विषय : भूगोल
प्र. २४. अचूक विधाने ओळखा.
अ) लोकताक सरोवर हे मणिपूर टेकडय़ांमध्ये वसलेले आहे.
ब) लुसाई टेकडय़ांना पूर्वी मिझो टेकडय़ा असे म्हटले जात असे.
क) मिश्मी टेकडय़ा मणिपूरच्या उत्तर पूर्व भागात वसलेल्या आहेत.
ड) आसाम हिमालय हा तिस्ता व दिहांगा या नद्यांच्या मधल्या प्रदेशात वसलेला आहे.
पर्याय : १) अ, ब २) अ, ब, क ३) अ, ड ४) ब, ड
प्र. २५. चुकीचे विधान ओळखा.
अ) सीरिया हा देश भूमध्य समुद्राच्या पूर्व टोकावर वसलेला आहे.
ब) पश्चिम आशिया या क्षेत्रातील बहुसंख्य ख्रिश्चन लोकसंख्या लॅबनॉन या देशात आहे.
क) येमेन हा देश एडनचे आखात व लाल समुद्राने वेढलेला आहे.
ड) इराण हा देश लाल समुद्र व पर्शियन आखात यामध्ये वसलेला आहे.
प्र. २६. खालील पूर्व वाहिनी नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडील अचूक क्रम ओळखा?
अ) सुवर्णरेखा, महानदी, गोदावरी, कृष्णा, पेन्नार, कावेरी, वैगई
ब) सुवर्णरेखा, महानदी, कृष्णा, गोदावरी, कावेरी, वैगई, पेन्नार
क) महानदी, सुवर्णरेखा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, पेन्नार, वैगई
ड) महानदी, सुवर्णरेखा, कृष्णा, गोदावरी, कावेरी, वैगई, पेन्नार
प्र. २७. भारताच्या पर्जन्यमानाच्या वितरणाच्या बाबतीत पर्यायापैकी कोणती विधाने अचूक आहेत?
अ) भारताच्या उत्तरेकडील भागात पर्जन्यमान पश्चिम भागाकडे कमी होत जाते.
ब) तामिळनाडूचा अपवाद वगळता द्वीपकल्पीय भारतात पर्जन्यमान पूर्वेकडील भागात कमी होत जाते.
पर्याय : १) फक्त ‘अ’ बरोबर २) फक्त ‘ब’ बरोबर ३) ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर ४) अ व ब दोन्ही चूक
प्र. २८. भारतातील दुष्काळाबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
पर्याय : अ) भारताच्या पश्चिम व मध्य भागात मान्सूनच्या अनिश्चितीमुळे दुष्काळाचे प्रमाण अधिक आहे.
ब) भारताचे ३०% क्षेत्र हे दुष्काळप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
क) ‘सुखमाजारी’ हा जलसंवर्धनासंबंधीचा प्रयोग हरयाणा राज्यात करण्यात येतो.
ड) ‘पाणी पंचायत’ ही संकल्पना दुष्काळाला तोंड देण्यासाठी गुजरात राज्यात राबविली गेली होती.
प्र. २९. अचूक विधान/ विधाने ओळखा.
अ) जगातील कच्च्या तेलाच्या साठय़ापैकी ५०% हून अधिक साठे पश्चिम आशियात आढळतात.
ब) सौदी अरेबिया हा देश पश्चिम आशियातील आकारमानाने सर्वात मोठा देश आहे.
पर्याय : १) फक्त ‘अ’ बरोबर २) फक्त ‘ब’ बरोबर
३) दोन्ही ‘अ’ व ‘ब’ बरोबर ४) अ व ब दोन्ही चूक.
प्र. ३०. हिमालय पर्वताच्या निर्मितीबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
पर्याय : अ) निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात पाकिस्तानमधील पोटवार विभागात उत्थापन ((uplift) घडले.
ब) निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यात शिवालिक रांगांची निर्मिती झाली व ही क्रिया अजूनही चालू आहे.
क) निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात मध्य हिमालयाची उंचावण्याची क्रिया सुरू झाली.
ड) हिमालय पर्वत हा प्राचीन पर्वत म्हणून ओळखला जातो.
प्र. ३१. खालील विधाने कोणत्या ‘खंडा’ची अचूक माहिती देतात?
अ) युरोप खंडाच्या दक्षिणेस व आशिया खंडाच्या नैऋत्येस वसलेला आहे.
ब) या खंडाच्या पूर्वेस हिंदी महासागर आहे.
क) या खंडाच्या ईशान्येस लाल समुद्र आहे.
ड) हा खंड सुएझ कालव्याने अशियास जोडलेला आहे.
पर्याय : (१) युरोप (२) आफ्रिका (३) ऑस्ट्रेलिया (४) द. अमेरिका
(क्रमश:)