FIFA World Cup 2018 CRO vs ENG : फिफा विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या उपांत्य फेरीत क्रोएशियाने इंग्लंडला २-१ असे पराभूत केले. या विजयासह क्रोएशिया इतिहासात प्रथमच फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले. अनेक बलाढ्य संघाला धूळ चारत क्रोएशियाने ही कामगिरी केली. इंग्लंडला नमवून हा संघ विजयी झाला. त्यामुळे या देशातील फुटबॉल चाहत्यांनी जंगी सेलिब्रेशन केले. क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षा कोलिंडा किटरोव्हिच या देखील सामन्याच्या ठिकाणी होत्या. त्यांनीही राष्ट्रीय संघाची जर्सी घालून संघाबरोबर विजय साजरा केला.

क्रोएशियाच्या ५० वर्षीय राष्ट्राध्यक्षा कोलिंडा किटरोव्हिच या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. क्रोएशियाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवून पहिल्यांदा अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. हा सामना पाहण्यासाठी कोलिंडा स्वत: स्टेडिअममध्ये उपस्थित होत्या. सामना जिंकल्यानंतर व्हिआयपी भागात त्यांनी रशियन पंतप्रधानांच्या समोर आनंद व्यक्त केला. त्यांनी ड्रेसिंग रुमध्ये जाऊन संघाबरोबर जल्लोष केला आणि संघांतील खेळांडूंसोबत डान्स केला. कोलिंडा यांचा हा दिलखुलास अंदाज साऱ्यांचे लक्ष वाहून घेणारा ठरला.

या साऱ्या गोष्टींदरम्यान ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षा कोलिंडा किटरोव्हिच यांना काही नेटकऱ्यांनी पॉर्न स्टार समजण्याची गल्लत केली. क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षा कोलिंडा किटरोव्हिच आणि अमेरिकन पॉर्न स्टार डायमंड फॉक्स यांच्या चेहऱ्यातील साम्यामुळे नेटकऱ्यांची गफलत झाली आणि अनेकांनी त्यांना पॉर्न स्टार समजून ट्विट केले. इतकेच नव्हे तर त्या पॉर्न स्टारचे बिकिनीत फोटोही पोस्ट केले. मात्र अखेर काही सुज्ञ नेटकऱ्यांनी या दोन व्यक्ती वेगळ्या असल्याचे निदर्शनास आणून दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, काही नेटकऱ्यांनी त्या सुप्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार आईस-टी हिची प्रेयसी कोको ऑस्टिन असून कोको ऑस्टिनचे काही फोटो पोस्ट केले होते. मात्र अखेरीस या दोन व्यक्तीही वेगळ्या असल्याचे काहींनी लक्षात आणून दिले.