लोकसत्ता टीम
इस्रायली सैन्याच्या नेत्झा यहुदा बटालियनकडून पश्चिम किनारपट्टीमधील (वेस्ट बँक) पॅलेस्टिनींना मिळालेल्या वागणुकीमुळे अमेरिका या तुकडीवर निर्बंध लादण्याची योजना आखत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अशा कोणत्याही निर्बंधांविरोधात आपण लढा देऊ असे इस्रायलच्या नेत्यांनी म्हटले आहे. अमेरिकेने खरोखर असे निर्बंध लादले तर त्यांनी इस्रायलच्या सैन्यदलावर लादलेले हे पहिलेच निर्बंध असतील. नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप करण्यात आले आहेत ते पाहूया.

नेत्झा यहुदा बटालियन काय आहे?

इस्रायलच्या लष्करात भरती झालेल्या अतिकट्टर ज्यू आणि इतर धार्मिक राष्ट्रवादी लोकांच्या धार्मिक श्रद्धा सामावून घेण्यासाठी १९९९मध्ये नेत्झा यहुदा बटालियन स्थापन करण्यात आली होती. या गटांना प्रार्थना व अभ्यासाला वेळ देणे आणि महिलांशी मर्यादित संवाद राखणे यासारख्या धार्मिक प्रथा कायम ठेवून लष्करात सेवा बजावण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी इस्रायलच्या सरकारने या बटालियनची निर्मिती केली.

What is the meaning of the Olympic rings?
Olympics 2024: ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या
history of america donald trump to abraham lincoln attack
अमेरिकेतील आतापर्यंतचे राजकीय हल्ले
Loksatta chahul The Thir
चाहूल: लोकशाही आणि लष्करशाही यांची तिसरी बाजू…
talibani rules afghanistan
संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
Pm narendra modi in russia
रशियातील पंतप्रधान मोदींच्या भाषणात ‘अस्त्रखान हाऊस ऑफ इंडिया’चा उल्लेख; त्याचे गुजरात कनेक्शन काय?
Who is Marine Le Pen who is taking French politics to the right
फ्रान्सच्या राजकारणाला ‘उजवीकडे’ घेऊन जाणाऱ्या मारीन ल पेन कोण? अध्यक्ष माक्राँ यांनाही डोकेदुखी ठरणार?
Portugal beat Slovenia on penalties sport news
पेनल्टीच्या नाट्यात पोर्तुगालचा विजय; स्लोव्हेनियावर ३-० ने मात करत उपांत्यपूर्व फेरीत
South Korea semiconductor sector booms after friendship with America
चिप-चरित्र – दक्षिण कोरिया : चिपक्षितिजावरचा ध्रुवतारा

हेही वाचा >>>विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?

बटालियनवर आरोप कोणते?

२०२२मध्ये ७८ वर्षीय पॅलेस्टिनी वंशाचे अमेरिकी व्यक्ती ओमर असाद यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते नेत्झा यहुदा सैनिकांच्या ताब्यात होते आणि नंतर त्यांचा मृतदेह एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सापडला होता. शवविच्छेदनात असे आढळून आले की, असाद यांच्याशी झालेल्या धक्काबुक्की व मारहाणीने उद्भवलेल्या तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या मृत्यूमध्ये नेत्झा यहुदा सैनिकांचा हात असल्याचे आरोप झाल्यानंतर अमेरिकेने फौदजारी तपासाची मागणी केली. ओमर असाद यांच्याकडे असलेले पॅलेस्टाईन आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व, त्यांचे वय आणि अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची केलेली मागणी यामुळे या प्रकरणाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले गेले.

इस्रायली लष्कराचे म्हणणे काय?

ओमर यांनी सैनिकांना सहकार्य करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना कापडाच्या पट्टीने बांधले होते आणि झिप टायने त्यांचे हात एकमेकांशी बांधले होते. या प्रकरणावरून नेत्झा यहुदाच्या बटालियन कमांडरला खडसावण्यात आले, तसेच दोन अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. मात्र, सैनिकांनी केलेल्या चुका आणि ओमर असाद यांच्या मृत्यूचा काहीही संबंध नाही असा पवित्रा घेऊन इस्रायलच्या लष्कराने फौजदारी आरोपांचा पाठपुरावा न करता हे प्रकरण तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. इस्रायलच लष्कराच्या अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी सांगितले की, असाद यांचा मृत्यू सैनिकांच्या वर्तणुकीमुळेच झाला आहे हे निश्चित करणे लष्करी वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी अशक्य आहे. याव्यतिरिक्त अलिकडील काळामध्ये असे अनेक प्रसंग घडले आहेत. त्यापैकी काहींचे ध्वनीचित्रिकरणही झाले आहे. त्यामध्ये नेत्झा यहुदा सैनिक पॅलेस्टिनी कैद्यांचा छळ करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ही बटालियन प्रथम पश्चिम किनारपट्टीत कार्यरत होती. अमेरिकेच्या टीकेनंतर २०२२च्या उत्तरार्धात ती तिथून हलवण्यात आली. सध्या ही बटालियन गाझामध्ये कार्यरत आहे.

हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास नऊ लाख तात्पुरत्या नोकऱ्या, कसा मिळणार रोजगार?

निर्बंधांचा अर्थ काय होतो?

अमेरिकी कायद्यानुसार, मानवाधिकाराचे घोर उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना किंवा सुरक्षा दलांना लष्करी मदत पुरवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. इस्रायलने या कायद्याचे उल्लंघन केले याबद्दल आपली खात्री पटली आहे असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी मागील आठवड्यात सांगितले. १९९०च्या दशकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये तत्कालीन सिनेट सदस्य पॅट्रिक लेही यांनी आणलेला हा कायदा त्यांच्या नावाने ‘लेही लॉ’ म्हणून ओळखला जातो. त्यानुसार, मानवाधिकारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या आणि त्यावर कोणताही न्याय न करणाऱ्या व्यक्ती किंवा सुरक्षा दलांना लष्करी सहाय्य प्रदान करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत लवकरच घोषणा केली जाईल असे ब्लिंकन यांनी सांगितले.

इस्रायलचा प्रतिसाद?

निर्बंधांच्या वृत्तांवर इस्रायली नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी, इस्रायलचे सैन्य गाझामध्ये हमासविरोधात युद्ध लढत असताना नेत्झा यहुदा बटालियनवर निर्बंधांची शक्यता म्हणजे ‘टोकाचा मूर्खपणा आणि खालावलेली नीतिमत्ता’ असल्याचे मत व्यक्त केले. अशा कोणत्याही कार्यवाहीविरोधात आपले सरकार सर्व शक्तीनिशी कृती करेल असा दावाही त्यांनी केला. इस्रायलच्या वॉर कॅबिनेटमधील मंत्री बेनी गँट्झ यांनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा केली आणि संभाव्य निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. तर, नेत्झा यहुदा बटालियन ही आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या तत्त्वांनुसार कारर्यत असणारे युद्धात सक्रिय असलेली तुकडी आहे असे इस्रायलच्या लष्कराचे म्हणणे आहे.