Ganesh Chaturthi 2025 Stotra and Mantra: संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. येत्या २७ ऑगस्ट २०२५ रोजी बाप्पाचे घरोघरी आगमन होईल. वर्षभर लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात. बाप्पाच्या आगमनासाठी चविष्ट पदार्थ, सुंदर सजावट, ढोल-ताशाचा गजर या सगळ्याची जय्यत तयारी केली जाते. दररोज बाप्पाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो, सुंदर आरत्या म्हटल्या जातात. दूर्वा, फुले अर्पण केली जातात. पण, या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याचदा अनेकांकडून बाप्पाला आवडणारी ही एक गोष्ट करायची राहून जाते. खरे तर, बाप्पाच्या आगमनामुळे घरात खूप मोठ्या प्रमाणात लगबग सुरू असते. त्यामुळे अनेकदा बाप्पासमोर काही वेळ शांत बसून, त्याच्या आवडच्या स्तोत्रांचे पठण आणि मंत्रांचा जप करता येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बाप्पाची दोन प्रभावशाली अशी सोपी स्तोत्रे आणि त्याचे दोन मंत्र सांगणार आहोत, ज्यांच्या पठणाने बाप्पाची तुमच्यावर सदैव कृपा राहील.

बाप्पाची प्रभावी स्तोत्रे

खालील दोन स्तोत्रे बाप्पाला खूप प्रिय असून, त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका स्तोत्राचे नियमित पठण करू शकता.

१. श्रीगणपत्यथर्वशीर्ष

श्रीगणपत्यथर्वशीर्ष बाप्पाला खूप प्रिय आहे. श्रीगणपत्यथर्वशीर्षाच्या पठणाने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच व्यक्तीला चांगले आयुष्य व आरोग्य मिळण्यासह बुद्धी व समृद्धी प्राप्त होते, असे म्हटले जाते.

२. संकटनाशन गणेश स्तोत्र

असे म्हटले जाते की, या स्तोत्राच्या पठणाने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. व्यक्तीला आयुष्यात अनेक सुख-सुविधा प्राप्त होतात.

बाप्पाचे दोन प्रवाभी मंत्र

बाप्पाचे हे दोन्ही मंत्र अत्यंत प्रभावी आहेत. शक्य असल्यास दररोज १०८ वेळा यापैकी एका मंत्राचा जप नक्की करा.

गणेश गायत्री मंत्र

ॐ एकदन्ताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्॥

गणेश बीज मंत्र

ओम गं गणपतये नमः॥