देवदत्त पडिक्कलने आयपीएलमध्ये आपलं दमदार पदार्पण केलं आहे. पडिक्कलने पहिल्याच सामन्या दमदार फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. पडिक्कलने ४२ चेंडूत ५६ धावंची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं ८ चौकार लगावले आहेत. पडिक्कल २००८ नंतर आरसीबीकडून पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणार फलंदाज झाला आहे. २००८ मध्ये आरसीबीकडून सलामीच्या सामन्यात श्रीवत्स गोस्वामीनं अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी पडिक्कलनं अशी कामगिरी केली आहे.

२०१६ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात यापूर्वी सॅम बिलिंगने अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर एकाही फलंजादाजाला सलामीच्या सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा काढता आल्या नाहीत. २०२० मध्ये पडिक्कलने हा पराक्रम करुन दाखवला. पडिक्कल आधी पदार्पणाच्या सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा काढणारा भारतीय फलंदाज केदार जाधव होता. जाधवने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करत अर्धशतकी खेळी केली होती.


आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारे खेळाडू –

२००८ –
ब्रॅडन मॅक्यूलम
माइक हसी
होप्स
संगाकारा
धवन
गंभीर
जी. स्मिथ
असनोडकर
शॉन मार्श
विद्यूद
गोस्वामी

२००९
वॉर्नर

२०१०
ओवीस शाह
रायडू
केदार जाधव
कॉलिंगवूड

२०१२
लिवी

२०१६
बिलिंग्ज

२०२०
देवदत्त पडिक्कल