संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात मुन्ना मेडिकलची प्रवेश परीक्षा कशी उत्तीर्ण होतं हे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेलच. स्वतःऐवजी एका निष्णात डॉक्टरला पकडून त्याला धमकावून त्याच्याकडून पेपर लिहून घेतो आणि स्वतः चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. नंतर मग त्याला याची चटकच लागते आणि तो पुढील प्रत्येक परीक्षा अशापद्धतीने चिटिंग करूनच पास होतो.

हा झाला चित्रपटातील गंमतीचा मुद्दा, पण काँट्रॅक्ट चीटिंग नावाची एक संकल्पना अगोदरच अस्तित्त्वात आहे. एखादी व्यक्ति एका विद्यार्थ्याच्या नावाने परीक्षेला बसते आणि त्या विद्यार्थ्याच्याच नावाने तो पेपर जमा करते. यामध्ये सर्वसामान्यपणे पालक, भावंड, मित्र किंवा नातेवाईक सहभागी होतात तर कधी कधी विशिष्ट संस्थांद्वारे यासाठी वेगळं मानधन आकारून पेपर लिहिणाऱ्य व्यक्तीला तिथे नेमलं जातं. यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह अनेक देशांमध्ये या संस्था बेकायदेशीर मानल्या जातात. ‘कॉंट्रॅक्ट चिटिंग’ ही संकल्पना जागतिक स्तरावर जरी सुप्रसिद्ध असली तरी, भारतातील शिक्षण क्षेत्रासाठी ही गोष्ट नवीनच आहे.

आणखी वाचा : पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या राज कुंद्राने केलं शर्लिनच्या अश्लील व्हिडिओबद्दल वक्तव्य; म्हणाला, “ती समाजासाठी…”

या संकल्पनेचा धोका बघायला गेलं तर बराच आहे. ज्या विद्यार्थ्याच्या नावाने पेपर सोडवला जातो, त्या विद्यार्थ्याच्या पुढील आयुष्यात याचा सर्वात जास्त परिणाम होतो. तो विद्यार्थी जेव्हा खऱ्या आयुष्यात नोकरीला लागतो आणि तेव्हा त्याला त्याला एखादी गोष्ट येत नसेल तर हे त्याच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. जी शिकवण त्याने पेपरमधून घ्यायला हवी होती ती शिकवण न मिळाल्याने त्याला नक्कीच याचा त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ आपल्या मित्राकडून पेपर लिहून घेणाऱ्या डॉक्टरकडे तुम्ही इलाज करायला जाल का? किंवा शैक्षणिक गफलत करून उत्तीर्ण झालेल्या पायलटच्या विमानात तुम्ही बसणं पसंत कराल का?

अशापद्धतीने चीट करून उत्तीर्ण होऊन तरुणांचं नुकसान तर होतंच शिवाय या अशा संस्थांना पैसे देऊन पेपर लिहून घेणाऱ्या मुलांना नंतर ब्लॅकमेलदेखील केलं जातं आणि पुढे त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. बऱ्याचदा नापास होण्याची भीती, पैशाची चणचण आणि एखादा कोर्स लवकरात लवकर पूर्ण करायचा असल्या कारणाने विद्यार्थी अशा अवैध मार्गाचा अवलंब करतात, पण एकदा त्याची सवय लागली की त्यात ते संजय दत्तने साकारलेल्या मुन्नाभाईप्रमाणे गुरफटत जातात. या सगळ्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होतो.

आणखी वाचा : विश्लेषण : १६ वर्षांत २९ रुग्णांची हत्या, Netflix वरील चित्रपटातून समोर आलेला विकृत ‘नर्स’ चार्ल्स कुलेन होता तरी कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजूनतरी भारतात ही संकल्पना रूढ झालेली नाही. पण ही गोष्ट एकूणच जगातील विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत घातक आहे. भारतात ‘कॉंट्रॅक्ट चीटिंग’ हा अजून प्रचलित नसला तरी येणाऱ्या काळात तो फोफावू शकतो असं तज्ञांचं मत आहे.