Banglore water crisis बंगळुरूला पाणीटंचाईची मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच देशातील ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून प्रसिद्ध असलेले शहर बंगळुरू भीषण जलसंकटाचा सामना करीत आहे. या जलसंकटामुळे शहरवासीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईमुळे भाज्यांच्या किमतींतीतही वाढ झाली आहे. यांसारख्या अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. उन्हाळ्यात पारा चढल्याने कर्नाटकच्या राजधानीत पाण्याचे संकट आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. बेंगळुरूच्या पाण्याच्या समस्येचा बांधकाम व्यवसायावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

बेंगळुरूमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले

‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, बेंगळुरूमध्ये वांगी, शिमला मिरची, सोयाबीन व कोबी यांसारख्या अनेक भाज्यांच्या किमतींत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरांत किरकोळ वाढ झाली आहे. मात्र, किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. “जमिनीतून भरपूर उष्णता निघत असल्याने आणि पाऊस नसल्याने शेतकरी उत्पादन काढू शकत नाहीत. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा आहे. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत भाजीपाला महागच राहील,” असे आयटी हबमधील भाजी व्यापारी एन. मंजुनाथ रेड्डी यांनी ‘द हिंदू’ला सांगितले.

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

बेंगळुरू शहर मुख्यत्वे भाजीपाला आणि फळांच्या पुरवठ्यासाठी जवळच्या चिक्कबल्लापूर व कोलार या जिल्ह्यांवर अवलंबून आहे. परंतु, या जिल्ह्यांतील भूजल पातळीतही घट झाली आहे; त्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. “सध्या १४ पैकी फक्त चार बोअरवेल कार्यरत आहेत. हवामान खूप कोरडे आहे. जमिनीत ओलावा नाही. आमची पिके सिंचनाशिवाय जगतील की नाही हे आम्हाला माहीत नाही,” असे चिक्कबल्लापूर शहराबाहेरील शेतकरी श्रीदेवी यांनी ‘डेक्कन हेराल्ड’ला सांगितले.

ऐतिहासिकदृष्ट्या चिक्कबल्लापूर व कोलार हे दोन्ही जिल्हे शेतीसाठी भूजलावर अवलंबून आहेत. “बंगळुरूला पुरविल्या जाणाऱ्या बहुतेक भाज्या जवळच्या मालूर, कोलार व चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील तालुक्यांमधून येतात. बंगळुरूपासून जवळ असल्याने आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने ही क्षेत्रे महत्त्वाची आहेत,” असे कृषी विज्ञान विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश काममर्डी यांनी ‘डेक्कन हेराल्ड’ला सांगितले. येत्या आठवड्यात पाऊस न पडल्यास पुरवठा आणखी कमी होईल. त्यामुळे शहरात भाजीपाल्याचे दर आणखी वाढू शकतात, असा इशाराही एका भाजी व्यापाऱ्याने दिला आहे, असे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे.

बांधकाम उद्योगावर परिणाम

बंगळुरूमध्ये मालमत्ता खरेदी करू इच्छिणारे लोक आता पुनर्विचार करीत आहेत. त्याचे कारण आहे जलसंकट. शहरातील अनेक भागांमध्ये ही अवस्था वाईट आहे. ‘मनीकंट्रोल’च्या एका अहवालानुसार, पूर्व आयटी कॉरिडॉर आणि मध्य बंगळुरूच्या अनेक भागांमधील विकासाला याचा फटका बसणार आहे. स्थानिक ब्रोकर्सचे म्हणणे आहे की, गुंतवणूकदार जलसंकट टाळण्यासाठी आता उत्तर बेंगळुरू आणि इंदिरानगरमधील पर्यायी मालमत्तेच्या शोधात आहेत.

मालमत्ता सल्लागार कंपनी ‘हनु रेड्डी रियल्टी’चे उपाध्यक्ष किरण कुमार यांनी ‘मनीकंट्रोल’ला सांगितले, “गुंतवणूकदार आणि भाडेकरू मालमत्ता खरेदी करताना फार विचार करीत आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे ते अनेक गोष्टींचा विचार करू लागले आहेत. आमच्याकडे भाड्याने किंवा विक्रीसाठी मालमत्ता उपलब्ध आहे. मात्र, त्या भागात पाणीसंकट असल्याने आम्ही चिंतेत आहोत.”

“कोविडच्या काळात लोक त्यांच्या मूळ ठिकाणी परतल्यामुळे शहरातील भाडेकरूंच्या संख्येत किमान २० टक्क्यांनी घट झाली. गेल्या दोन वर्षांत यात दुपटीने वाढ झाली आहे. पाण्याच्या संकटामुळे अनेक जण त्यांच्या मूळ गावी परत जात आहेत; ज्याचा परिणाम शहरातील बांधकाम व्यवसायावर होत आहे,” असे रियल इस्टेट फर्म ‘कोल्डवेल बँकर’मधील भागीदार बालाजी बद्रीनाथ यांनी ‘मनीकंट्रोल’ला सांगितले.

बंगळुरूच्या आयटी हबला धोका?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस)च्या एका नवीन अभ्यासानुसार, आयटी हबमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणी कावेरी नदीतून येते. गतवर्षी कमी पावसामुळे कावेरी नदीचा जल स्तर कमी झाला आहे. अपुर्‍या पावसाने भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावली; ज्यामुळे शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तीव्र पाणीटंचाईव्यतिरिक्त बंगळुरूत वाहतूक समस्यादेखील तितकीच चिंताजनक आहे. ‘नेसकॉम-डिलॉईट’च्या अलीकडील अहवालात असे आढळून आले आहे की, या नागरी समस्यांमुळे आयटी कंपन्या आता बंगळुरूबाहेर विस्तारण्यास तयार आहेत.

हेही वाचा : चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे गुन्हा आहे का? सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय?

बंगळुरूची लोकसंख्या वाढत आहे. २०३१ पर्यंत ही संख्या २० दशलक्ष (दोन कोटी)पर्यंत पोहोचेल. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम संसाधने आणि पायाभूत सुविधांवर होईल. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना न केल्यास, बंगळुरू टेक हब आणि सिलिकॉन व्हॅलीचा दर्जा गमावू शकतो.