News Flash

‘भावी मुख्यमंत्री’ म्हणवून घेणाऱ्या नेत्याकडे इतके साम्राज्य कुठून आले?

कोल्हापूर जिल्ह्यत पुन्हा एकदा मंत्री  पाटील विरुद्ध माजी मंत्री  पाटील असा संघर्ष उभा राहिला आहे.

चंद्रकांत पाटील यांचा सतेज पाटील यांच्यावर हल्ला

कोल्हापूर जिल्ह्यत पुन्हा एकदा मंत्री  पाटील विरुद्ध माजी मंत्री  पाटील असा संघर्ष उभा राहिला आहे. आजरा नगरपंचायतीच्या भाजपच्या  विजयी सोहळ्यात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्या नेत्याकडे इतके साम्राज्य कुठून आले,  असा सवाल करत  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार  सतेज पाटील यांना उद्देशून सयाजी हॉटेल, वॉटर पार्क यांच्या जमिनी कुठून आल्या , अशी विचारणा करून याच्या मुळाशी चौकशीची सूत्रे नेण्याचा पुनरुच्चार  केला. त्यामुळे आता महसूलमंत्र्यांच्या  या आरोपांना सतेज पाटील नेमकं कशा पद्धतीने उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले  आहे.

गेले महिनाभर मंत्री पाटील विरुद्ध माजी मंत्री पाटील असा संघर्ष करवीरनगरीत सुरु आहे . आता त्याचे लोण जिल्ह्यच्या दक्षिण भागात पालकमंत्र्यांनी नेले आहे. तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईचा मुद्दा दोघांतील  वादाला कारणीभूत ठरला .

कोल्हापूर शहरातील बेकायदा नियमित केलेल्या अतिक्रमणांवर  घाव घालण्याचा इरादा व्यक्त करताना मंत्री  पाटील  यांनी  सरकारी  जागांवर  हॉटेल , बगिचा , मंगल कार्यालय , वाहनतळ  बांधले गेले असल्याने त्यासह सर्व प्रकारची चौकशी करून कारवाई करण्यात येईल , असा इशारा दिला होता . त्यावर  आमदार सतेज पाटील यांनी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील केवळ सूडाचे राजकरण करत आहेत. ‘दादां’ची दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे प्रत्युत्तर दिले होते . मात्र आजरा  येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी प्रथमच सतेज पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून  त्यांच्या परिवाराच्या सयाजी हॉटेल, वॉटर पार्क यांच्या जमिनी कुठून आल्या , अशी विचारणा करत आक्रमक भूमिका कायम ठेवली .

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, आजरा नगरपंचायतला ५५ कोटी रुपये मिळावेत असा  प्रस्ताव अशोक चराटी यांनी दिले आहेत.यामध्ये नवीन इमारतसह बरीच कामे असून  ती मंजूर  करुन आणण्याची जबाबदारी माझ्याकडे असेल. लवकरच  शेतकरी मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आजरा शहरात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार महादेवराव महाडिक , नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराठी ,अरुण  देसाई, हिंदूराव शेळके, बाबा देसाई उपस्थित होते . आभार नगरसेवक विलास नाईक यांनी मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 2:45 am

Web Title: chandrakant patil commented on satej patil
Next Stories
1 ऊस उत्पादनातील वाढीमुळे गाळप हंगाम एक महिना आधी
2 विख्यात योगोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे निधन
3 चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोल्हापूर हे सत्तेचे उपकेंद
Just Now!
X