राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा ‘बधाई दो’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. हा चित्रपट अशा एका सामाजिक विषयावर आधारित आहे, ज्यावर बोलायला आजही अनेकजण घाबरतात. या चित्रपटात राजकुमार राव याने शार्दूल ठाकूर आणि भूमी पेडणेकर हिने सुमन सिंग ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सुमन लेस्बिअन आणि शार्दूल गे असल्याचे दाखवण्यात आले आहे.

चित्रपटात शार्दुल आणि सुमन त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि लैंगिक आवडीनिवडी लपवण्यासाठी लग्न करतात, पण त्यांच्या लैंगिक आवडीनिवडी सामान्य पती-पत्नीसारख्या नसतात. शार्दुलचे लैंगिक आकर्षण मुलामध्ये आणि सुमनचे आकर्षण मुलीमध्ये असते. आजच्या काळात असे अनेक लोक आहे ज्यांना ‘लॅव्हेंडर मॅरेज’ बद्दल माहिती नाही. कारण भारतात शतकानुशतके समाजाच्या भीतीने असे विवाह आणि मुद्दे लपवून ठेवले गेले आहेत. आज आपण ‘लॅव्हेंडर मॅरेज’ म्हणजे काय हे जाणून घेऊया.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
patanjali ayurved marathi news, patanjali ayurved supreme court notice marathi news, baba ramdev supreme court notice marathi news
विश्लेषण : रामदेव बाबांच्या पतंजलीचे दावे फसवे आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने कशाबद्दल फटकारले?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

‘लॅव्हेंडर मॅरेज’ म्हणजे काय? (What’s Lavender Marriage)

जर एखाद्या पुरुषाचा लैंगिक कल स्त्रीपेक्षा पुरुषाकडे जास्त असेल तर त्याला ‘गे’ म्हटले जाते. तसेच जर एखाद्या महिलेचा लैंगिक कल पुरुषांपेक्षा महिलांकडे अधिक असेल तर तिला लेस्बिअन म्हटले जाते. तज्ञांनुसार, जेव्हा एखादा गे मुलगा आणि लेस्बियन मुलगी लग्न करतात, जेणेकरून ते समाज आणि कुटुंबासमोर सामान्य विवाहित जोडप्यासारखे दिसतील, त्याला ‘लॅव्हेंडर मॅरेज’ म्हणतात. असे म्हटले जाते की लॅव्हेंडर रंग समलैंगिकतेशी संबंधित आहे म्हणून या विवाहाला लॅव्हेंडर मॅरेज म्हणतात.

समाजातील मान-प्रतिष्ठा वाचवण्यासाठी, टोमणे टाळण्यासाठी आणि लैंगिक आवडीनिवडी लपवण्यासाठी अशा प्रकारचे लग्न केले जाते. जेणेकरुन समाज व कुटुंबीयांकडून त्यांना लग्न न केल्यामुळे कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. ‘बधाई दो’ या चित्रपटातही सुमन आणि शार्दूल अशाप्रकारे लग्न करतात आणि सामान्य रूम मेट सारखे राहतात.

भारतातील ‘लॅव्हेंडर मॅरेज’ (Lavender marriage in India)

६ सप्टेंबर २०१८ रोजी न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात अनेक वर्षे जुनी तरतूद काढून दोन प्रौढ समलैंगिकांचे संबंध कायदेशीर केले होते. न्यायालयाने कलम ३७७ मधील ती तरतूद काढून टाकली होती, ज्यामध्ये एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींना संबंध ठेवण्याची परवानगी नव्हती. पण तरीही अनेकजणांना आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या भीतीने लोकांसमोर आपली लैंगिक आवड व्यक्त करणे फार कठीण जाते.

आपल्या देशात अजूनही असे मानले जाते की मुलाने किंवा मुलीने नेहमी विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीशीच लग्न करावे, संसार करावा आणि मुलांना जन्म द्यावा. याच कारणामुळे त्या ऐतिहासिक निर्णयानंतरही समलिंगी लोकांना लग्न करणे किंवा एकत्र राहणे कठीण जाते. एखाद्याने असे करण्याचा विचार केला तरीही, त्याला/तिला समाज आणि कुटुंबाकडून नाकारले जाण्याची भीती नेहमीच असते. यामुळे ते आपली लैंगिक आवडनिवड इतरांपासून लपवून ठेवतात. परंतु भारतात गेल्या काही वर्षांत अनेक समलिंगी जोडप्यांचे विवाह झाले आहेत, ज्यामुळे समाजातील विचार बदलू लागले आहेत.

अनेकजण विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीशी कायदेशीररित्या विवाह करण्यास तयार असतात, जेणेकरून ते त्यांच्या समलिंगी जोडीदारासोबत एकांतात राहू शकतील. असे लोक लॅव्हेंडर मॅरेज करतात. परंतु त्यानंतरही या जोडप्यांच्या जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. यातील सर्वात मोठी सामान्य म्हणजे मुलांचा जन्म. जर दोन समलैंगिक व्यक्तींनी अशाप्रकारचे लग्न केले, तर त्यांच्या कुटुंबियांच्या मुले होण्याच्या दबावातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे.