24 November 2020

News Flash

VIDEO: हिटमॅन Reloaded! पाहा रोहितची तुफान फटकेबाजी

तुम्ही पाहिलात का 'हा' व्हिडीओ?

IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले. ड्रीम ११ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. तेथील क्वारंटाइन कालावधी संपवून खेळाडूंची सराव सत्रही सुरू झाली. त्यातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याची तुफान फटकेबाजी दिसून आली.

मुंबई इंडियन्सचा हिटमॅन तब्बल पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरला. युएईमध्ये दाखल झाल्यानंतर रोहितने वर्कआऊटला सुरूवात केली होती. त्याने त्याचा आणि पत्नी रितिकाचा एक व्हिडीओदेखील पोस्ट केला होता. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ असणाऱ्या रोहितचं तेच रूप पुन्हा दिसून आले आहे. नेट्समध्ये त्याने केलेल्या तुफान फटकेबाजीचा व्हिडीओ चाहत्यांच्या खूप पसंतीस पडताना दिसतो आहे.

रोहित शर्माची IPL कारकिर्द

रोहितने आतापर्यंत १८८ IPL सामन्यात १३० च्या स्ट्राईक रेटने आणि ३१.६० च्या सरासरीने ४८९८ धावा केल्या आहेत. रोहितची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या १०९ आहे. त्याने आतापर्यंत ३६ अर्धशतके आणि १ शतक ठोकले आहे. याशिवाय त्याने ४३१ चौकार आणि १९४ षटकार खेचले आहेत. IPL च्या २०१३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना तर २०१५, २०१७ आणि २०१९ च्या हंगामात संघाचे नेतृत्व करताना त्याने विजेतेपदाची चव चाखली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 12:18 pm

Web Title: batting video of rohit sharma mumbai indians hitman reloaded big hittings in nets session vjb 91
Next Stories
1 IPL 2020: खुशखबर! CSKच्या गोटातून महत्त्वपूर्ण अपडेट
2 दुबईतले ‘ते’ सहा दिवस अंगावर काटा आणणारे- आर अश्विन
3 प्रतीक्षा संपली…! आज ‘IPL’च्या वेळापत्रकाची घोषणा
Just Now!
X