24 November 2020

News Flash

IPL 2020: …म्हणून विराट उतरला हिरव्या रंगाच्या जर्सीत!

पाहा नक्की काय आहे कारण...

विराट कोहलीचा बंगळुरू संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. RCBने १० पैकी ७ सामने जिंकून १४ गुण कमावत TOP 4मध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. चेन्नईविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचा प्ले-ऑफ्समधील प्रवेश निश्चित होणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघात एक महत्त्वाचा फरक दिसून आला. बंगळुरूच्या संघाने नियमित लाल रंगाच्या जर्सीऐवजी हिरवी जर्सी परिधान केली होती. यामागचे कारण पर्यावरण आणि झाडांबद्दल सर्वांमध्ये जागरूकता (Go Green Initiative) निर्माण करणं हे आहे.

प्रत्येक स्पर्धेत एका सामन्यासाठी बंगळुरूचा संघ हिरव्या रंगाची जर्सी परिधान करून सामना खेळतो. २०११पासून बंगळुरूचा संघ हा स्तुत्य उपक्रम करतो आहे. गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध तर २०१८ ला राजस्थानच्या संघाविरूद्ध बंगळुरूने हिरवी जर्सी परिधान करून सामना खेळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 3:55 pm

Web Title: virat kohli team rcb in green jersey to support go green initiative ipl 2020 csk vs rcb ms dhoni vjb 91 2
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL च्या दोन हिरोंना सलाम करत सचिनचं भावनिक ट्विट, म्हणाला…
2 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट :  कर्णधाराने पळ काढणे चुकीचे -धोनी
3 IPL 2020 : घसरलेली चेन्नई एक्स्प्रेस!
Just Now!
X