शिवजयंतीची सुट्टी विद्यार्थ्यांनी घरी मौजमजेत न घालविता शाळेतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण काढत साजरी करायला हवी, या आपल्या आदेशाची राज्य सरकारला तब्बल १० वर्षांनी आठवण झाली आहे. कारण, विद्यार्थी-शिक्षकांनी ही सुट्टी घरी बसून न काढता शाळेत प्रभात फेरी, वक्तृत्त्व, निबंध स्पर्धा, छत्रपतींच्या शौर्याबाबत तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करून साजरी करावी, असा फतवाच माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षण संचालनालयाने शिवजयंतीची सुट्टी तोंडावर आलेली असताना काढला आहे. त्यामुळे, शाळा ‘बुट्टी’ची सुट्टी जाहीर करून मोकळ्या झालेल्या शाळा आता आयत्यावेळी या कार्यक्रमांचे आयोजन कसे करावे, या प्रश्नाने चक्रावून गेल्या आहेत. त्यामुळे, उद्याची (बुधवारी) शिवजयंती शाळांमधून साजरी करणे हा केवळ उपचार ठरण्याची चिन्हे आहेत.
शिवजयंतीच्या तारखेसंदर्भात असलेल्या वादावरून महाराष्ट्रात वर्षांतून दोन वेळा शिवजयंती साजरी केली जाते. त्यापैकी एक सरकारी आदेशानुसार तारखेनुसार होते. ही शिवजयंती १९ फेब्रुवारीला आहे. या शिवजयंतीची सुट्टी आगाऊच जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत ही शिवजयंती कशी साजरी करावी, या संदर्भात शाळांना कोणतेच आदेश नव्हते. त्यामुळे, उत्स्फूर्तपणे शिवजयंतीचे कार्यक्रम आयोजिणाऱ्या शाळा वगळता इतर शाळांचा परिसर या दिवशी सुनासुनाच असतो.
मात्र, संचालनालयाने १४ तारखेला या संदर्भात शाळांना पत्र लिहिले आहे. हे पत्र हातात पडेपर्यंत मंगळवार उजाडला. त्यामुळे, एका दिवसात सर्व नियोजन करून कार्यक्रम कसे करायचे, असा प्रश्न शाळांना पडला आहे.
‘शिवजयंतीनिमित्त शाळांनी असे कार्यक्रम करायला काहीच हरकत नाही. परंतु, सुट्टीच्या आदल्या दिवशीच या संदर्भात सूचना करून काय उपयोग? कारण, इतक्या कमी वेळेत कार्यक्रम आयोजित करणे शाळांना शक्य नाही,’ अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक उदय नरे यांनी व्यक्त केली.

अन् संचालनायाला जाग आली..
मुळात २००३सालीच शिवजयंती शाळांनी कशा पद्धतीने साजरी करावी, या संदर्भातील सूचना देणारे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले होते. मात्र, त्याचा सर्वानाच विसर पडला. हे परिपत्रक शाळांना न पाठविल्याने शाळा या विषयी अनभिज्ञच होत्या. मात्र, शिवराज्य पक्षाने ५ फेब्रुवारी, २०१४ला पत्र लिहून शालेय शिक्षण विभागाला या परिपत्रकाची आठवण करून दिली. तेव्हा संचालनालयाने शाळांना पत्र लिहून शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
kolhapur marathi news, mahavikas aghadi marathi news
“परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातून करूया”, शाहू छत्रपती यांची साद