पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने राज्यातील राज्यसभेच्या रिक्त झालेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. दोन जागांसाठी पोटनिवडणूक असली तरी या दोन्ही जागा वेगवेगळ्या गृहित धरल्या जातात. यामुळेच दोन्ही जागांसाठी स्वतंत्र अधिसूचना जारी केली जाते. एकाच वेळी होणारी पोटनिवडणूक स्वतंत्रपणे घेण्याच्या विरोधात न्यायालयात आव्हान देण्यात आले होते पण न्यायालयाने स्वतंत्र निवडणुकांचा निवडणूक आयोगाचा आदेश वैध ठरविला होता.

प्रत्येक जागेची निवडणूक स्वतंत्र का धरली जाते?

राज्यात राज्यसभेच्या दोन जागांसाठी अलीकडेच पोटनिवडणूक झाली. या दोन्ही जागांसाठी स्वतंत्र अधिसूचना काढण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडून राज्यसभेसाठी प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक घेतली जाते. १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील १४७ ते १५१व्या कलमातील तरतुदींनुसार प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक घेण्याची तरतूद आहे. एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक जागांसाठी पोटनिवडणूक होणार असल्यास प्रत्येक जागेकरिता स्वतंत्र पोटनिवडणूक झाल्यास सत्ताधारी पक्षाचा फायदा होतो. कारण प्रत्येक जागेसाठी वेगळे मतदान घेतले जाते. यामुळेच विरोधकांचा नेहमीच स्वतंत्र निवडणूक घेण्यास विरोध असतो. कारण दोन जागांसाठी एकत्रित निवडणूक झाल्यास सत्ताधारी व विरोधकांना प्रत्येकी एक जागा मिळू शकते. पण दोन जागांसाठी स्वतंत्र निवडणूक झाल्यास सत्ताधारी पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून येतात.

Raj Thackeray appeal, Raj Thackeray,
जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आव्हान
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
All parties rally for womens vote in Raigad
रायगडमध्ये महिला मतांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी
Vijay wadettiwar
“निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच मविआची उमेदवारी”, विजय वडेट्टीवारांचे विधान
bjp flag
भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठ्यांचा खेळ !
possibility of a rift in the Mahavikas Aghadi over the Gondia Assembly Constituency
पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!
The ruling Shinde Pawar group and the Thackeray group also demand that the polls be held in a single phase
एकाच टप्प्यात मतदान घ्या! सत्ताधारी शिंदे, पवार गटासह ठाकरे गटाचीही मागणी; भाजप, काँग्रेसचे मात्र मौन
Remove Director General of Police Rashmi Shukla Congress demand to Election Commission print politics news
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

हेही वाचा…२०० वर्ष जुना स्टॅम्प पेपर, ईस्ट इंडिया, जाती व्यवस्था आणि महिला; तत्कालीन, समाजाची नेमकी कोणती माहिती मिळते?

न्यायालयाने कोणता आदेश दिला होता?

स्वतंत्र पोटनिवडणूक घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात विविध न्यायालयांमध्ये त्याला आव्हान देण्यात आले होते. ए. के. वालिया विरुद्ध भारत सरकार या खटल्यात जानेवारी १९९४ मध्ये स्वतंत्र निवडणूक घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने वैध ठरविला होता. याचिकाकर्त्यांनी स्वतंत्र निवडणूक घेण्याचा आदेश सत्ताधारी पक्षाला मदत करण्याच्या उद्देशाने घेण्यात आल्याचा युक्तिवाद केला होता. पण न्यायालयाने निवडणूक आयोगाला तसा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला होता. सत्यपाल मलिक विरुद्ध निवडणूक आयोग खटल्यातही निवडणूक आयोगाचा अधिकार मान्य करण्यात आला होता. देशातील विविध न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिकांमध्ये निवडणूक आयोगाचा स्वतंत्र निवडणूक घेण्याचा अधिकार मान्य करण्यात आला होता.

राजकीय पक्षांचा विरोध का?

एकाच वेळी तीन जागांसाठी पोटनिवडणूक झाल्यास ती एकत्रित निवडणूक मानल्यास संख्याबळानुसार विरोधकांचा एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो. पण तीन जागांसाठी स्वतंत्र निवडणूक घेतल्यास सत्ताधारी पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात. कारण प्रत्येक जागेसाठी मतदान झाल्यास सत्ताधारी पक्षाचे अधिकचे संख्याबळ फायदेशीर ठरते. यामुळेच प्रत्येक वेळी विरोधकांकडून स्वतंत्र निवडणूक घेण्यास आक्षेप घेतला जातो. राज्यात २००९ मध्ये अशीच तीन जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक झाली असता त्याला तेव्हा शिवसेनेत असणारे राहुल नार्वेकर यांनी विरोध नोंदविला होता. गुजरातमध्ये काँग्रेसच्या वतीने न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

हेही वाचा…ऑनलाइन बेटिंग ॲप आता ईडीच्या रडारवर… १ लाख कोटींचा महसूल बुडवणाऱ्या बेटिंग ॲपच्या जाळ्यात आजही कित्येक का फसतात?

निवडणूक आयोगाची भूमिका काय?

विविध राजकीय पक्षांकडून स्वतंत्रपणे पोटनिवडणुका घेण्याच्या निर्णयावरून आरोप होऊ लागल्याने निवडणूक आयोगाने मागे या संदर्भात स्पष्टीकरण दिले होते. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसारच राज्यसभेसाठी रिक्त झालेल्या जागांवर स्वतंत्र पोटनिवडणूक घेतली जाते. एकापेक्षा अधिक जागांसाठी होणारी पोटनिवडणूक ही स्वतंत्र मानण्याचा निवडणूक आयोगाचा आदेशही न्यायालयाने विविध खटल्यांमध्य मान्य केला आहे, असा दावाही निवडणूक आयोगाने केला आहे.

santosh.pradhan@expressindia.com