अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सोमवारपासून न्यूयॉर्कमध्ये ‘हश मनी’ खटला चालवला जात आहे. पूर्वी एका पॉर्न अभिनेत्रीबरोबर असलेले प्रकरण मिटवण्यासाठी संबंधितांना पैसे देऊन त्याविषयी हिशेबांमध्ये फेरफार केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. २०१६मधील अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर हे प्रकार घडले होते. कुणाबरोबरही संबंध ठेवणे किंवा त्याविषयी वाच्यता होऊ नये यासाठी पैसे देणे (हश मनी) हा अमेरिकेत मोठा गुन्हा नाही. मात्र या देयकांचे अस्तित्व मिटवण्यासाठी आर्थिक अफरातफर करणे हा तेथे गंभीर किंवा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरतो. अशा फौजदारी खटल्याला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच माजी अध्यक्ष ठरतात.

प्रकरण काय?

स्टॉर्मी डॅनियल्स या पॉर्न अभिनेत्रीने ट्रम्प यांच्याबरोबर पूर्वी संबंध असल्याचा दावा करून त्यासंबंधी किस्से आणि आठवणी अमेरिकेतील काही प्रकाशकांकडे प्रसिद्धीसाठी पाठवल्या होत्या. त्यांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी ट्रम्प यांनी, २०१६मधील अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना स्टॉर्मी डॅनियल्सला १,३०,००० डॉलर्स दिले. हे पैसे ट्रम्प यांचे सहकारी मायकेल कोहेन यांच्या वतीने ट्रम्प यांच्या सांगण्यावरून देण्यात आले. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कधीतरी ट्रम्प यांनी कोहेन यांना ते पैसे परत केले. परंतु ही देयके कोहेन यांचे मानधन म्हणून देण्यात आल्याचे दाखवले गेले. यासंबंधी कोहेन यांच्याशी झालेल्या कराराची कागदपत्रे नकली असल्याचे न्यूयॉर्कच्या सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.

PM Narendra Modi (2)
मुस्लीम समाजाबाबत मोदींचं घूमजाव! ‘मंगळसूत्र खेचतील’ पासून ‘ताजियाच्या मिरवणुकी’पर्यंत काय काय म्हणाले?
BJP in Rae Bareli Amit Shah Rahul Gandhi in Rae Bareli Lok Sabha seat
राहुल गांधींविरुद्ध उभे ठाकलेल्या भाजपा उमेदवाराला पाठिंबा द्यावा की नाही? पक्षांतर केलेल्या नेत्यांच्या मनात टू बी ऑर नॉट टू बी
Supreme Court cautions history sheets police amanatullah khan
गुन्हेगारांची ‘हिस्ट्री शीट’ नक्की असते तरी काय? सर्वोच्च न्यायालय त्याबाबत काय म्हणालं?
Nitin Gadkari, criticism, comment,
प्रचाराच्या रणधुमाळीत व्यक्तिगत टीका, टिप्पणीपासून ‘हा’ नेता अलिप्त
uddhav thackeray sharad pawar (2)
शरद पवारांच्या प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, “अनेक नेते…”
Chief Minister Eknath Shindes taunts to Naresh Mhaske attempt to comfort BJP leaders
मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
article about income tax reforms in india
लेख : राजकीय-वित्तीय लोकशाहीच्या मिलाफासाठी..

