तुम्ही दिवसभरात किती धावतात, किती चालतात, किती बाईक चालवतात कितीवेळ बसतात या सर्वावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला हे अ‍ॅप मदत करू शकते. इतकेच नव्हे तर तुमच्या चालण्याने तुमच्या किती कॅलेरी खर्च झाल्या याची आकडेवारीही यामध्ये येते. याशिवाय हे अ‍ॅप जीपीएसशी जोडले गेल्यामुळे तुम्ही कशाप्रकारे आणि कुठे चालत आहात याचा तपशीलही तुम्हाला तुमच्या मोबाइलवर दिसू शकतो. हे अ‍ॅप आपले चालणे, बायकिंग, पायऱ्या चढणे उतरणे आदी गोष्टींवर लक्ष ठेऊन असते. इतकेच नव्हे तर आपण यामध्ये एकदा सेटिंग केले की आपण किती वेळ व्यायाम करायचा हेही ते आपल्याला सुचविते. आपल्या हृदयाचे ठोके मोजण्याचे कामही हे अ‍ॅप करत असते. यामध्ये तुम्ही तुमचे ध्येयही निश्चित करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला इतक्या दिवसांमध्ये इतके वजन वाढवायचे आणि किंवा कमी करावयाचे आहे. त्यानुसार हे अ‍ॅप आपल्याला मार्गदर्शन करते आणि वेळोवेळी अलर्ट करत राहते. आपल्या हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे.