आयपीएल २०२० मध्ये (IPL 2020) एकवेळ अव्वल स्थानावर असलेला दिल्लीच्या संघाचा प्ले ऑफमधील रस्ता खडतर झाला आहे. दिल्लीच्या संघाला प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्कं करण्यासाठी उर्वरीत दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय आवशक आहे. दिल्लीचे दोन्ही सामने गुणतालिकेत अव्वल स्थानावर असणाऱ्या मुंबई आणि आरसीबी या संघाबरोबर आहेत. 31 ऑक्टोबर आणि दोन नोव्हेंबर रोजी दिल्लीचे उर्वरीत सामने अनुक्रमे अबु धाबी आणि दुबईमध्ये होणार आहेत.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या सुरुवातीला दिल्लीच्या संघानं गुणतालिकेवर वर्चस्व गाजवलं होतं. एकवेळ मजबूत वाटणारा दिल्लीचा संघ सध्या खराब परिस्थित आहे. दिल्लीच्या संघाला मागील तिन्ही सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. सलग तीन पराभवनंतर दिल्ली प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिल्लीच्या संघाला १२ सामन्यात सात विजय आणि पाच पराभवासह मिळाले आहेत. १४ गुणांसह दिल्ली सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता आणि हैदराबाद यांच्याकडून झालेल्या मोठ्या पराभवामुळे दिल्लीच्या नेट रनेटमध्येही घसरण झाली आहे.

प्ले ऑफमध्ये स्थान पक्कं करण्यासाठी दिल्लीला अखेरच्या दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय आवशक आहे. नऊ सामन्यात १४ गुण मिळवणारी दिल्ली क्वालीफायर सामना खेळेल असं वाटलं होतं. मात्र, सलग मिळालेल्या तीन पराभवामुळे दिल्लीच्या संघाला एलिमिनेटर सामना खेळून पुढे जावं लागेल असं वाटतेय.

कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना आक्रमक गोलंदाज कगीसो रबाडा म्हणाला होता की, ‘एका पराभवनंतर संघात फारशे बदल करण्याची गरज नाही.’ मात्र, लागोपाठ्या पराभवनंतर दिल्ली संघ आपली लय गमावल्याचं दिसतेय.  प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाही प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी संघामध्ये चुरस आहे. मुंबई, आरसीबी, दिल्ली, पंजाब , केकेआर, राजस्थान आणि हैदराबाद हे संघ या शर्यतीत आहेत. चेन्नई वगळता प्रत्येक संघाला प्ले ऑफमध्ये पोहचण्याी संधी आहे. दिल्लीला प्ले ऑपमध्ये स्थान पक्कं करण्यासाठी अद्याप एक विजय मिळवावा लागेल. त्यांचे अखेरचे दोन सामने मुंबई आणि आरसीबीविरोधात आहेत.