आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये सातत्याने अडखळणारे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन्ही संघ शुक्रवारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
दिल्लीने घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सला पराभूत केले असले तरी त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दिल्लीकडे युवराज सिंगसारखा महागडा खेळाडू असला तरी त्याला अजूनपर्यंत आपली छाप पाडता आलेली नाही. झहीर खानचा अजूनही संघात समावेश नसल्याने दिल्लीची गोलंदाजी विस्कळीत दिसत आहे. पण चांगल्या फॉर्मात असलेल्या कर्णधार जे पी डय़ुमिनी आणि मुंबईकर श्रेयस अय्यर यांनी दिल्लीची फलंदाजीची धुरा सांभाळली आहे.
पंजाबच्या संघाकडे पाहिल्यास त्यांच्याकडे वीरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर यांच्यासारखे एकापेक्षा एक दमदार फलंदाज आहेत, पण यांपैकी एकालाही सूर गवसलेला दिसत नाही. दुखापतीमुळे शॉन मार्श व जॉर्ज बेली यांच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.   गोलंदाजीमध्ये मिचेल जॉन्सनलाही भेदक मारा सातत्याने करता आलेला नाही. अनुरीत सिंग आणि संदीप शर्मा त्याच्या सोबतीला आहे.

प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली डेअरडेव्हिल्स : जे पी डय़ुमिनी (कर्णधार), युवराज सिंग, क्विंटन डि कॉक, मयांक अगरवाल, नॅथन कोल्टिअर-नील, डॉमिनिक जोसेफ, चिदंबरम गौतम, इम्रान ताहीर, श्रेयस अय्यर, केदार जाधव,  अँजेलो मॅथ्यूज, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, अल्बी मॉर्केल, शाहबाद नदीम,  मनोज तिवारी, जयदेव उनाडकट.
किंग्ज इलेव्हन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार), अनुरीत सिंग, परविंदर अवाना, रिशी धवन,   मिचेल जॉन्सन, करनवीर सिंग, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर,  अक्षर पटेल, थिसारा परेरा, वृद्धिमान साहा, संदीप शर्मा, वीरेंद्र सेहवाग, शार्दूल ठाकूर, मुरली विजय, मनन व्होरा.