अमेरिकेत वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीची वातावरण-निर्मिती होत आहे. अशातच अमेरिका ख्रिश्चन राष्ट्र आहे की धर्मनिरपेक्ष हा विषयदेखील डोके वर काढत आहे. विशेषतः माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक ख्रिश्चन राष्ट्रवादासाठी आग्रही आहेत. सध्या तरी अमेरिका ख्रिश्चन राष्ट्र व्हावे यासाठी कोणतीही मोठी चळवळ आकाराला आलेली नाही. पण हा वाद काय आहे, काय आहे याचे वास्तव, याचा आढावा.

अमेरिकेची राज्यघटना काय सांगते?

अनेक अमेरिकी नागरिकांची अशी भावना आहे की, अमेरिकेची स्थापना एक ख्रिश्चन राष्ट्र म्हणून झाली होती. या विचाराने अधूनमधून काही पुराणमतवादी आणि रिपब्लिकन पक्षाचे समर्थक-कार्यकर्ते उत्साहित होत असतात. पण निरनिराळ्या लोकांसाठी ख्रिश्चन राष्ट्राच्या संकल्पनेचा निरनिराळा अर्थ आहे. हा विषय गुंतागुंतीचा आहे असे काही इतिहासकार मानतात. त्याचवेळी, अमेरिकेच्या स्थापनेची कागदपत्रे असे दर्शवतात की धार्मिक स्वातंत्र्याला प्राधान्य देण्यात आले होते, ख्रिश्चन राष्ट्राच्या स्थापनेस नाही.

Riot manipur
अमेरिकेचा भारताबाबतचा अहवाल अत्यंत पक्षपाती; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खंडन 
stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?
Israel, Iran , missile attack
विश्लेषण : इराण-इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार? परिस्थिती चिघळण्यास अमेरिकेची चूक कशी कारण ठरली?

हेही वाचा – विश्लेषण : संदेशखाली प्रकरणात तृणमूलची कोंडी; लोकसभेस भाजपसाठी कळीचा मुद्दा?

अमेरिकेच्या राज्यघटनेत ख्रिश्चन धर्म हा अधिकृत धर्म म्हणून स्थापित करण्यात आला आहे का?

नाही, अमेरिकेच्या राज्यघटनेत असे काहीही नमूद केलेले नाही. अमेरिकेत कोणत्याही पदावर किंवा सार्वजनिक ट्रस्टसाठी काम करण्यासाठी धर्म ही अर्हता म्हणून आवश्यक असणार नाही असे अनुच्छेद सहामध्ये नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेचे कायदेमंडळ असेलेली काँग्रेस अधिकृत धर्म स्थापित करण्यास किंवा कोणत्याही धर्माचे पालन करण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा करणार नाही असेही राज्यघटनेत करण्यात आलेल्या सुधारणेत स्पष्ट करण्यात आले आहे. ही सुधारणा सर्व राज्यांनाही लागू होते. सुरुवातीला रिपब्लिकन पक्षाच्या राजवटीत काही राज्यांनी विशिष्ट चर्चचा अधिकृत पुरस्कार केला होता. मात्र, काही वर्षांनंतर सर्व राज्यांनी अशा प्रकारचे समर्थन काढून घेतले. नागरी युद्धानंतरच्या १४व्या सुधारणेने अमेरिकी नागरिकांना कायद्याचे समान संरक्षण देण्यात आले.

अमेरिका हे ख्रिश्चन राष्ट्र आहे असे मत का व्यक्त केले जाते?

गेल्या शतकात, धर्माशी संबंधित पहिल्या सुधारणा प्रकरणांसंबंधी अशी भूमिका घेतली की, राज्ये सार्वजनिक धर्मांतरास, धार्मिक शिक्षणासाठी निधी देण्यास किंवा सार्वजनिक शाळांमध्ये प्रार्थना पुरस्कृत करण्यास मनाई करू शकत नाहीत. याचा अर्थ कसा लावायचा, असा प्रश्न आजही विचारला जातो. सतराव्या शतकात देवाने युरोपमधील ख्रिश्चनांना अमेरिकेत आणून अठराव्या शतकात त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले अशी काही जणांची धारणा आहे. अमेरिका बायबलनुसार देवाशी केलेल्या कराराचे पालन करत आहे असे त्यांना वाटते. अमेरिकेचे काही किंवा सर्व संस्थापक ख्रिश्चन होते किंवा राष्ट्राच्या स्थापनेशी संबंधित दस्तऐवज ख्रिश्चन धर्मावर आधारित होते त्यामुळे अमेरिका हा प्रामुख्याने ख्रिश्चन देश आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

अमेरिकी वसाहतींची काय स्थिती होती?

मॅसेच्युसेट्ससारख्या राज्यांमध्ये स्वातंत्र्यानंतरही काही दशके चर्चची राजवट होती, अशा राज्यांच्या स्थापना दस्तऐवजांमध्ये ख्रिश्चन धर्माशी संबंधित भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. ऱ्होड आयलंडसारख्या राज्यांना अधिक धार्मिक स्वातंत्र्य देऊ केले. अनेक वसाहतींना दीर्घकाळ आफ्रिकी लोकांना गुलाम करण्याचे आणि स्थानिक मूळ अमेरिकी नागरिकांवर अत्याचार केल्याचा इतिहास आहे. अशा राज्यांनी धार्मिक स्वातंत्र्याचा शब्द दिला पण तो पाळला गेला नाही असा आरोप केला जातो. अशा वेळी अधिकृत धर्म किंवा धार्मिक स्वातंत्र्य यापैकी काय वास्तव मानायचे हा प्रश्न उरतो.

