News Flash

FIFA World Cup 2018 : स्पर्धेआधी मेक्सिकोच्या खेळाडूंची प्रॉस्टिट्यूट्ससोबत ‘वॉर्म अप’ पार्टी

यंदाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या मेक्सिकोच्या संघाने स्पर्धेत सहभागी होण्याआधी वेगळाच सराव केल्याचे समजले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

फुटबॉल चाहत्यांसाठी चार वर्षांतून एकदा येणारा उत्सव म्हणजे FIFA World Cup. यंदाचा FIFA World Cup 2018 हा रशिया येथे १४ जूनपासून सुरु होणार आहे. या महासंग्रामासाठी प्रत्येक संघ आपापल्या खेळाडूंकडून प्रचंड परिश्रम करून घेत आहे. स्पर्धेआधी विविध क्लुक्त्या वापरून त्यांना चांगले वातावरण निर्माण करून देत आहेत. काही प्रशिक्षक आपल्या संघाने स्पर्धेआधी अधिकाधिक सराव सामने खेळावेत, या साठी प्रयत्नशील आहेत. मात्र यंदाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या मेक्सिकोच्या संघाने स्पर्धेत सहभागी होण्याआधी वेगळाच सराव केल्याचे समजले आहे.

मेक्सिकोच्या संघाने स्कॉटलंडला शनिवारी १-० अशा फरकाने पराभूत केले. त्यांनतर हा संघ आता लवकरच FIFA World Cup 2018 साठी रशियाला रवाना होणार आहे. मात्र स्कॉटलंडवरील विजयानंतर मेक्सिकोच्या संघाने चक्क ३० देहविक्रय करणाऱ्या तरुणींसोबत पार्टी केली असल्याचे समजले आहे. मेक्सिकोतील टीवी नोटास गॉसिप या स्थानिक वर्तमानपत्रात या बाबतीतील वृत्त प्रकाशित झाले आणि त्यानंतर या बाबत चर्चांना उधाण आले.

या वृत्तानुसार, पार्टीमध्ये मेक्सिकोचे ९ खेळाडू आणि ३० प्रॉस्टिट्यूट्स होत्या. या खेळाडूंमध्ये गोलकिपर गुलेर्मो ओचोआ, रॉल जीमेन्झ, कार्लोस साल्सेडो, मार्को फॅबियन, जोनाथन आणि जिओव्हानी दोस सांतोस हे खेळाडू होते. मात्र या खेळाडूंवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे मेक्सिकोच्या फुटबॉल संघटनेने सांगितले आहे.

संघटनेच्या अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की आम्ही खेळाडूंना कोणतीही परवानगी दिली नव्हती. ही पार्टी करणे हा त्यांचा वैक्तिक निर्णय होता. आणि त्यांना मधल्या काळात मोकळा वेळ मिळाला असताना त्यांनी हे केले आहे. संघाशी संबंधित गोष्टी वगळता त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही केले तरी आम्ही काही करू शकत नाही. असे सांगत त्यांनी खेळाडूंवर कारवाई होणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या विश्वचषकात ज्या संघांना सेक्स करण्याची मुभा देण्यात आली होती, त्या देशांनी चांगली कामगिरी केली होती, असा निष्कर्ष काहींनी काढला होता. तसेच, ब्राझीलमधील २०१४च्या विश्वचषकात मेक्सिकोच्या खेळाडूंना सेक्स करण्याची परवानगी नाकारली होती. तेव्हा मेक्सिकोला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, असाही निष्कर्ष काढण्यात आला होता. बहुतेक तो इतिहास पाहता, यावेळी मेक्सिकोच्या खेळाडूंवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे संघटनेने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:35 pm

Web Title: mexican football players 30 prostitutes warm up party
टॅग : Fifa,Football,Mexico
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : …म्हणून फिफाचं अॅन्थम साँग क्रीडा रसिकांना पाहावेना
2 गट ग : बेल्जियम, इंग्लंडचे पारडे जड
3 FIFA World Cup 2018 : फिफाच्या ब्रँड अॅम्बेसिडरविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?
Just Now!
X