14 August 2020

News Flash

प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : गणेश आराधनेविषयीच्या शंका करा दूर

त्सव साजरा करत असताना आपल्या मनात नकळत अनेक विचार येऊन जातात. आपण करत असलेल्या या विचारांमागे कितपत तथ्य असते. गणपतीची आराधना नेमकी कशी करावी अशा

गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस. काहींच्या बाप्पाचे विसर्जनही झाले, अनेकांकडे आज गौरींचे आगमन झाले. आणखी ८ दिवस या महोत्सवाची धुमधाम सुरु राहील. पण उत्सव साजरा करत असताना आपल्या मनात नकळत अनेक विचार येऊन जातात. आपण करत असलेल्या या विचारांमागे कितपत तथ्य असते. गणपतीची आराधना नेमकी कशी करावी अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण पंचांगकर्ते मोहन दाते यांच्याकडून जाणून घेतली आहेत. पाहूयात असेच काही प्रश्न

१. गणपतीची पूजा योग्यप्रकारे न झाल्यास गणपती रागावतो असा भीतीयुक्त समज आहे. यात किती तथ्य आहे?

आपण एखाद्या देवतेची पूजा करताना ती मनापासून व श्रद्धेनी करावी, मनापासून व श्रद्धापूर्वक पूजा करणाऱ्यांना अशी भीती वाटण्याचं कारण नाही. गणपती रागावतो या समजात काहीही तथ्य नाही. पूजेच्या संकल्पामध्येच असे म्हणलेले असते की माझ्या ज्ञानाप्रमाणे, मला उपलब्ध असलेल्या पूजा साहित्यानुसार हे गणेशा मी तुझे पूजन करीत आहे. गणपतीच्या बाबतीत उजव्या सोंडेचा गणपती आणू नये असे अनेक गैरसमज आहेत पण त्यात काहीही तथ्य नाही. आपण त्याचे विघ्नहर्ता म्हणजे विघ्नांचा नाश करणारा म्हणून पूजन करतो.

२. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशतत्व पृथ्वीवर असतं असं म्हणतात मग यादरम्यान आराधना कशी करावी ?

श्रीगणेश चतुर्थीचं व्रत हे काही जणांकडे दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, गौरी विसर्जनापर्यंत, अनंत चतुर्दशी पर्यंत अशा वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. या गणेशोत्सवाच्या काळात यथाशक्ती गणेशाची उपासना करून उत्सव साजरा करावा. ज्यांना गणपतीची जी स्तोत्रं / श्लोक येत असतील ते म्हणावेत. गणेशोत्सव हा घरातील प्रत्येकाने सहभागी होण्याचा उत्सव आहे त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री-पुरुष सर्वचजण आपापल्यापरीने सहभाग देऊ शकतात. या कालावधीमध्ये घरातील वातावरण चांगले राहील प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी. जेवढे दिवस आपल्या घरी गणेशोत्सव असेल तेवढे दिवस सकाळी व संध्याकाळी पूजा करावी दोन्ही वेळेस पूजा करणे शक्य नसल्यास सकाळी पूजा व संध्याकाळी किमान आरती करावी. गोडाधोडाचा स्वयपाक करावा, सात्विक अन्न खावे व आनंदात गणेशोत्सव साजरा करावा.

३. गणपतीच्या पार्थिव मूर्तीचे पूजन करण्याचा शास्त्रोक्त प्रघात कधीपासून पडला?

गणपतीचे अनेक अवतार मानले जातात त्यापैकी भाद्रपदातील गणेश चतुर्थीस पार्थिव गणेश पूजन सांगितले आहे. हा पूर्वापार सुरु असलेला प्रघात आहे.

४. गणपतीला लाल रंग का प्रिय आहे?

गणेशाचा वर्ण शेंदरी / लाल आहे असा अनेक ग्रंथात उल्लेख आढळतो. त्यामुळे गणेशाला लाल फुले, लाल वस्त्र अर्पण केले जाते.

५. गणपतीचे विसर्जन करताना उत्तरपूजा का आवश्यक असते?

ज्याप्रमाणे प्राणप्रतिष्ठापनेचा विधी असतो तसाच विसर्जनासाठी उत्तरपूजेचा विधी करावा लागतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2018 2:27 pm

Web Title: mohan date doubts and answers regarding ganesh pujan
Next Stories
1 …जाणून घ्या गौरी आवाहनाची वेळ आणि परंपरा
2 पुण्यात पाणीपुरीच्या पुरीतून साकारला १० फूटी बाप्पा
3 बाप्पावरचे अनोखे प्रेम; १५० गणपतींनी सजवले घर
Just Now!
X