रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता संघाचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. याआधी दिल्लीचा संघ पहिल्या स्थानावर होता. मुंबईच्या संघानं आठ सामन्यात सहा विजय मिळवले आहेत. १२ गुणांसह मुंबईचा संघ अव्वल स्थानावर आहे तर चार गुणांसह पंजाबचा संघ आठव्या स्थानावर आहे. धमाकेदार सुरुवात करणारा पंजाबचा संघाला आपल्या कामगिरीत सातत्या राखता आलं नाही. पंजाबला आठ सामन्यात सहा पराभव स्वीकारवे लागले आहेत.

आयपीएल १३ चा अर्धा हंगम संपला असून स्पर्धेना उत्तरार्धाकडे आगेकूच केली आहे. पहिल्या चार स्थानासाठी आठ संघात चूरस निर्माण होणार आहे. शेवटच्या स्थानावर असलेल्या पंजाबलाही अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. सध्या मुंबई, दिल्ली, आरसीबी आणि कोलकाता या चार संघानी आपलं निर्वादित वर्चस्व गाजवलं आहे.
पाहा पॉइंट टेबल….

फलंदाजीमध्ये पंजाबच्या के. एल राहुल ४४८ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्याखालोखाल मयांक अग्रवाल (३८२), ड्यूप्लेसिस (३०७), विराट कोहली (३०४)आणि श्रेयस अय्यर(२९८) यांचा क्रमांक लागतो. गोलंदाजीचा विचार केल्यास दिल्लीचा कगिसो रबाडा पहिल्या क्रमांकावर आहे. रबाडाने ८ सामन्यात १८ बळी घेतले आहेत. दिल्लीच्या विजयात रबाडाचा मोठा वाटा आहे. रबाडानंतर जोफ्रा आर्चर (१२), बुमराह (१२), बोल्ट (१२) आणि मोहम्मद शामी (१२) यांचा क्रमांक लागतो.