हेही वाचा : बैलजोडी ते हाताचा पंजा आणि पणती ते कमळ; निवडणुकीतील चिन्हांचा इतिहास

आणखीही प्रकरणे…

ट्रम्प सकृतदर्शनी दोषी केवळ स्टॉर्मी डॅनियल्स हश मनी प्रकरणातच आढळले आहेत. पण आणखीही काही प्रकरणे उजेडात आली आहेत. या सगळ्या प्रकरणांच्या प्रसिद्धीचे हक्क असलेल्या प्रकाशकांना मोठ्या रकमा देऊन ती मिटवून टाकण्याचा आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे २०१६मधील निवडणूक प्रचारावर प्रभाव टाकण्याचा व्यापक कट ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला, याविषयीदेखील या खटल्यामध्ये भर दिला जाणार आहे. ‘नॅशनल एन्क्वायरर’ या ट्रम्प यांच्याशी संबंधित असलेल्या टॅब्लॉइड पत्राने दोन प्रकरणांमध्ये ‘हश मनी’ वाटल्याचा आरोप आहे. यांतील एका प्रकरणात ट्रम्प टॉवरमधील एका कर्मचाऱ्याला ३० हजार डॉलर दिले गेले. ट्रम्प यांना एका विवाहबाह्य संबंधातून अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला होता. तो नंतर तथ्यहीन निघाला, तरी तोवर हा कर्मचारी गप्प राहावा यासाठी पैसे पाठवले गेले होते. दुसऱ्या प्रकरणामध्ये कॅरेन मॅकडूगल या माजी प्लेबॉय मॉडेलने ट्रम्प यांच्याशी पूर्वी असलेल्या प्रेमसंबंधांची वाच्यता करण्याचा निर्णय, ट्रम्प यांचा २०१६मधील निवडणूक प्रचार सुरू असताना घेतला. तिने याविषयीची कहाणी काही प्रकाशकांकडून मागे घ्यावी यासाठी १,५०,००० डॉलर देण्यात आल्याचा आरोप आहे.

यात ट्रम्प यांचा गुन्हा काय?

आर्थिक हिशोबांमध्ये फेरफार करणे हा न्यूयॉर्क राज्यात गुन्हा ठरतोच. पण असे फेरफार एखादे प्रकरण दडपण्यासाठी करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरतो. ट्रम्प येथेच अडकले. न्यूयॉर्क डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑल्विन ब्रॅग यांनी तीन मुख्य ठपके ठेवले आहेत : प्रचार हिशोबांमध्ये फेरफार, निवडणूक कायदा भंग, कर गैरव्यवहार. सरकारी वकिलांना ट्रम्प यांचा हेतू कुटिल असल्याचे सिद्ध करून दाखवावे लागेल.

हेही वाचा : एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?

दोषी आढळल्यास कोणती शिक्षा?

या खटल्यात किती आरोपांमध्ये ट्रम्प दोषी आढळतात, यावर त्यांचा संभाव्य तुरुंगवास अवलंबून आहे. ट्रम्प यांच्यावरील आरोपांची संख्या आणि त्याबाबत शिक्षेची तरतूद विचारात घेतल्यास तुरुंगवास ३४ वर्षांचा असू शकतो. पण न्यूयॉर्क राज्यात ट्रम्प यांच्यावर दाखल झालेला ‘फेलनी ई’ हा गुन्हा गंभीर गुन्ह्यांच्या उतरंडीमध्ये किरकोळ मानला जातो. त्यासाठी २० वर्षांपेक्षा अधिक शिक्षा देता येणार नाही, असा त्या राज्यातील नियम सांगतो. ट्रम्प यांच्याविरुद्ध आधी कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेलेला नाही. त्यामुळे संबंधित न्यायाधीश किरकोळ तुरुंगवास ठोठावू शकतात किंवा वर्तन सुधारणेची संधी देण्यासाठी ट्रम्प यांना ‘प्रोबेशन’वर पाठवू शकतात. या खटल्याच्या सुनावणीसाठी ट्रम्प यांना दररोज हजर राहावे लागेल आणि ही बाब गुंतागुंतीची ठरते. कारण संबंधित न्यायाधीश हुआन मेर्शान यांच्याशी त्यांचे अनेकदा खटके उडालेले आहेत.

प्रचार किंवा उमेदवारीवर काय परिणाम?