अमेरिकेच्या संस्थापकांची धर्माबद्दल काय धारणा होती?

अमेरिकी क्रांतीच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा होत्या. काही ख्रिश्चन होते, काही एकतावादी, काही देववादी किंवा अन्यथा आस्तिक होते. बेंजामिन फ्रँकलिनसारखे काही संस्थापक नैतिक शिक्षक म्हणून ज्यू धर्माची प्रशंसा करत असत पण ते सनातनी ख्रिश्चनही नव्हते. अनेकांचा धार्मिक स्वातंत्र्यावर पूर्ण विश्वास होता, त्याचवेळी नागरिकांना सदाचारी असण्यासाठी धर्म महत्त्वाचा आहे हेही त्यांना मान्य होते.

स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि राज्यघटना हे ख्रिश्चन धर्म आणि १० आज्ञांवर आधारित होते का?

स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यातील विश्वाचा रचनाकार (क्रिएटर) आणि निसर्गाच्या देवाचे संदर्भ यातून ख्रिश्चन, एकतावादी, देववादी आणि इतरांना मान्य असेल असा एक सर्वसामान्य आस्तिकवाद दिसतो. दोन्ही दस्तऐवजांमध्ये नैसर्गिक हक्क आणि त्यासाठी उत्तरदायी सरकारच्या प्रबोधनात्मक विचारांचा प्रभाव आहे. काही जणांना या दस्तऐवजांमध्ये नियंत्रण व संतुलनासाठी मानवी पापासारख्या प्रोटेस्टंट कल्पनांनाही स्थान दिल्यासारखे वाटते. या दस्तऐवजात देवाचा संदर्भ दिला नसल्याने ख्रिश्चन राष्ट्रावर विश्वास असणाऱ्यांनी राज्यघटनेला मान्यता देण्यास कठोर विरोध केला होता. थोडक्यात, राज्यघटना ख्रिश्चन धर्मावर आधारित नाही असे मानणारेही अनेक जण होते आणि आहेत. यापैकी काही जणांना त्याला विरोध केला होता, तर काहींनी स्वागत आणि स्वीकार.

हेही वाचा – विश्लेषण: प्राणीसंग्रहालय सुरू करण्याचा सरकारला अधिकारच नाही! सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल का दिला?

ख्रिश्चन राष्ट्राची कल्पना केवळ पुराणमतवाद्यांनी मांडली होती का?

नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सामाजिक सत्याचा पुरस्कार करणारे अनेक जण ख्रिश्चन समाजाच्या उभारणीसाठी मदत करण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या महायुद्धात अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी रेडिओवरून भाषण देताना क्रुसेडचा, धर्मयुद्धाच्या संकल्पनेचा वापर केला. नागरी हक्कांसाठी लढा देणारे रेव्हरंड मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी ज्यू आणि ख्रिश्चन धर्माच्या वारशांचा संदर्भ दिला आहे.

आजच्या प्रगतशील ख्रिश्चनांचे काय म्हणणे आहे?

अमेरिकेतील ‘चर्च ऑफ क्राइस्टच्या नॅशनल कौन्सिल’ने २०२१ मध्ये असे निवेदन प्रसृत केले होते की, “ख्रिश्चन राष्ट्रवाद पारंपारिकपणे राष्ट्रीय अस्मिता आणि ध्येयाविषयी आदर्श दृष्टिकोनाचा प्रसार करणाऱ्या प्रतिमेचा वापर करतो, पण सामावून न घेतलेल्या, शोषित आणि छळ झालेल्या व्यक्तींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो”. या कौन्सिलमध्ये अनेक प्रगतशील पंथांचा समावेश आहे.

आज अमेरिकी लोकांना याबद्दल काय वाटते?

‘प्यू रिसर्च सेंटर’ने २०२२ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ६० टक्के सज्ञान अमेरिकींना असे वाटते की देशाच्या संस्थापकांना ख्रिश्चन राष्ट्राची स्थापना करायची होती. अमेरिका हे ख्रिश्चन राष्ट्र असावे अशी इच्छा ४५ टक्क्यांनी व्यक्त केली होती, मात्र अमेरिका हे ख्रिश्चन राष्ट्र आहे असा समज असणाऱ्यांची संख्या केवळ एक तृतियांश इतकीच आढळली. श्वेतवर्णीय इव्हेंजेलिकल प्रोटेस्टंटपैकी ८१ टक्क्यांनी असे मत व्यक्त केले होते की, संस्थापकांना ख्रिश्चन राष्ट्र अभिप्रेत होते आणि अमेरिका ख्रिश्चन राष्ट्र असावे असे म्हणणारे तितकेच श्वेतवर्णीय इव्हेंजेलिकल प्रोटेस्टंट होते. विशेष म्हणजे २०२१ मध्ये अमेरिका ख्रिश्चन राष्ट्र म्हणून घोषित व्हावे अशी इच्छा असणारे केवळ १५ टक्के होते, तर राज्यघटना देवावरून प्रेरित आहे असे मानणाऱ्यांची संख्या १८ टक्के होती. वर्षभरात असा विचार करणाऱ्या अमेरिकींची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून येत आहे.