Hartalika 2022 Puja Muhurt & Color For Zodiac Signs: भाद्रपद शुल्क तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. देवी पार्वतीने भगवान शंकराला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. याच मान्यतेनुसार सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. यामध्ये निर्जळी राहून उपवास केला जातो. गणपतीच्या आदल्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन झाल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे.

हरतालिका व्रताची कथा

दक्षकन्या श्यामवर्णा काली हिला शंकराने सर्वादेखत ‘काळी असलीस तरी मला तू खूप आवडतेस’ असे म्हटले. त्यामुळे कालीने चिडून हिरवळीवर स्वत:ची हरित सावली फेकली आणि अग्निप्रवेश करून ती हिमालयाची कन्या गौरी म्हणून जन्माला आली. तर सावलीतून ‘कात्यायनी’ देवी निर्माण झाली. पुढे युद्धात ‘कात्यायनी’ देवीने देवांना मदत केली, ती नंतर ‘हरिकाली’ नावानं ओळखली जाऊ लागली. त्यामुळे भाद्रपद शुक्ल तृतीयेला काही ठिकाणी हरिकालीचेही व्रत केलं जातं.

Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?

(Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी निमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र)

आपणही यंदा हरतालिकेचे व्रत करणार असाल तर आता आपण या दिवशी कोणते कपडे परिधान करावे याविषयी काही नियम पाहणार आहोत. आपल्या जन्मतारखेवरून किंवा राशीवरून साजेसे रंग निवडल्यास एकूणच व्रताच्या दिवशी मन प्रसन्न राहते. जर तुम्हाला तुमची रास माहीत नसेल तर आपण आपल्या जन्मतारखेवरून सुद्धा रंगाची निवड करू शकता. कोणत्या राशीला व जन्मतिथीला कोणते रंग साजेसे वाटतील जाणून घ्या..

  • १, १०, १९ व २८- लाल, गुलाबी, केशरी
  • २, ११, २० व २९- सफेद आणि क्रीम
  • ३, १२, २१ व ३०- पिवळा व सोनेरी
  • ४, १३, २२ व ३१- थोडे चमचमणारे रंग, सोनेरी, चंदेरी
  • ५, १४ व २३ – हिरवा
  • ६, १५ व २४- आकाशी नीला
  • ७, १६ व २५ – राखाडी
  • ८, १७ व २६- राखाडी व निळा
  • ९, १८ व २७- लाल, गुलाबी व केशरी

राशीप्रमाणे कसे निवडाल रंग

  • मेष- लाल, गुलाबी,
  • वृषभ – क्रीम,
  • मिथुन- हिरवा
  • कर्क- फिकट पिवळा किंवा क्रीम
  • सिंह- लाल, गुलाबी, सोनेरी
  • कन्या- फिकट हिरवा
  • तूळ- क्रीम व आकाशी निळा
  • वृश्चिक- लाल, गुलाबी, सोनेरी
  • धनु- सोनेरी व पिवळा
  • मकर- राखाडी
  • कुंभ- फिकट निळा, राखाडी
  • मीन- पिवळ्या रंगाच्या विविध छटा

यंदा, ३० ऑगस्टला हरतालिका व्रत केले जाईल. २९ ऑगस्टला दुपारी ३ वाजून २१ मिनिटांनी हरतालिका तिथी सुरु होईल तर ३० ऑगस्ट दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे. उदया तिथीनुसार हस्त नक्षत्र ३० तारखेला रात्री ११: ५० पर्यंत असणार आहे म्हणूनच ३० ऑगस्टला हरतालिका व्रत पार पडेल. यानंतर ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी दिनी बाप्पांचे घरोघरी आगमन होईल.

(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)