आपण यापूर्वी धावणे, स्विमिंग यांसारख्या अनेक शर्यतींविषयी ऐकले आहे. परंतु, जगात पहिल्यांदाच एका आगळ्या वेगळ्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचे नाव आहे ‘स्पर्म रेस’. हे अगदी खरंय चक्क सूक्ष्मदर्शकाखाली (मायक्रोस्कोप) शुक्राणूंची तपासणी करून ही शर्यत घेण्यात येणार आहे. लॉस एंजेलिसमध्ये जगातील पहिल्या शुक्राणूंच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. या शर्यतीसाठी एक रेसट्रॅक डिझाईन करण्यात आला आहे. ही शर्यत बघण्यासाठी हजारो प्रेक्षक उपस्थित राहणार आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? स्पर्म रेस म्हणजे नक्की काय? त्याविषयी जाणून घेऊ.

स्पर्म रेस म्हणजे काय?

या स्पर्म रेसचे आयोजन किशोरवयीन मुलांनी स्थापन केलेल्या एका स्टार्टअपद्वारे करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन २५ एप्रिल रोजी हॉलीवूड पॅलेडियममध्ये होणार आहे. या कंपनीकडून ही शर्यत बघण्यासाठी खास व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. हे केवळ मनोरंजनासाठी असल्याचे लोकांचे सांगणे आहे. परंतु, या शर्यतीचा उद्देश पुरुषांमध्ये जागरूकता वाढवणे आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

या शर्यतीचे स्वरूप कसे असेल?

ही शर्यत विशेषतः डिझाइन केलेल्या ट्रॅकवर होईल. हा ट्रॅक मादी प्रजनन प्रणालीसारखे कार्य करील. तसेच, ही शर्यत गतिमानता, रासायनिक संदेश यांवर आधारित असेल. सर्व चार हजार नागरिकांच्या उपस्थितीत ही शर्यत पार पडणार आहे. ही शर्यत मोठ्या स्क्रीनवर प्रसारित केली जाईल, ज्यामध्ये कॉमेंट्री आणि अगदी त्वरित रिप्लेदेखील असतील. कोणत्याही मोठ्या क्रीडा स्पर्धेप्रमाणेच याचे आयोजन केले जाणार आहे.

त्यासाठी जगातील सर्वांत लहान रेस ट्रॅक तयार केला गेला आहे. कंपनीच्या जाहीरनाम्यात असे म्हटले आहे, “या शर्यतीचा नेमका अर्थ असा की, सुमारे ०.०५ मिलिमीटर लांबीचे शुक्राणू २० सेंटीमीटर ट्रॅकवर सोडले जातील. शुक्राणूची लांबी सामान्य शुक्राणूच्या लांबीच्या दोन-तृतियांश असेल. ट्रॅकची रचनाही अशा स्वरूपाची करण्यात आली आहे, जसे ते अंड्यामध्ये प्रवेश करतील. ज्या शुक्राणूचा वेग सर्वाधिक असेल, तो ही शर्यत जिंकेल. शुक्राणू सहसा प्रति मिनीट सुमारे पाच मिलिमीटर वेगाने फिरतात आणि जर शुक्राणू अगदी सरळ रेषेत गेले, तर शर्यत सुमारे ४० मिनिटांत संपू शकते.

कंपनीच्या या संकल्पनेसाठी आतापर्यंत एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभारण्यात आला आहे. निधी उभारणाऱ्यांमध्ये कराटेज, फिगमेंट कॅपिटल, बायोहॅकिंग समुदायातील सदस्यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे या शर्यतीवर सट्टेबाजी होणर असल्याचीही माहिती आहे. प्रेक्षक त्यांच्या निवडलेल्या शुक्राणूला अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यात प्रोत्साहन देऊ शकतात.

पुरुष प्रजननक्षमतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन

कंपनीची ही कल्पना खेळकर किंवा हास्यास्पद वाटू शकते; परंतु त्यामागे कंपनीने संदेश देण्याच्या प्रयत्नातून या स्पर्धेचे आयोजन करण्याची योजना आखली. मनात एक खोल संदेश आहे. पुरुष प्रजनन क्षमतेत होणारी चिंताजनक घट, ही सध्या सर्वांत मोठी आणि गंभीर समस्या आहे. त्याबाबत जागरूकता महत्त्वाची असल्याचे कंपनीचे सांगणे आहे. ह्युमन रिप्रॉडक्शन अपडेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या २०२२ च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, गेल्या ५० वर्षांत पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या ५० टक्क्यांहून अधिक घसरली आहे. “आम्ही असा विषय हातात घेतला आहे, ज्याकडे कोणीही लक्ष देऊ इच्छित नाही,” असे स्पर्म रेसिंगचे १७ वर्षीय सह-संस्थापक एरिक झू यांनी कार्यक्रमाच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

समस्येचा सामना करावा लागतो. शुक्राणूंची संख्या कमी असणे, गतिशीलता कमी असणे किंवा इतर अडथळ्यांचा सामना या पुरुषांना करावा लागतो. त्यात मुख्य बाब म्हणजे अर्ध्याहून अधिक प्रकरणे अशी असतात, ज्यात पुरुषांना ही समस्या नक्की का येत आहे, याचे कारणच माहीत नसते. परंतु, संशोधनातून काही मुख्य कारणे समोर आली आहेत. त्यात असे दिसून आले आहे की धूम्रपान, मद्यपान, झोपेच्या पद्धती यांसारख्या जीवनशैलीतील काही घटकांचा शुक्राणूंवर मोठा दुष्परिणाम होतो.

शुक्राणूंची गुणवत्ता हा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारा प्रमुख घटक आहे. शरीरातील इतर अवयवांप्रमाणे प्रजनन प्रणालीसुद्धा पोषक आणि जीवनसत्त्वावर अवलंबून असते. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढते आणि शुक्राणूंची संख्याही यांबरोबरच शुक्राणूंची गतिशीलता आणि गुणवत्ताही वाढते. “पुरुषांची प्रजनन क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. ही बाब सातत्याने वाढत आहे; मात्र कोणीही त्याबद्दल काही बोलण्यास तयार नाही, ” असे एरिक झू पुढे म्हणाले.

स्पर्म रेसिंगचे आयोजन करणाऱ्यांना हेच बदलायचे आहे. त्यांचे म्हणणे आहे, “जर तुम्ही खेळांसाठी प्रशिक्षण घेऊ शकता. तुमचा फॉर्म भरण्याकरिता वेळ घालवू शकता, तर तुम्ही तुमचे आरोग्य संतुलित करू शकत नाही का? तुम्ही त्याकडे लक्ष का देऊ शकत नाही, ते का सुधारू शकत नाही, त्याविषयी स्वतःशी स्पर्धा का करू शकत नाही?,” असे त्यांचे सांगणे आहे.