Ganesh Chaturthi Special Modak Recipe: गणशोत्सव उद्यावर येऊन ठेपला. गणपतीचा नैवेद्य म्हटलं की डोळ्यांसमोर येतात मोदक, घरोघरी मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. मोदक सगळ्यांनाच बनवायला जमतं असं नाही. अनेकांचे हे मोदक बिघडतात तर काहींना कमी वेळात नैवेद्य तयार करायचा असतो. यावेळी उकडीचे नाहीतर ५ वेगवेगळ्या प्रकारचे मोदक ट्राय करा, जास्तवेळ न घालवता नैवद्याचा पदार्थ तयार होईल.गणेश चतुर्थी यंदा २५ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. बाप्पाच्या आगमनाची सर्वानाच आतुरता आहे .गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत. म्हणूनच गणेशोत्सवाच्या दिवसांत घराघरात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. तुम्ही सुद्धा या वेळेस नेहमीसारखे उकडीच्या मोदका बरोबर थोडे हटके आणि वेगळे मोदक करून बाप्पांना नैवेद्य दाखवू शकता. येथे जाणून घ्या ५ मोदकांच्या रेसिपीज .
मावा मोदक
गणेश चतुर्थीला तुम्ही मलाईदार मावा मोदक बनवु शकता. मावा मोदक म्हणजे खव्यापासून बनवलेले मोदक असतो. हा मोदक बनवण्यासाठी मिल्कमेड, दूध, तांदळाच पिठ, तुप, आणि वेलचीपुड या सामग्रीने साधे पण खूपच चविष्ट असे हे मोदक गणपतीसाठी उत्तम बनवू शकता.
चॉकलेट मोदक
घरातील लहान मुलांसाठी चॉकलेट मोदक परफेक्ट आहेत. चॉकलेट मोदक बनवण्यासाठी दूध पावडर, कोको पावडर, साखर, तूप एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा. मोदकाच्या साच्यात भरून थंड करा. आवडीने वरून ड्रायफ्रुट्स घाला. स्वादिष्ट चॉकलेट मोदक तयार !
नारळ मोदक
नारळाची बर्फी तर तुम्ही अनेकदा खाली असेल, पण नारळापासुन तुम्ही उत्तम मोदक देखील बनवु शकतात. ताजं खोवलेलं नारळ, साखर किंवा गूळ आणि वेलची एकत्र करून सारण तयार करा. हवे असल्यास त्यात काजू-बदामाचे तुकडे किंवा किसलेला सुका मेवा घाला. तांदळाच्या पिठाच्या उकडीत हे सारण भरून मोदक बनवा. वाफवून घ्या आणि वरून साजूक तुपाची धार घाला. असे गरमागरम नारळ मोदक प्रसादासाठी अतिशय स्वादिष्ट लागतात.
चॉकलेट टूटी फ्रूटी मोदक
दूध पावडर, कोको पावडर, साखर आणि तूप एकत्र करून मिश्रण तयार करा त्यात बारीक तुकडे केलेली तुती-फ्रूटी घाला. मोदकाच्या साच्यात हे मिश्रण भरून थंड होऊ द्या. वरून ड्रायफ्रुट्स किंवा चॉकलेटस घालून सजवा. स्वादिष्ट चॉकलेट तुती-फ्रूटी मोदक तयार!
गुलाब मोदक
गुलाब मोदक हा उकडीचा खास प्रकार आहे. यात गुलाबाचा अर्क, गुलकंद किंवा पाकळ्यांचा वापर करून फुलासारखा रंग व सुगंध दिला जातो. हे मोदक पारंपरिक चवीसोबतच गुलाबाची गोडी देतात. गणेशोत्सवासाठी हे आकर्षक व वेगळे प्रसाद म्हणून खास आवडतात.हे मोदक सुगंधी, हलके आणि सणासुदीला खास वाटतात.