ट्रम्प या खटल्यात दोषी ठरले तरी त्यांच्या उमेदवारीवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण अध्यक्षपदावरील व्यक्तीसाठीच्या अटींमध्ये दोषी वा गुन्हेगार व्यक्तीसंबंधी अमेरिकेच्या घटनेमध्ये स्पष्ट उल्लेखच नाही. काही राज्यांमध्ये याविषयी अस्पष्ट उल्लेख आहे, पण फेडरल किंवा केंद्रीय पदांसाठी तो लागू नाही. मतदारयादीमध्ये कोणत्या उमेदवाराचे नाव घालायचे, हा अधिकार राजकीय पक्षांना असतो. हे नाव वगळण्यासंबंधी काही राज्ये कायदा करू शकतात, पण त्यासाठी त्या-त्या स्टेट असेम्ब्लीमध्ये ठराव आणावा लागेल. या मुद्द्यावर अमेरिकेतील राज्ये किंवा विश्लेषकांमध्ये एकवाक्यता नाही. मात्र घटनेमध्ये फेरफार करण्याचे स्वातंत्र्य राज्यांना दिले जाऊ नये, याविषयी तेथे एकवाक्यता आहे. सबब, ट्रम्प यांना दोषी ठरल्यानंतरही निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करू शकेल, अशी तरतूद तेथील घटनेत नाही. दोषी आढळल्यास ट्रम्प यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे ‘ट्रम्प ‘यांच्यासाठी मतदान’ करता येईल, पण खुद्द ‘ट्रम्प यांना’ मतदान करता येणार नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण होईल.

हेही वाचा : नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?

पक्षाकडून उमेदवारी नाकारली जाईल?

ती शक्यता अत्यंत धूसर आहे. कारण रिपब्लिकन पक्षामध्ये ट्रम्प यांच्या तोडीचा – हमखास निवडणूक जिंकून आणणारा – उमेदवार नाही. शिवाय आता अनेक प्रायमरीज आणि कॉकस जिंकल्यामुळे येथून माघारी घेणे रिपब्लिकन पक्षासाठी निवडणुकीच्या दृष्टीनेही जड जाऊ शकते.

हेही वाचा : इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?

तुरुंगात असताना ट्रम्प निवडून आले तर?

याविषयी संदिग्धता आहे. पुन्हा एकदा येथे अमेरिकी घटनेतील तरतुदींबाबत स्पष्टतेचा अभाव दिसून येतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे, आजवर अशी वेळच कुणा अध्यक्षावर आलेली नाही. बंदीवान अध्यक्ष आपली जबाबदारी पार पडू शकतात की नाही, याविषयी तेथील न्यायव्यवस्थेलाच काही ठोस निर्णय घ्यावा लागेल. अमेरिकी घटनेतील २५व्या दुरुस्तीनुसार, अध्यक्ष जबाबदारी निभावण्यास अक्षम असल्याचे निर्धारित करण्याची जबाबदारी उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळावर असते. तसे करण्याची हिंमत ट्रम्प यांचे विद्यमान सहकारी दाखवतील अशी शक्यता कमी आहे. अमेरिकी अध्यक्ष या नात्याने ट्रम्प स्वतःलाच माफी देऊ शकतात किंवा तुरुंगवास प्रलंबित करू शकतात, असे तेथील काही कायदेतज्ज्ञांना वाटते. किंवा, विद्यमान अध्यक्ष जो बायडेन आगामी निवडणुकीत हरल्यानंतर मावळते अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांना माफी देऊ शकतात. अमेरिकी जनतेचे मत विचारात घेऊन ट्रम्प यांना तुरुंगमाफी देणे योग्य ठरेल, असा निर्णय ते घेऊ शकतात. त्याचबरोबर न्यायपालिका लोकनिर्वाचित अध्यक्षांवर एका मर्यादेपलीकडे बंधने आणू शकत नाही, हा विचारप्रवाहही अमेरिकेत सशक्त आहे. त्याचा फायदा ट्रम्प यांना मिळू शकतो.