News Flash

दमा नियमित उपचारांची गरज

श्वसनमार्गात अडथळे आल्याने किंवा तो बंद झाल्याने निर्माण होणारी अस्वस्थता म्हणजे दमा, असे साधारण म्हटले जाते.

| October 28, 2014 06:30 am

श्वसनमार्गात अडथळे आल्याने किंवा तो बंद झाल्याने निर्माण होणारी अस्वस्थता म्हणजे दमा, असे साधारण म्हटले जाते. ऋतू बदलताना दमा असलेल्या व्यक्तींना अधिक त्रास जाणवतो. मात्र वर्षभरच कमीअधिक प्रमाणात दम्याचा विकार जाणवत राहतो. दमा या आजाराबद्दल अनेक समज-गरसमज आहेत.

गरसमज – दमा संसर्गजन्य आहे.
वस्तुस्थिती – दमा संसर्गजन्य नाही. दमा हा आनुवांशिक आजार आहे. दम्याची कारणं व झटके वेगवेगळ्या व्यक्तीनुसार बदलतात व त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने दम्याच्या उपचारांचे नियोजन करणे आवश्यक असते.

गरसमज – दमा असल्यास व्यायाम
करू नये.
वस्तुस्थिती – दम्याचे झटके येण्याची खूप भीती बाळगल्याने दमा असलेल्या लोकांना अनेकदा खेळण्यापासून किंवा व्यायाम करण्यापासून थांबवले जाते. खाण्यापिण्यावर र्निबध घातले जातात. तेल असलेले किंवा थंड पदार्थ दिले जात नाहीत. खूप तेलकट, मसालेदार पदार्थ सर्वानीच मर्यादित प्रमाणात खायला हवेत. पण दमा असलेल्या लोकांना यासाठी विशेष बंधने पाळण्याची गरज नाही. व्यायामाने तर शरीराला फायदाच होतो. पोहण्यासारखा व्यायाम तर दमा रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो. मात्र पोहताना थंड कोरडी हवा मात्र टाळायला हवी आणि सोबत इनहेलरसारखी प्राथमिक औषधे ठेवा.

गरसमज – दमा हा कधी कधी होतो.
वस्तुस्थिती – अनेक पालकांना वाटते की दमा हा सर्दी खोकल्यासारखा कधीतरी येणारा आजार आहे आणि केमिस्टकडून साधी औषधे, सिरप, व्हेपोरब्स घेऊन बरे वाटते. मात्र या गरसमजामुळे दम्याचा आजार बळावण्याची शक्यता वाढते. कधी कधी त्यातून तीव्र स्वरूपाचा झटका येऊ शकतो. ओव्हर द काउंटर औषधांमुळे छाती भरून येणे, धाप लागणे, खोकला व जोराने श्वास घेणे ही दम्याची लक्षणे कमी होतात. मात्र दमा हा दीर्घ काळ चालणारा आजार असून त्याला योग्य व नियमित देखभालीची गरज आहे.

गरसमज – इनहेलर्सचे व्यसन लागते.
वस्तुस्थिती – इनहेलेशनद्वारे दम्यावर उपचार करण्याबद्दलही गरसमज आहेत. इनहेलर्स लिहून दिल्यावरही गोळ्या व सिरप घेण्यास लोक प्राधान्य देतात. मात्र इनहेलरमधून स्टेरॉइड्सचे व्यसन लागण्याची शक्यता नाही. कारण ही स्टेरॉइड्स आपल्या शरीरात निसर्गत:च असतात. याशिवाय गोळ्या आणि सिरप यांच्या तुलनेत इनहेलरद्वारे शरीरात जाणाऱ्या स्टेरॉइड्सचे प्रमाण कमी असते.
डॉ. सुजाता चिटणीस,
बालदमा व बालरोगतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2014 6:30 am

Web Title: the need of regular treatment for asthma
टॅग : Asthma
Next Stories
1 केमोथेरॅपी, रेडिएशन आणि आयुर्वेदीय चिकित्सा
2 काळाशी सुसंगत वागा..
3 बालकांमधील कॅन्सर
Just Now!
X