यंदाच्या हंगामात खरिपाबरोबरच रब्बीचा पेरा चांगला साधेल, पाऊस मोप हुईल. भंडाऱ्याचे निशाण जगावर राज्य करेल, अशी भाकणूक मिरज तालुक्यातील ब्रह्मनाथ यात्रेवेळी सोमवारी पहाटे वर्तविण्यात आली. दीडशे धनगरी ढोलाच्या निनादात सूर्योदयावेळी ही भाकणूक झाली. भाकणूक ऐकण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ, माणगावचे हजारो भाविक हजर होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही खंडेराजुरी येथे ब्रह्मनाथाची यात्रा रविवारपासून सुरू झाली. रविवारी गाव नवेद्य झाल्यानंतर गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील तलावाकाठी असलेल्या मंदिराभोवती देवाच्या पालखीची प्रदक्षिणा सुरू झाली. सुमारे १०० मीटर अंतराची ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यास दोन तासांचा अवधी लागला.
अंतिम प्रदक्षिणेला देवाची भाकणूक झाली. यंदा पाऊसकाळ चांगला असून खरीप व रब्बीचा पेरा चांगला साधणार असल्याचे वर्तविण्यात आले. तसेच जनावरांसाठी फारसा रोगराईचा धोका नाही. मात्र राजकीय पटलावर अशांतता पाहण्यास मिळणार आहे. राजकीय उलथापालथीने राजकीय आडाखे चुकणार असल्याचे संकेत या वेळी देण्यात आले. याच बरोबरच भंडाऱ्याचे निशाण जगावर राज्य करण्याची वेळ जवळ आली असल्याचेही भाकीत वर्तविण्यात आले.
या वेळी पालखीसमोर आसपासच्या देिशग, खरिशग, मालगाव, िलगणी, बेडग, एरंडोली आदी गावचे १५० धनगरी ढोल सहभागी झाले होते. ढोलांचा आवाज पहाटेच्या नीरव शांतते सुमारे १५ किलोमीटर परिसरात येत होता.