वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांचे तब्बल ४७ हजार पुडे आणि आंब्याच्या स्वादाच्या साडेसहा हजार गोळ्या वापरून केलेली आकर्षक सजावट, लहान मुलांबरोबरच मोठय़ांचेही लक्ष वेधून घेत आहे. ग्राहक पेठेतर्फे ही सजावट करण्यात आली आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीचे निमित्त साधून गणपतीच्या सजावटीत कन्याकुमारी येथील शिलास्मारकाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यासाठी बिस्किटांचे पुडे आणि गोळ्यांचा वापर करण्यात आला आहे. ग्लूकोज, मारी, चॉकलेट, कोकोनट, तसेच खाऱ्या बिस्किटांचे ४७६३२ पुडे सजावटीत वापरण्यात आले आहेत. या प्रतिकृतीबरोबरच महिला सबलीकरणाविषयी फलक लावून जनजागृती करण्यात आली आहे.
ग्राहक पेठेच्या सेवक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण गुंजाळ असून सजावटीची जबाबदारी प्रफुल्ल जाधवर यांनी वाहिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2013 रोजी प्रकाशित
गणपतीच्या सजावटीसाठी ४७ हजार बिस्किट पुडे
वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांचे तब्बल ४७ हजार पुडे आणि आंब्याच्या स्वादाच्या साडेसहा हजार गोळ्या वापरून ग्राहक पेठेतर्फे ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

First published on: 14-09-2013 at 02:45 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 47000 biscuits packets for ganapati decoration by grahak peth