार, कोडागु आणि बेडनूर येथील बंडखोर प्रांत वारशाने मिळाले होते. हे सर्व भाग राज्याच्या आर्थिक तसेच धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाचे होते. या प्रांतातील त्याचे अधिपत्य हे त्याची कट्टरता व हुकूमशाही दर्शविणारे मानले जाते. हे भाग आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी टिपूने क्रूरतेचा अवलंब केल्याचे इतिहासकार सांगतात.

टिपू सुलतान जुलमी आणि धार्मिक कट्टरवादी होता का?

टिपूच्या काळातील युद्ध क्रूरतेची सीमा गाठणारी मानली जातात. त्याच्याकडून बंडखोरांना देण्यात येणाऱ्या शिक्षेत जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा समावेश होता. त्याने धर्मांतरितांचे बळजबरीने म्हैसूर येथे स्थलांतर केले. म्हैसूर साम्राज्याविरुद्ध बंड केले म्हणून कोडागु आणि मलबार या दोन्ही ठिकाणांहून लोकांना जबरदस्तीने हुसकावून लावण्यात आले होते. याचीच परिणीती नायर व ख्रिश्चन यांनी टिपूला केलेला विरोध व त्याच्याकडून राबवण्यात आलेले दडपशाही धोरण हे ‘अँग्लो म्हैसूर’ युद्धात झाले असे अभ्यासक मानतात.

हिंदू मंदिरांना संरक्षण

काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार टिपू सुलतान याने हिंदु राजे व जनतेवर जाणीवपूर्वक हल्ले केले. यावर टिप्पणी करताना ‘इतिहासकार केट ब्रिटलबँक’ आपल्या पुस्तकात ‘टायगर: द लाइफ ऑफ टिपू सुलतान’ मध्ये स्पष्ट करतात की, आज टिपूचे वागणे क्रूर व संशयास्पद वाटत असले तरी तत्कालीन काळानुसार ते व्यवहार्य होते. अठराव्या शतकातील धार्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या शासकांनुसार हे वागणे सामान्य होते. तो एक जुलमी राजा होता, परंतु त्याच्या प्रेरणा धार्मिक आवेशाच्या होत्या असे मानणे गैर आहे. त्याऐवजी, तो एक व्यावहारिक शासक होता ज्याने त्या वेळीच्या राजेशाही आणि युद्धाच्या स्वीकृत नियमांनुसार राज्य केले, असे म्हणावे असे ब्रिटलबँक यांचे म्हणणे आहे. ब्रिटलबँक यांनी नमूद केल्याप्रमाणे त्याने निःसंशयपणे आपल्या ताब्यात घेतलेल्या भागात जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे आदेश दिले, परंतु त्याच वेळी टिपूने श्रीरंगपटना येथील श्री रंगनाथ मंदिर आणि शृंगेरी येथील मठासह विविध मंदिरे आणि हिंदू देवस्थानांना संरक्षण देखील बहाल केले. या दोन्ही कृती शासक म्हणून त्याचे स्थान मजबूत करण्यासाठी होत्या. प्रारंभिक काळात असंतुष्टांना चिरडण्यासाठी आणि नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात असलेल्या हिंदू प्रजेवर राज्य करण्यासाठी त्याने अशा स्वरूपाची धोरणे राबविल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे.

टिपू सुलतानने केलेल्या सुधारणा

टिपूला युरोपियन संस्कृतीचे आकर्षण होते. याचीच परिणीती म्हणून नव-नवीन कल्पना त्याने आपल्या राज्यात राबविल्या. इतकेच नव्हे तर त्याने आपला दूत फ्रांन्समध्ये पाठविला होता. या दूताने आपल्या सोबत तोफा आणि घड्याळ बनविणारे, वीणकर, पूर्वेकडील भाषांमध्ये काम करू शकणारे मुद्रक, अभियंता आणि वैद्यक यांना सोबत आणले होते. तसेच लवंग, कापराची झाडे, वेगवेगळी युरोपियन फळे, फुलांच्या बिया यांचाही त्यात समावेश होता. इतिहासकार ब्रिटलबँक यांच्या मते, टिपू सुलतान याला आधुनिक युरोपियन शक्तींचे प्रतिस्पर्धी व्हायचे होते. म्हणूनच त्याने तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली होती.

आणखी वाचा : विश्लेषण: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध?

लोखंडी रॉकेटचा वापर

युद्धात लोखंडी रॉकेट आणण्याचे श्रेय टिपूला जाते. रॉकेटसदृश शस्त्रे पूर्वी युद्धात वापरली जात होती, परंतु टिपूच्या सैन्याने अँग्लो म्हैसूर युद्धांमध्ये पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीचे लोखंडी रॉकेट वापरले होते. काही इतर अभ्यासकांच्या मते हैदर अली यांनी या शस्त्रांचा वापर आधी केला होता, टिपूने फक्त त्यात सुधारणा केली. या रॉकेटचा उपयोग मोठ्या प्रमाणात ब्रिटीश सैन्यावर विनाशकारी प्रभाव पाडण्यासाठी केला गेला. ब्रिटिशांनी टिपूचे मॉडेल त्यांच्या स्वत:च्या रॉकेटसाठी वापरले, याच टिपूच्या रॉकेटने पुढे जावून नेपोलियन युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. टिपू सुलतानने प्रशासकीय आणि आर्थिक सुधारणांसाठी पुढाकार घेतला. त्यांनी नवीन नाणी पाडली, म्हैसूरमध्ये नवीन जमीन महसूल प्रणाली व रेशीम शेती सुरू केली, जी आजपर्यंत अनेकांना रोजगार देत आहे. शिवाय कनिष्ठ वर्गातील ज्या स्त्रियांना चोळी वापरण्याची परवानगी नव्हती त्यांना ती परवानगी देवून कापड पुरविले असाही काही इतिहासकार दावा करतात.

टिपूचा शेवट कसा झाला ?

१७९९ सालामध्ये चौथ्या अँग्लो म्हैसूर युद्धात ब्रिटीश सैन्याविरुद्ध श्रीरंगपट्टणाच्या किल्ल्याचे रक्षण करताना टिपू सुलतानचा मृत्यू झाला. या युद्धात फ्रेंच सहयोगी त्याच्या मदतीला येऊ शकले नाहीत. हे युद्ध त्याच्या पराक्रमाची शौर्य गाथा तसेच त्याची झालेली अवहेलना दोन्ही बाबी एकाच वेळी विशद करतात. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार त्याचा इतिहास हा राजकीय सोयीनुसार फिरविण्यात येतो. ज्यावेळी इंग्रजांविरोधात लढा द्यायचा होता, त्यावेळी तो या लढ्याचे प्रतीक बनला होता. त्यावेळी त्याच्या व्यक्तिगत वैशिष्ठ्यांवर जोर देवून अनेक गाथा रचण्यात आल्या. तर सद्यस्थितीत धर्मावर अधिक जोर देऊन त्याच्या निरंकुश प्रवृत्तींवर आणि संलग्न प्रदेशांमधील क्रूर दडपशाहीवर प्रकाश टाकून त्याला खलनायक ठरविले जात आहे.