29 September 2020

News Flash

अकरावी ऑनलाइन प्रवेश : पहिल्या दिवशी अडीच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

दहावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली असून मुंबई महानगर क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी निकालापूर्वीच अर्ज भरून ठेवले होते.

| June 19, 2014 03:14 am

दहावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली असून मुंबई महानगर क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी निकालापूर्वीच अर्ज भरून ठेवले होते. निकाल लागल्यावर त्यांनी महाविद्यालयांच्या पर्यायांचे अर्ज सादर केले.
पहिल्या दिवशी मुंबई महानगर क्षेत्रातील एकूण २५,११० विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. यातील ११ विभागांमधील १४,०८९ विद्यार्थ्यांनी पर्याय अर्ज अर्धवट ठेवले आहेत. तर ८,५६६ विद्यार्थ्यांनी हे अर्ज पूर्ण केले आणि २,४५५ विद्यार्थ्यांनी अर्ज नक्की केले.
अर्ज भरण्याचा पहिला टप्पा बुधवापर्यंत ९५,२५४ विद्यार्थ्यांनी सुरू केला आहे. यातील ७५,७८७ विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत.

जेईई अ‍ॅडव्हान्सचा आज निकाल
मुंबई : आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल http://jeeadv.iitd.ac.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. जेईई मेन या परीक्षेतील पहिल्या दीड लाख विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स दिली होती. देशभरात आयआयटीमध्ये ९,७८४ जागा उपलब्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 3:14 am

Web Title: fyjc online admision 2500 students submit application on first day
टॅग Fyjc
Next Stories
1 निकालात घाई- गोंधळ!
2 गणिताचे ‘प्रमेय’ सुटले
3 ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
Just Now!
X