02 April 2020

News Flash

अंध, अपंगांसाठी

या बघण्याच्या क्षमतेमुळे आपले जगणे किती सोपे होते याचा जरा जाणीवपूर्वक विचार करून पाहा.

आज आपण जरा वेगळ्या प्रकारच्या हेल्पलाइन्सची माहिती करून घेऊ या. दुर्दैवाने समाजातल्या काहींना काही व्यंग घेऊनच जगावे लागते. क्षणोक्षणी त्यांना प्रतिकूल परिस्थितीशी लढावे लागते. त्यांच्या घरातल्यांनासुद्धा वेगळ्याच पातळीवर झगडावे लागते. त्यांना समजून घेणारे आजूबाजूला असतात किंवा नसतातही. अंध, मूक-बधिर, विकलांग, अपंग, गतिमंद, मतिमंद, विविध मनोविकांरानी ग्रस्त व्यक्ती अशा अनेक प्रकारची व्यंगे असणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. सामान्य माणसांपेक्षा त्यांच्या समस्या वेगळ्या असतात. त्यांच्या गरजा वेगळ्या असतात. त्यांना, त्यांच्या घरच्यांना मदतीच्या हातांची गरज असते. ही त्यांची गरज भागवतात त्यांच्यासाठीच्या हेल्पलाइन्स. त्या हेल्पलाइन्सची माहिती आपण आता करून घेऊ या.

आपण सर्वसाधारण माणसे डोळ्यांनी बघू शकतो. या बघण्याच्या क्षमतेमुळे आपले जगणे किती सोपे होते याचा जरा जाणीवपूर्वक विचार करून पाहा. असा विचार केला, की अंधांच्या समस्यांची जाणीव तुम्हाला होईल. या समस्यांच्या जाणिवेतूनच या हेल्पलाइन्स कार्यरत असतात. अंधांसाठी कार्य करणारी नावाजलेली संस्था म्हणजे ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड्स’. मुंबईतील ही संस्था अंधांच्या र्सवकष विकास आणि पुनर्वसनासाठी झटत आहे. अंधांना सन्मानाने, स्वतंत्रपणे, स्वाभिमानाने जगता यावे, त्यांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेश व्हावा हा या संस्थेचा हेतू आहे. त्यासाठी अंधांना शिक्षण, प्रशिक्षण देऊन त्यांच्या नोकरी, व्यवसायाची व्यवस्था करण्यात ही संस्था पुढाकार घेते. त्यांच्या हेल्पलाइनचे क्रमांक आहेत – ०२२ ६५५१४६७०, ०२२ २४९४५१०८.

‘स्नेहांकित हेल्पलाइन’ ही मुंबईतील अशीच एक संस्था आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अंध विद्यार्थ्यांना या हेल्पलाइनतर्फे मदत केली जाते. अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या सीडीजची निर्मिती या संस्थेत केली जाते.

अंध विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यांना कायदेविषयक सल्लाही दिला जातो. शिवाय त्यांच्यासाठी इंग्लिश संभाषणाचे वर्गसुद्धा चालवले जातात. त्यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २६५९०७४३, किंवा पिरामल भट  ९८२१७७०२२५, ९९८७११४६८०.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2016 1:06 am

Web Title: helpline 3
Next Stories
1 महापालिका तक्रार निवारण कक्ष
2 अपघातसमयी मदतीसाठी..
3 अपघातसमयी मदतीसाठी
Just Now!
X