सध्या आयपीएलमध्ये एका ब्रॅण्डचं नाव वारंवार दिसून येत आहे. तो ब्रॅण्डमध्ये टाटा न्यू (एनईयू). हा ब्रॅण्ड सात एप्रिल रोजी बाजारामध्ये लॉन्च होणार आहे. गुगल प्रे स्टोअऱच्या आपल्या पेजवर टीझरच्या माध्यमातून कंपनीने याची माहिती दिली. या आपल्या सुपर अ‍ॅपची कंपनीने जाहीरातही सुरु केलीय. आयपीएलमध्ये तर दर सामन्यामध्ये या नवीन ब्रॅण्डची जाहिरात पहायला मिळते. सध्या हे अ‍ॅप केवळ टाटा कंपनीमधील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलंय.

हे अ‍ॅप नक्की काय आहे?

टाटा न्यू हे टाटाच्या अंतर्गत मिळणाऱ्या सर्व डिजीटल सेवा एकाच प्लॅटफॉर्मवरुन उपलब्ध करुन देणारं सुपर अ‍ॅप आहे. “या अ‍ॅपवरुन डिजीटल कंटेटचा आनंद घ्या, पेमेंट करा, तुमचे आर्थिक व्यवहार संभाळा, पुढील ट्रीप प्लॅन करा किंवा तुमचं पुढील जेवण यावरुन मागवा… या टाटा न्यू अ‍ॅपच्या जगामध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी आणि अनुभवण्यासारखं बरंच काही आहे,” असं गुगल प्लेवरील या अ‍ॅपच्या डिस्क्रीप्शनमध्ये लिहिलेलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?

या अ‍ॅपवर कोणत्या सेवा उपलब्ध असतील?

या अ‍ॅपवरुन ग्राहकांना वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करुन दिल्या जातील. ज्यामध्ये एअर एशिया इंडिया, एअर इंडिया तिकींटाचं बुकींग करणं, ताज ग्रुप कंपन्यांअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्सचं बुकींग करणं, बिग बास्केटवरुन किराणामाल ऑर्डर करणं, वन एमजीवरुन औषधं ऑर्डर करणं, क्रोमावरुन इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑर्डर करणं किंवा अगदी कपडेही या अ‍ॅपवरुन ऑर्डर करता येतील. या अ‍ॅपवरुन व्यवहार केल्यावर कंपनी युझर्सला न्यू कॉन्स रिवॉर्ड म्हणून देईल. हे कॉइन्स नंतर रिडीम करुन ते अ‍ॅपवरुन पुरवण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घेण्यासाठी वापरता येतील.

भारतात असे सुपर अ‍ॅप्स आहेत का?

देशामधील अ‍ॅमेझॉन, पेटीएम, रिलायन्स जिओ यासारख्या कंपन्यांनी त्यांचे सुपर अ‍ॅप्स बनवले आहेत. यामध्ये पेमेंट, कंटेंट, शॉपिंग, भटकंतीसाठी तिकीटं काढणं, किरणामाल असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्या देशामधील लोक डेक्सटॉप किंवा लॅपटॉपपेक्षा स्मार्टफोन अधिक वापरत असतील तर तो देश किंवा तो प्रांत हा सुपर अ‍ॅपच्या वापरासाठी उत्तम बाजारपेठ समजला जातो. भारत अशीच एक बाजारपेठ असल्याने आता या क्षेत्रामध्येही मोठी स्पर्धा निर्माण झालीय.