आखाती मराठी संकेतस्थळ (www.aakhatimarathi.com ) आणि महाराष्ट्र मंडळ दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा आखाती देशांसाठी ‘घरगुती गणेश सजावट स्पर्धा’ भरवण्यात आली आहे. गेले कित्येक वर्ष आखाती देशांमध्ये वाढत असलेले गणेश उत्सवाचे व्यापक स्वरूप लक्षात घेत यंदा सर्वप्रथम ही स्पर्धा फक्त आखाती देशांकरीता घेण्याचे निश्चित करण्यात आले. स्पर्धेचा मूळ उद्देश आखातीकरांची कला जगासमोर यावी, त्याचबरोबर आखातात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाची माहिती संपूर्ण जगाला कळावी, हाच आहे.
गणेश चतुर्थीच्या दोन दिवसआधी दुबईमधल्या मीना बाजार या अत्यंत गजबजलेल्या भागात असलेल्या शंकर मंदिर परिसराला भेट दिली असता उत्सवाचे यंदाचे व्यापक स्वरूप लक्षात आले. तसेही हा परिसर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात उत्सवमय होऊन जातो. परंतु यंदा विशेष असा फरक जाणवत होता. एकतर गणपतींच्या मूर्तींमध्ये झालेली लक्षणीय वाढ, गणेश मूर्तींची वाढलेली उंची, त्यातील विविधता या गोष्टी अगदी प्रकर्षाने जाणवत होत्या. सर्वत्र पसरलेले मंगलमय वातावरण आणि देवस्थानांच्या परिसरात असलेली लगबग, गर्दी ह्या गोष्टी आपसूक गणेशाच्या आगमनाचे सूतोवाच करीत होत्या. क्षणभर तर आपण मुंबई किंवा पुण्यात फिरत असल्याचा भास निर्माण होत होता. मखराच्या साहित्यातील विविधता, आधुनिक स्वरूपातील लायटिंगच्या माळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. प्राथमिक स्वरुपात मिळालेल्या माहितीनुसार यंदा जवळपास दोन हजारांच्या आसपास गणेशमूर्ती दुबईत आणल्या गेल्या असे समजले.
एकंदरीत हे सर्व पाहता यंदा ‘आखाती’ गणपती खूपच भव्य प्रमाणात साजरा होणार यात शंकाच नाही आणि स्पर्धेच्या निमित्ताने त्याचे दर्शन सर्व जगाला होणार आहे. गणेश सजावट स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या.
http://ganeshsajavat.aakhatimarathi.com/
– तुषार कर्णिक
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2013 रोजी प्रकाशित
आखाती देशांमध्ये घरगुती गणेश सजावट स्पर्धा
स्पर्धेचा मूळ उद्देश आखातीकरांची कला जगासमोर यावी, त्याचबरोबर आखातात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाची माहिती संपूर्ण जगाला कळावी, हाच आहे.

First published on: 11-09-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh decoration competition in uae