भारत सरकारने मोबाइल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी कॉमन USB Type C चार्जरला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या वतीने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अर्थात BIF ने मार्च २०२५ पर्यंत सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी कॉमन यूएसबी टाइप सी चार्जर आणण्यास मंजुरी दिली आहे. इ-कचरा कमी करणं हा यामागचा मुख्य उद्येश आहे. या योजनेमुळे वापरकर्त्यांना लॅपटॉप, स्मार्टफोन, नोटबुक किंवा इतर उपकरणांसाठी वेगवेगळा चार्जर बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याची स्थिती नेमकी काय आहे?

सध्याच्या स्थितीत आपण कुठलंही इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करण्यासाठी गेलो की त्यासोबत चार्जर येतोच. मग तो लॅपटॉप असो किंवा स्मार्ट फोन. जर हा चार्जर खराब झाला तर नवा चार्जर घेण्यासाठी पैसेही मोजावेच लागतात. लॅपटॉपचा चार्जर बिघडला तर वेगळा खर्च, मोबाइलचा चार्जर बिघडल्यास वेगळा खर्च या गोष्टी होतात. त्यामुळेच आता सगळ्या उपकरणांसाठी एकच कॉमन चार्जर जो USB Type C असणार आहे तो आणण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. इ-कचरा कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is one nation one charger plan what exactly will happen with usb type c scj
First published on: 12-01-2023 at 12:41 IST