ऑटीस्टिक मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांचे अध्ययन सुकर करणारा ‘प्लेपॅड अॅप’ ऑस्ट्रेलियाच्या डेकीन विद्यापीठाने विकसित केला आहे. ‘ऑटीझम वेस्ट सपोर्ट’च्या मदतीने हा अॅप तयार करण्यात आला आहे. त्याच्या मदतीने लहानपणापासूनच आपल्या पाल्याच्या विकासासाठी प्रयत्न करता येऊ शकतील, असे डेकीन विद्यापीठाच्या कम्प्युटर सायन्सच्या प्राध्यापिका श्वेता वेंकटेश यांनी सांगितले. या अॅपची माहिती देण्यासाठी प्रा. वेंकटेश नुकत्याच मुंबईत आल्या होत्या.
घरच्या घरी अभ्यासक्रमातील कठीण संकल्पना समजून घेण्याच्या दृष्टीने या प्लेपॅड अॅपची रचना करण्यात आली आहे. ऑटीस्टीक विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय यात निवडता येतील. अभ्यासक्रमातील संकल्पनांवर आधारलेले ठराविक काठीण्यपातळीचे ‘टास्क’ यात देण्यात आले आहेत. ‘टास्क’ची ठराविक काठीण्यपातळी विद्यार्थ्यांनी पार केल्यानंतर जास्त काठीण्यपातळीच्या ‘टास्क’कडे वळता येते. तसेच, त्याच्या विकासाची पातळीही पालकांना किंवा त्यांच्या शिक्षकांना वेळोवेळी तपासता येते. टॉबीमधील कार्यक्रम संवाद, भाषा, आकलनशक्ती यावर भर देणारे आहेत.
भारतात सध्या १० लाख ३६ हजाराच्या आसपास व्यक्तींना ऑटीझम आहे. अनेक कुटुंबांमध्ये तर याची माहितीही नसते. लहान वयातच ऑटीस्टिक मुलांच्या गरजा लक्षात घेऊन विशेष अध्ययन तंत्र इतर पाश्चिमात्य देशांमध्ये विकसित झाले आहे.
पण, भारतात या अध्ययन तंत्राचा विकास अजूनही म्हणावा तसा झालेला नाही. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी अध्ययन सुकर करणारे शालेय अभ्यासक्रमावर अॅप आणि प्रोग्रॅम भारतात आता बरेच आले आहेत. पण, ऑटीस्टीक मुलांसाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न अजुन कमीच आहेत.
आधारित अध्ययनाचे या गरजा लक्षात घेऊन डेकीन विद्यापीठाने दोन ते सहा वर्षांच्या मुलांसाठी ‘टॉबी’ नामक या अॅपची निर्मिती केली आहे. विद्यापीठाने ‘दि नॅशनल ट्रस्ट अॅण्ड दि बिझनेस अॅण्ड कम्युनिटी फाऊंडेशन’च्या मदतीने या प्लेपॅड अॅपची निर्मिती केली आहे. अॅपल आयटय़ून्सच्या दुकानांमध्ये हा अॅप उपलब्ध होऊ शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2012 रोजी प्रकाशित
ऑटीस्टिक मुलांचे अध्ययन सुकर करणारा ‘अॅप’
ऑटीस्टिक मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांचे अध्ययन सुकर करणारा ‘प्लेपॅड अॅप’ ऑस्ट्रेलियाच्या डेकीन विद्यापीठाने विकसित केला आहे. ‘ऑटीझम वेस्ट सपोर्ट’च्या मदतीने हा अॅप तयार करण्यात आला आहे. त्याच्या मदतीने लहानपणापासूनच आपल्या पाल्याच्या विकासासाठी प्रयत्न करता येऊ शकतील,

First published on: 22-12-2012 at 12:01 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A app for making easy study to autistic student