06 July 2020

News Flash

हेल्पलाइन्स पुरुषांसाठी..

काही काही पुरुषांनाही घरगुती हिंसाचाराला वा अन्य गैरवर्तणुकीला तोंड द्यावं लागतं

पुरुषांसाठी असलेल्या हेल्पलाइन्सची माहिती आज घेऊ या. काही काही पुरुषांनाही घरगुती हिंसाचाराला वा अन्य गैरवर्तणुकीला तोंड द्यावं लागतं. शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक, व्यावसायिक, मालमत्ताविषयक कारणांकरता हा छळ असू शकतो. हा छळ कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो. छळ सोसणाऱ्या स्त्रियांप्रमाणेच त्यांचीही अवस्था बिकट असते. अशा पुरुषांना मदत करण्यासाठी काही संस्था, संघटना कार्यरत आहेत. त्यांची ही ओळख.

* ‘सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन’ या अंतर्गत देशभरातील २५ राज्यांमधील ५० संस्था काम करतात. प्रत्येक राज्यात पाच समुपदेशक असतात. पुरुषांनी या संस्थेशी संपर्क साधल्यास आवश्यक ती मदत तातडीने केली जाते. कायद्याशी संबंधित सल्लाही दिला जातो. त्यांच्याकडून सांगितलेली माहिती गोपनीय राखली जाते. गरज भासल्यास इतर संस्थांची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. या संघटनेचा दूरध्वनी क्रमांक आहे – ८८८२४९८४९८. वेबसाइट आहे – www.saveindianfamily.in

‘मेन्स राइट असोसिएशन’ ही पुण्यातील संस्थाही अन्यायग्रस्त पुरुषांसाठी कार्यरत आहे. पुणे आणि परिसरातील पुरुषांसाठी ही संस्था असली, तरी इतर ठिकाणच्या पुरुषांनाही त्यांच्याशी संपर्क साधता येतो. बाहेरगावच्या पुरुषांना त्यांच्या जवळच्या संस्थांची माहिती या संस्थेतर्फे दिली जाते. संपर्कासाठी या संस्थेच्या कार्यकर्त्यांची नावे आणि मोबाइल क्रमांक – चेतन वर्मा – ९९२३३३०१९५, दीपक जोशी – ९८८१४६४८४५, महेश शिंदे – ९८८११२२२५१.

याच संघटनेशी संलग्न असणाऱ्या ‘वास्तव फाऊंडेशन’, मुंबई चा मोबाइल क्रमांक आहे, ८४२४०२६४९८.
पुढच्या हेल्पलाईन्स असतील किशोरवयीन मुला-मुलींसाठी. बदलता समाज, विभक्त कुटुंबपद्धती, आई-वडिलांच्या व्यग्र दिनक्रमामुळे त्यांचा कमी मिळणारा सहवास, अभ्यासाचा वाढता ताण, इतरही अनेक समस्या, यामुळे किशोरवयीन मुला-मुलींनासुद्धा अनेकदा मानसिक आधाराची गरज भासते. घरात ती मदत मिळणार नसेल, तर ते अधिकच एकलकोंडे होतात, पण अशांना मदतीचा हात मिळतो, हेल्पलाइन्सच्या माध्यमातून.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 1:33 am

Web Title: helplines for mens
टॅग Chaturang,Helplines
Next Stories
1 ज्येष्ठांसाठी मदतीचा हात
2 ज्येष्ठ नागरिकांसाठी
3 स्टॉप व्हॉयलंस अगेंस्ट वुमेन
Just Now!
X