News Flash

खगोलशास्त्र, खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारत अव्वल

इंडोनेशियमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ९ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या चमूने तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई

| August 5, 2015 03:48 am

खगोलशास्त्र, खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारत अव्वल

इंडोनेशियमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ९ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या चमूने तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई करीत पहिले स्थान पटकावले आहे.
भारतातर्फे देबादित्य प्रामाणिक (कोलकाता), आनंद अय्यर (भोपाळ), अमेय पटवर्धन (मुंबई) यांनी सुवर्ण, तर ध्रुव सिंह (मुंबई) आणि अनुप गवाणकर (मुंबई) यांनी रौप्य पदकांची कमाई केली आहे. नेतृत्व ‘होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रा’चे डॉ. अनिकेत सुळे आणि एसआयईएस महाविद्यालयाचे स्वप्निल जावकर यांनी केले. ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’चे प्रा. मयांक वाहिया, ‘मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठा’चे प्रा. नजम हसन आणि ‘एनआयएसईआर’चे अशोक मोहापात्रा यांनी निरीक्षक म्हणून सहकार्य केले.
या ऑलिम्पियाडमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, चीन, कोरिया, ब्राझील, ग्रीस, पोलंड, रुमानिया, रशिया, थायलंड इत्यादी ४१ देशांच्या एकूण ४६ संघांच्या तब्बल २१० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. १० विद्यार्थ्यांना सुवर्ण, २५ जणांना रौप्य आणि ३६ जणांना कांस्य पदकाने गौरविण्यात आले. १० व्या खगोलशास्त्र व खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचे यजमान म्हणून भारताने या वेळी जबाबदारी स्वीकारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2015 3:48 am

Web Title: astronomy astrophysics olympiad india is top
टॅग : Astronomy,Game
Next Stories
1 ३१२ जागा रिक्त
2 अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांची अतिरिक्त शुल्कवसुली
3 अभियांत्रिकी प्रवेशाची विशेष फेरी आजपासून
Just Now!
X